Ram Mandir Pran Pratishstha: श्री रामाच्या मूर्तीची खासियत माहितीय का? खास दगडाचे वैशिष्टे आणि मंदिर शैलीची खासियत कोणती?

Ram Mandir Pran Pratishstha: आज तब्बल 500 वर्षांची प्रतिक्षा संपली आहे. सर्व हिंदू मनातील इच्छा आज पूर्ण झाली. अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिरात आज प्रभू श्रीराम विधीवत विराजमान झाले. अयोध्येसह (Ayodhya) संपूर्ण देशभरात राम नामाचा जयघोष करत सर्व देशवासियांनी आजचा हा ऐतिहासिक दिवस साजरा केला. (Ram Mandir Pran Pratishstha Ayodhya: Do you know the specialty of Shri Rama idol? What are the special stones and temple styles?)

रामललाचे गोजिरं आणि तेजस्वी रूप

या अभूतपूर्व सोहळ्यात पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) हस्ते प्रभू श्रीरामाचा (Shri Ram) विधीवत अभिषेक सोहळा पार पडला. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर प्रभू श्रीरामाचं तेजस्वी रुप संपूर्ण देशवासियांना tv वरून दाखवण्यात आलं आहे. प्रत्येक देशवासिय प्रभू श्रीरामाचं हे लोभसवाणं रुप डोळ्यांत साठवत आहे. श्रीरामाच्या मूर्तीच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य लक्ष वेधून घेत आहे. रामललाला पिवळे पितांबर नेसवण्यात आलेय. प्रभू रामाच्या हातात सोन्याचं धनुष्य आणि बाण आहे. प्रभू रामचंद्राच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आणि गळ्यात मोत्यांचा हार आहे. तसेच कानातील डूल हे सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. कृष्णशिलेत कोरण्यात आलेलं रामललाच्या गोजिरं आणि तेजस्वी रूपावरून कोणाचीही नजर हटत नाहीये.

मूर्तीसाठी वापरलेल्या खास दगडाचे वैशिष्टे

अयोध्येतील राम मंदिरात (Ram Mandir Ayodhya) विराजमान झालेली प्रभू श्रीरामाची बालस्वरूपातील ही मूर्ती कर्नाटकातील शिल्पकार ‘अरुण योगीराज’ यांनी शालिग्राम म्हणजेच कृष्णशिला खडकापासून बनवली आहे. ही मूर्ती साकारण्यासाठी त्यांना सहा महिन्यांचा कालावधी लागला. रामललाची मूर्तीची एकूण उंची 51 इंच असून तिचे वजन सुमारे 200 किलो आहे. ही मूर्ती काळ्या रंगाच्या एकाच दगडात साकारण्यात आली आहे. शालिग्राम हा काळ्या रंगाचा दगड आहे. तसेच हा खडक हजारो वर्ष जुना आहे. हा खडक पाणी प्रतिरोधक असून चंदन आणि रोळी लावल्यानं मूर्तीच्या चकाकीवर परिणाम होत नाही. धार्मिक ग्रंथांमध्ये शालिग्राम पाषाण हे भगवान विष्णूचं रूप मानलं गेलंय, त्यामुळेच प्रभू श्री राम हे भगवान विष्णूचा सातवा अवतार असल्याने त्यांची मूर्ती शालिग्राम म्हणजेच कृष्णशिला खडकापासून बनवण्यात आली आहे. निळा किंवा काळ्या रंगाचा दगड म्हणून याला कृष्ण शिला असं म्हटलं जातं.

मूर्तीसाठी वापरण्यात आलेला कृष्ण शिला हा दगड कर्नाटकातील मैसूर येथील हेग्गाडादेवनकोटे म्हणजेच एचडी कोटे तालुक्यातील गुज्जेगौदनापुरा येथे रामदासांच्या शेतजमिनीत सापडला होता. हा दगड अतिशय गुळगुळीत असतो. हा दगड लोखंडापेक्षा मजबूत आहे. हा दगड कोणत्याही घटकास संवेदनशील नाही. कृष्ण शिला ही ऍसिड प्रूफ, वॉटर प्रूफ, फायर प्रूफ आणि डस्ट प्रूफ दगड आहे. ऊन, वारा, पाऊस, दूध, तूप, ज्वाला यांचा या दगडावर कोणताही परिणाम होत नाही. हा दगड सुमारे 1000 पेक्षा अधिक वर्ष जशास तसा राहतो.

रामललाची जुनी मूर्तीही नवीन मूर्तीसोबत राम मंदिराच्या गर्भगृहात ठेवण्यात आली आहे.

राम मंदिराच्या मंदिर शैलीची खासियत

अयोध्येतील राम मंदिराची नागर शैलीत रचना करण्यात आली आहे. मंदिर बांधण्याच्या तीन मुख्य शैली आहेत त्या म्हणजे नागर, द्रविड आणि वेसार. दक्षिण भारतात विशेषकरून द्रविड शैली जास्त प्रचलित आहे. तर उत्तर भारतात आणि नद्यांना लागून असलेल्या भागात नागर शैली जास्त प्रचलित आहे. नागर शैलीत मंदिर बांधताना मुख्य इमारत उंच जागेवर बांधली जाते. या शैलीत जिथं मंदिराच्या मुख्य देवतेची पूजा केली जाते त्याठिकाणी मंदिराचा गाभारा असतो आणि गाभाऱ्यावर एक शिखर असते. हे दोन्ही ठिकाणे अतिशय पवित्र आणि महत्त्वाची मानली जातात.

अयोध्येतील राम मंदिराच्या गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणा मार्ग आहे. इतरही अनेक मंडप आहेत ज्यावर इतर देवी-देवतांचे किंवा त्यांची वाहने व फुले कोरलेली आहेत. त्यासोबतच एक कलश आणि मंदिराचा ध्वजही आहे.

देशातील अनेक राज्यांमधून आल्या खास वस्तू

अयोध्येतील राम मंदिरासाठी देशातील अनेक राज्यांमधून काही खास वस्तू घेण्यात आल्या होत्या. राजस्थानातील नागौर येथील मकराना हे मंदिराच्या बांधकामात वापरण्यात आले आहे. राम मंदिराच्या गाभाऱ्यातील सोन्याने मढवलेल्या सिंहासनावर रामाची मूर्ती आहे, हे सिंहासना मकराना संगमरवरी मध्ये बनवण्यात आले आहे. मंदिराचे खांब बनवतानाही मकराना संगमरवरी वापरण्यात आलं आहे.

श्री राम मंदिराच्या निर्मितीसाठी सगळ्यात मोठं दान सूरतमधील एका हिरे व्यापाऱ्यानं दिलं आहे. सूरतमधील हिरे व्यापारी असलेल्या लाखी कुटुंबानं श्री राम जन्मभूमी मंदिरासाठी 101 किलो सोन्याचं दान दिलं आहे. सध्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 64 ते 65 हजार रुपयांच्या आसपास आहे. त्यानुसार एक किलो सोन्याची किंमत 64 लाख ते 65 लाख होते. तर, 101 किलो सोन्याची किंमत 66 कोटी रूपयांच्या घरात जाते. याचा वापर श्री राम मंदिरातील दरवाजे, गर्भगृह, त्रिशूळ, डमरू, स्तंभ यासह मंदिरातील तळमजल्यावर असलेल्या 14 दरवाज्यांसाठी सोन्याचा मुलामा देण्यासाठी केला आहे.

  • अयोध्येतील राम मंदिरासाठी पॉलिश केलेले सागवान लाकूड महाराष्ट्रातून आले आहे.
  • 2100 किलो वजनाची अष्टधातूची घंटा गुजरातने दिली आहे.
  • कर्नाटकातून आलेल्या चेरमोथी वाळूच्या दगडावर देवतांचे कोरीव काम केले आहे.
  • पितळेची भांडी उत्तर प्रदेशातून आली आहेत.
  • राजस्थानच्या बन्सी पहारपूर येथील गुलाबी वाळूचा दगड हा प्रवेशद्वाराच्या भव्य आकारात वापरण्यात आला आहे.
  • मंदिराच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या विटा सुमारे 5 लाख गावांमधून आल्या होत्या.
Share this Post:

संतोष चकोर हे एक लेखक आहेत. 2015 पासून ते डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब आणि ब्लॉगिंग या क्षेत्रातही काम करत आहेत. विशेषतः ते तंत्रज्ञान, आरोग्य आणि इतर क्षेत्रातील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. सध्या ते मराठीजन या आमच्या वेबसाइटवर संपादक आणि लेखक म्हणून काम करत आहेत आणि दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील अपडेट्स लिहितात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त