IPL 2024 : मुंबई इंडियन्स ने रोहित शर्माचा केला गेम – हार्दिक पांड्या मुंबईचा नवा कॅप्टन | Mumbai Indians | Rohit Sharma

Mumbai Indians

IPL 2024: IPL संबंधित काल एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली. ती म्हणजे Mumbai Indians त्यांच्या सर्व चाहत्यांना काल मोठा धक्का दिलाय. त्यांनी चक्क Mumbai Indians संघाचा कॅप्टनच बदलवला आहे. अगोदर IPL 2024 च्या ट्रेंड विंडोमध्ये मुंबई इंडियन्सने मोठा डाव खेळला आणि तब्बल 15 कोटी रुपये देवून त्यांनी गुजरात टायटन्सकडून त्यांचा कॅप्टन हार्दिक पांड्याला (hardik pandya) Mumbai Indians च्या पटलणमध्ये सामील करून घेतलं. आणि आता तर त्यांनी चक्क कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) चाच गेम केलाय. Mumbai Indians ने रोहित शर्माला कॅप्टन पदावरून हटवत चक्क हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बनवलं आहे. (IPL 2024 – Mumbai Indians decision to remove Rohit Sharma from captaincy and Hardik Pandya is new captain Of Mumbai Indians cricket team)

हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कॅप्टन

हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बनवल्याची घोषणा Mumbai Indians च्या ऑफिशियल सोशल मिडिया पेजवरून करण्यात आली आहे. ही बातमी कळताच मुंबई इंडियन्सच्या असंख्य चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. कारण मुंबई इंडियन्सचा कॅप्टन म्हणून सर्वांची पसंती रोहित शर्मालाच होती. त्यामुळे रोहित शर्माला कॅप्टन पदावरून हटवताच चाहत्यांमध्ये कमालीची नाराजी आहे.

अनेकांनी सोशल मिडीयावर मुंबई इंडियन्सच्या या निर्णयाचा तीव्र विरोध केला आहे. विशेषतः रोहित शर्माचे चाहते प्रचंड नाराज आहे. अनेकांनी तर येथून पुढे Mumbai Indians संघाला सपोर्ट करणार नसल्याचे म्हटले आहे. तर काहींनी या निर्णयाच्या विरोधात मुंबई इंडियन्स संघाची जर्शी आणि टोपी जाळली आहे.

रोहित शर्माला MI च्या कॅप्टन्सीवरून का हटवलं?

हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कॅप्टन तर बनवले पण रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन्सीवरून नेमकं का हटवलं? असा प्रश्नही आता मुंबई इंडियन्सचे असंख्य चाहते विचारत आहे. कदाचित रोहित शर्माच्या कॅप्टन्सी मध्ये गेल्या काही वर्षांपासून मुंबई इंडियन्सची खराब कामगिरी आणि दुसरीकडे गुजरात टायटन्सची हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीमध्ये चांगली कामगिरी. हे सर्व बघून मुंबई इंडियन्सने त्यांचा जुना खेळाडू हार्दिक पांड्याला पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये घेऊन कॅप्टन बनवले. याचाच अर्थ Mumbai Indians ला पुन्हा एकदा IPL ट्रॉफी जिंकायची आहे. आणि त्यासाठीच त्यांनी हा एक मोठा बदल केला आहे. पण यामुळे त्यांनी असंख्य चाहत्यांचा रोष ओढवून घेतला आहे.

रोहित T-20 क्रिकेट पासून दूर

गेल्या काही महिन्यांपासून रोहित शर्मा हा T-20 क्रिकेट सामन्यांपासून दूर आहे. गेल्या वर्षभरापासून तो T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळला नाही. आता तर हार्दिक पांड्या हाच टीम इंडियाचा T-20 संघाचा कॅप्टन आहे. हार्दिक सध्या अनफिट असल्याने त्याच्या जागेवर सध्या सुर्यकुमार यादव हा टीम इंडियाचा T-20 संघाचा कॅप्टन बनला आहे. रोहित शर्माने IPL 2023 मध्ये अखेरची टी-ट्वेंटी कॅप्टन्सी केली होती.

कर्णधारपद गेलं असलं तरी रोहित हा एक खेळाडू म्हणून मुंबई इंडियन्स सोबत असेल. आणि हार्दिकच्या नेतृत्वाखाली रोहित हा एक खेळाडू म्हणून खेळेल. अशी माहिती मुंबई इंडियन्सने एका प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

रोहित IPL 2024 खेळणार नाही?

सध्या रोहित शर्मा हा IPL 2024 खेळणार नसल्याचीही जोरदार चर्चा आहे. ODI Cricket World Cup 2023 च्या Final मध्ये ऑस्ट्रेलिया टीम कडून झालेल्या पराभवामुळे भारतीय टीमचा कॅप्टन रोहित शर्मा हा खूप खचला आहे. फायनलमध्ये झालेल्या या पराभवामुळे तो सध्या खूप नैराश्यात आहे. परिवाराच्या मदतीने तो आता सावरण्याचा प्रयत्न करतोय. याकारणामुळेच रोहित शर्मा का कदाचित IPL 2024 मध्ये न खेळता आराम करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि यामुळेच हार्दिकला Mumbai Indians संघाचा कॅप्टन केलं असावं असंही काहींचं म्हणणं आहे.

रोहित शर्माने IPL मध्ये दमदार कॅप्टन्सी

हिटमॅन रोहितने 2013 पासून मुंबई इंडियन्सची जबाबदारी सांभाळण्यास सुरुवात केली. आणि त्यानंतर त्याने आपल्या नेतृत्वाखाली मुंबईला 5 वेळा IPL विजेतेपद मिळवून दिले. मुंबई इंडियन्स हा 5 वेळा IPL ट्रॉफी जिंकणारा सर्वात पहिला संघ होता. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये IPL चषक जिंकला. या मुळेच CSK चा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) सोबत मुंबईचा रोहित शर्मा हा IPL मधील सर्वांत यशस्वी Captain म्हणून ओळखला जातो. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 158 सामने खेळले आहेत. त्यापैकी 87 मैच जिंकण्यात रोहित शर्मा यशस्वी ठरलाय. त्यामुळे अशा यशस्वी कॅप्टनला हटवणे हा निर्णय खूप आश्चर्यजनक आहे.

Mumbai Indians captain Rohit Sharma with 5 IPL trophies
Mumbai Indians captain Rohit Sharma with 5 IPL trophies

पण आता रोहित शर्माचे वय झाल्याने तो जास्त दिवस खेळू शकणार नाही, त्यामुळे आता नवीन खेळाडूला कॅप्टन्सीची संधी देण्याचा विचार मुंबई इंडियन्सने केला असावा. पण जास्त वय असूनही धोनी हा CSK चा कॅप्टन असू शकतो तर मग रोहित शर्मा का नाही? असं प्रश्नही मुंबईचे चाहते आता विचारत आहे.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top