लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांची या निकषांवर पुन्हा पडताळणी करण्याचा सरकारचा निर्णय | Ladki Bahin Yojana Cross-verification

Ladki Bahin Yojana Cross-verification

Ladki Bahin Yojana Cross-verification: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक महत्वाची अपडेट दिली आहे. ही अपडेट ऐकून अनेक लाडक्या बहि‍णींना मोठा धक्का बसणार आहे. ते म्हणजे आता काही लाडक्या बहि‍णींच्या फॉर्मची पुन्हा पडताळणी होणार आहे आणि यात अनेक लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहे. यासंदर्भात स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.

आदिती तटकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत काही तक्रारी आल्या होत्या. लाडकी बहिण योजनेच्या मूळ जीआरमध्ये आम्ही कोणतेही बदल करत नाही, सरसगट सर्व लाडक्या बहि‍णींच्या फॉर्मची पडताळणी होणार नाही, मात्र काही लाडक्या बहि‍णींची पडताळणी होणार आहे, आधार कार्ड मिस मॅचच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. ज्यांचं बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील माहिती जुळत नाही त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत, म्हणजेच आधार कार्ड आणि बँकेतील नावात तफावत असल्यास ते अर्जदार पात्र असणार नाहीत. काही महिलांकडून ऑनलाइन अर्ज आणि ऑफलाइन असे 2 अर्ज आले होते. काही महिलांचं लग्नानंतर स्थलांतर देखील झालंय, त्या दुसऱ्या राज्यात गेल्या आहे, या सर्वांची पडताळणी करण्यात येईल.” असं आदिती तटकरे यांनी म्हटलं.

तसेच लाडक्या बहिणींच्या पडताळणी संदर्भात पुढे त्या म्हणाल्या की “लाडकी बहीण योजनेबाबत पडताळणीची यंत्रणा तयार करत आहोत, काही लाडक्या बहिणींच्या पडताळणी नंतर ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहेत. चारचाकी वाहनं ज्यांच्या नावावर असतील आणि तरी देखील ज्यांनी अर्ज केला असेल त्यांच्या नावांचा शोध घेण्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती घेतली जाईल, चारचाकी वाहन नावावर असणाऱ्यांना या योजनेसाठी अपात्र ठरवलं जाईल.”

दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असतांना सुद्धा काही महिला लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत आहे, याबद्दल आदिती तटकरे म्हणाल्या आहे की “ज्या महिला दुसऱ्या योजनांचा लाभ घेत आहे त्या संदर्भात माहिती घेतली जाईल, ज्यांना दुसऱ्या योजनेचा महिन्याला 1500 रुपयांपेक्षा जास्त लाभ मिळत असेल त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार नाही, तसेच ज्यांना दुसऱ्या योजनेचा महिन्याला 1000 रुपयांपर्यंत लाभ मिळत असेल तर त्यांना लाडक्या बहिणीतून फक्त 500 रुपयांपर्यंतच लाभ मिळेल. सर्व योजनेचे मिळून त्यांना एकत्रित प्रतिमहिना 1500 रुपयांपर्यंतच लाभ मिळेल, उदा. नमो शेतकरी योजनेचे 1000, अधिक लाडक्या बहिणीचे 500, असे एकूण 1500 रुपये त्या महिलांना मिळतील.”

तसेच “पुढील 8 ते 10 दिवसांत 70 ते 80 टक्के स्क्रुटीनी होईल. आम्ही परिवहन विभाग, आयटी विभाग, सेंट्रल गव्हर्मेंटकडून माहिती घेत आधार तपासणीबाबतची मदत घेणारं अहोत. या विभागाशी आमचं क्रॉस व्हेरीफिकेशन होइल आणि त्यानंतर योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांवर करवाई होईल. या योजनेत ज्यांनी घोटाळा केला आहे, त्यांच्यावर करवाई होईल. दुबार नोंदणी, वाढीव इन्कम आणि मायग्रेशन यांच्या तक्रारी आल्या आहेत, त्यांच्यावर करवाई होईल. आत्तापर्यंत ज्यांना पैसे गेले आहेत, परंतु आता ते निकषात बसत नाहीत त्यांना यानंतरचे पैसै मिळणार नाहीत. पण, त्यांचे आजपर्यंत मिळालेले पैसे सरकार माघारी घेणारं नाही.” असेही तटकरे यांनी सांगितले.

पडताळणी कोणत्या लाडक्या बहिणींची होणार? थोडक्यात माहिती..

  • अर्जासंबंधी तक्रारी आल्यास
  • आधार कार्ड आणि बँकेतील नावात तफावत
  • उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त
  • पिवळे आणि केशरी रेशनकार्ड नसणे
  • 4 चाकी वाहन असणे
  • दुसऱ्या योजनेचा लाभ घेणारे
  • दोन वेळेस अर्ज केलेले असणे (ऑनलाईन आणि ऑफलाईन)
  • सरकारी नोकरीला असणाऱ्या महिला
  • राज्याबाहेर स्थलांतर झालेल्या महिला
  • लाभार्थी महिलांची आलेली पत्र

तर आता लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुन्हा पडताळणी करण्यासाठी सरकार एक विशेष यंत्रणा तयार करत आहे, त्यामुळे आता वरील काही लाडक्या बहिणींची पडताळणी होणार आहे. सरकारच्या या घोषणेमुळेच असंख्य लाडक्या बहिणींना या बातमीने मोठा धक्का बसलाय. तर सरकारचा हा पुन्हा पडताळणी करण्याचा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? ते कमेंट करून नक्की सांगा.

Share this Post:

1 thought on “लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांची या निकषांवर पुन्हा पडताळणी करण्याचा सरकारचा निर्णय | Ladki Bahin Yojana Cross-verification”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top