अंतरा-मल्हार झाले खऱ्या आयुष्याचे हमसफर, लग्न करत चाहत्यांना दिला सुखद धक्का | Yogita Chavan wedding

Yogita Chavan wedding 1

Yogita Chavan wedding: या अगोदरही आपण अनेक कलाकारांबद्दल ऐकलं आहे की मालिकेत एकत्र काम करत असतांना अभिनेता आणि अभिनेत्री यांची मालिकेच्या सेटवर मैत्री होते आणि याच मैत्रीचे रुपांतर पुढे प्रेमात होते, यापैकी अनेकांनी लग्न सुद्धा केले आहे. आता पुन्हा एकदा एका अशाच कलाकार जोडीने लग्न केले आहे. (Jeev Majha Guntala Fame Yogita Chavan And Saorabh Choughule Got Married)

नुकतंच अभिनेता सौरभ चौघुले आणि अभिनेत्री योगिता चव्हाण यांनी खऱ्या आयुष्यात लग्न करत सर्व चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिलाय. अभिनेता सौरभ चौघुले आणि अभिनेत्री योगिता चव्हाण हे कलर्स मराठी वरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकले होते. ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेमध्ये योगिताने अंतरा आणि सौरभने मल्हारचं पात्र साकारलं होतं. तेव्हापासूनच त्यांची ही जोडी प्रेक्षकांनाही खूप आवडली होती. तसेच या मालिकेतील अंतराची हमसफर रिक्षाही खूप फेमस झाली होती. मालिकेतील अंतरा आणि मल्हारची ही जोडी आता खऱ्या आयुष्यात सुद्धा एकत्र आली आहे. अंतराने आता मल्हारला तिचा आयुष्यभराचा हमसफर बनवले आहे.

अभिनेता सौरभ चौघुले आणि अभिनेत्री योगिता चव्हाण यांनी नुकतंच 3 मार्च रोजी लग्न केले आहे. याबद्दल अभिनेत्री योगिता चव्हाण हिने Forever Humsafar 03.03.2024 असं म्हणत त्यांच्या लग्नाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सौरभ योगिताला मंगळसूत्र घालत असल्याचं पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री योगिता चव्हाण हिचे सोशल मिडियावर अनेक डान्स व्हायरल होत असतात. तर अभिनेता सौरभ चौघुले हा सध्या सन मराठी वरील सुंदरी या मालिकेत झळकत आहे.

या दोघांनीही खऱ्या आयुष्यात लग्न करत त्याच्या चाहत्यांना एक प्रकारे सुखद धक्काच दिला आहे. अभिनेता सौरभ चौघुले आणि अभिनेत्री योगिता चव्हाण यांचे लग्न झाल्याबद्दल अभिनंदन आणि पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या सुभेच्छा.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top