Ram Mandir Darshan in Ayodhya: अयोध्येतील राम मंदिराला तुम्ही कधी भेट देवू शकता? दर्शनाची वेळ? आरतीची वेळ? पास कुठे मिळणार?

Ram Mandir Darshan in Ayodhya: 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामललाचा विधीवत अभिषेक सोहळा पार पडला. या अभूतपूर्व सोहळ्यास अनेक सेलेब्रेटी अयोध्येत हजर होते. तर सर्व देशवासियांनी हा सोहळा आपल्या घरातूनच tv वर बघितला. पण आता सर्वच देशवासीयांची अयोध्येतील राम मंदिरात जाऊन रामललाचे दर्शन घेण्याची इच्छा आहे. (When can you visit Ram Temple in Ayodhya? Visiting time? Aarti time? Where to get the pass?)

22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात फक्त व्हीआयपी लोकांनाच प्रवेश होता. मात्र आतापासून मंदिर सर्वसामान्यांसाठीही खुले होणार आहे. त्यामुळे रामललाच्या दर्शनासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. पण आता सामान्य भाविकांना राम मंदिरात दर्शन कसे मिळणार? तेथे आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी काय करावे लागेल? असे अनेक प्रश्न आता सामान्य राम भक्तांना पडले आहे. यातीलच काही प्रश्नांचे उत्तरे आपण या लेखात बघूया.

सामान्य भाविक राम मंदिरात कधी भेट देऊ शकाल?

23 जानेवारीपासूनच अयोध्येतील राम मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे. त्यामुळे 23 जानेवारीपासून तुम्ही सर्व रामललाचे दर्शन घेऊ शकतात. पण सुरुवातीला काही दिवस प्रचंड गर्दी असेल. त्यामुळे तुम्हाला दर्शनासाठी जास्त वेळ मिळणार नाही. म्हणजेच तुम्हाला खूप घाईत दर्शन घ्यावे लागेल. पुढील काही दिवस दररोज दीड लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रत्येक भाविकाला रामललाचे दर्शन घेण्यासाठी फक्त 15 ते 20 सेकंदांचा वेळ मिळणार आहे.

राम मंदिरासाठी दर्शनाची वेळ काय असेल?

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या ऑफिशियल वेबसाइटनुसार दररोज सकाळी आणि संध्याकाळी असे एकूण 9.30 तास मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. यात सकाळी 7 ते 11.30 आणि नंतर दुपारी 2 ते 7 या वेळेत सर्वांना रामललाचे दर्शन घेता येईल.

Ram Mandir Darshan in Ayodhya
Ram Mandir Darshan in Ayodhya

रामललाच्या आरतीची वेळ किती असेल?

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या ऑफिशियल वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार रामललाची आरती दिवसातून दोनदा केली जाईल. आरतीची वेळ सकाळी 6:30 आणि संध्याकाळी 7:30 अशी असेल. सकाळच्या आरतीला उपस्थित राहण्यासाठी अडव्हांस बुकिंग करणे आवश्यक आहे. तर त्याच दिवशी संध्याकाळच्या आरतीसाठी बुकिंगही करता येईल.

पण आरतीला उपस्थित राहण्यासाठी तुम्हाला पास घ्यावे लागेल. श्री रामजन्मभूमीच्या कॅम्प ऑफिसमधून आरती सुरू होण्याच्या अर्धा तास आधी हे पास तुम्हाला मिळेल. तसेच श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वेबसाईटवरूनही तुम्हाला पास मिळवता येईल. आरतीसाठीचे हे पास मोफत दिले जातील. पण सध्या एक वेळच्या आरतीसाठी फक्त 30 भाविकांनाच पास दिले जाणार आहेत. काही दिवसांनी ही संख्या आणखी वाढवण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

राम मंदिर बांधणीचे काम कधी पूर्ण होणार?

राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिर यावर्षी म्हणजेच 2024 मध्ये पूर्ण होईल. राम मंदिराचे हे संपूर्ण संकुल 70 एकर जमिनीवर बांधले जात आहे. यात मुख्य मंदिराशिवाय आणखी 6 मंदिरे बांधली जात आहेत. या संकुलात राम मंदिराशिवाय गणपती मंदिर, माता भगवती मंदिर, शिव मंदिर आणि हनुमान मंदिरही उभारले जात आहे.

हेलिकॉप्टर सेवा कधी सुरू होणार?

अयोध्येत हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याचे काम सुरू आहे. बहुतेक या महिन्यातच ही सेवा सुरू होऊ शकते. अयोध्येसाठी हेलिकॉप्टर सेवा गोरखपूर, वाराणसी, लखनौ, प्रयागराज, मथुरा आणि आग्रा या 6 शहरांमध्ये सुरू होईल. हेलिकॉप्टरमध्ये जास्तीत जास्त 5 भाविक बसू शकतील. तसेच हे हेलिकॉप्टर फक्त 400 किलो वजन लोड करू शकणार असल्याने यात भाविकांना जास्तीत जास्त 5 किलो सामान नेण्याची परवानगी असेल.

हेलिकॉप्टर सेवेसाठी भाडे किती असणार हे उत्तर प्रदेश सरकार निश्चित करेल. तसेच अयोध्येतील राम मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन हेलिकॉप्टर सेवेची वेळ निश्चित केली जाईल.

तर अशा प्रकारे 23 जानेवारीपासून सर्व सामान्य भाविक अयोध्येतील राम मंदिरात दर्शनासाठी येऊ शकता. पण सुरुवातीचे काही दिवस खूप गर्दी असल्याने भाविकांना रामललाच्या दर्शनासाठी फार कमी वेळ मिळेल.

यासोबतच अयोध्येतील राम मंदिर आणि रामललाच्या मूर्ती बद्दल इतर सर्व माहितीसाठी आमचा अगोदरचा हा लेख नक्की वाचा: Ram Mandir Pran Pratishstha: श्री रामाच्या मूर्तीची खासियत माहितीय का? खास दगडाचे वैशिष्टे आणि मंदिर शैलीची खासियत कोणती?

Share this Post:

संतोष चकोर हे एक लेखक आहेत. 2015 पासून ते डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब आणि ब्लॉगिंग या क्षेत्रातही काम करत आहेत. विशेषतः ते तंत्रज्ञान, आरोग्य आणि इतर क्षेत्रातील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. सध्या ते मराठीजन या आमच्या वेबसाइटवर संपादक आणि लेखक म्हणून काम करत आहेत आणि दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील अपडेट्स लिहितात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त