Jau Bai Gavat Top 5 Finalist: जाऊ बाई गावात च्या या ठरल्या टॉप 5 फायनालिस्ट

Jau Bai Gavat Top 5 Finalist

Jau Bai Gavat Top 5 Finalist: प्रसिद्ध मराठी अभिनेता हार्दिक जोशी हा सूत्रसंचालक असलेला झी मराठीवरील रिऍलिटी शो ‘जाऊ बाई गावात’ हा शो आता अंतिम टप्प्यात आला आहे. (Jau Bai Gavat Top 5 Finalist)

‘जाऊ बाई गावात’ या रिऍलिटी शोच्या यावर्षीच्या या पहिल्याच सीजनचे आता अंतिम top 5 स्पर्धक मिळाले आहे. हे top 5 स्पर्धक आहे रमशा फारुकी (Ramsha farooqui), संस्कृती साळुंके (Sanskruti Salunke), रसिका ढोबळे (Rasika Dhobale), श्रेजा म्हात्रे (Shreyja Mhatre), अंकिता मेस्त्री (Ankita Mestry), या पाच मुली या वर्षीच्या top 5 स्पर्धक आहे.

तर या अंतिम 5 स्पर्धकांपैकी कोण होणार या सीजनची विजेती? याविषयी सोशल मिडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरु आहे. अनेकांनी त्यांच्या फेवरेट स्पर्धकाला या सीजनची विजेती होणार असल्याचे म्हटले आहे.

‘जाऊ बाई गावात’ या रिऍलिटी शोच्या माध्यमातून झी मराठीने एक नवीन प्रयोग केला आहे. बिग बॉस सारखीच संकल्पना असलेला हा शो ग्रामीण भागात एका खेड्या गावात सुरु करण्यात आला. शहरी जीवनात आणि श्रीमंतीत राहण्याची सवय झालेल्या मुलींना ग्रामीण भागात राहून तेथे गावाकडील जे कामे सांगितले जातात ते आणि इतर डान्स कार्यक्रम हे सर्व टास्क म्हणून करावे लागले. यात आता या top 5 स्पर्धक यशस्वी ठरल्या आहे.

‘जाऊ बाई गावात’ या नवीनच असलेल्या शोला प्रेक्षकांचाही खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच या या शो मधील अभिनेता हार्दिक जोशीचे सूत्रसंचालनही प्रेक्षकांना खूप आवडलं आहे. नुकतंच जाऊ बाई गावात या शोच्या आर्मी स्पेशल भागात एक टास्क करत असतांना अभिनेता हार्दिक जोशीचा हात निखळला होता. पण तरीही त्याने हा टास्क पूर्ण केला. याविषयी अभिनेता हार्दिकने म्हटलंय की “आर्मी स्पेशल भागात एक टास्क स्पर्धकांनी करायच्या आधी मी केला होता त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी. तो आर्मी टास्क करताना माझा हात निखळला. तरी पण मी तो टास्क पूर्ण केला. एका सूत्रसंचालकाची भूमिका साकारताना मी कुठे कमी तर पडणार नाही ना, याची सतत मला काळजी घ्यावी लागते. इतक्या लोकांचा विश्वास, प्रेम आहे माझ्यावर त्यामुळे मी कोणालाच निराश होऊ देणार नाही. मी माझी जबाबदारी पूर्णपणे पडणार.” असं अभिनेता हार्दिक जोशीने म्हटलं आहे.

Jau Bai Gavat Top 5 Finalist: Ramsha Farooqui, Sanskruti Salunke, Rasika Dhobale, Shreyja Mhatre, Ankita Mestry,

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top