Nayanthara movie Annapoorani: “प्रभू राम मांसाहारी, शंकरानेही मटण खाल्ले..” या वादग्रस्त संवादामुळे चित्रपटावर कारवाईची मागणी

Nayanthara movie Annapoorani: काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भगवान राम हे मांसाहारी होते असे म्हटल्याने खूपच वाद झाला होता. हा वाद ताजा असतांनाच आता अभिनेत्री नयनताराच्या एका चित्रपटामुळे अजून मोठा वाद निर्माण झालाय. (Nayanthara movie Annapoorani lines on Prabhu Ram and Lord Shiva hurting Hindu sentiments)

शाहरुख खानच्या ‘जवान’ या हिंदी चित्रपटात झळकलेली प्रसिद्ध दक्षिण भारतीय अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) हिचा अन्नपूरानी (Annapoorani) हा चित्रपट महिन्याभरापुर्वीच रिलीज झाला होता. हा चित्रपट एका महिला शेफच्या आयुष्यावर आधारित आहे. पण चित्रपट मुळ तमिळ भाषेत असल्याने थियेटर मध्ये सुरु असे पर्यंत जास्त वाद झाला नाही. आता हा चित्रपट नेटफ्लिक्स वर रिलीज झालाय. वाल्मिकींच्या रामायणाचा चुकीचा अर्थ लावून या चित्रपटात भगवान राम हे प्राण्यांचे मांस खाणारे होते असे म्हटले गेले आहे. त्यामुळे आता या चित्रपटावरून खूप वाद होत आहे. Annapoorani या चित्रपटामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप झालाय. तसेच हा चित्रपट लव्ह जिहादला प्रोत्साहन देतो असंही म्हटलं जातंय.

चित्रपटाविरोधात FIR दाखल

रमेश सोळंकी यांनी या अभिनेत्री नयनताराच्या Annapoorani या चित्रपटावर जोरदार टीका करत त्यांनी या चित्रपटाविरोधात FIR ही दाखल केली आहे. याचे फोटो त्यांनी त्यांच्या एक्स म्हणजेच ट्विटरवर शेअर केले आहे. रमेश सोळंकी यांनी या चित्रपटावर आक्षेप घेत म्हटलंय की “मी #AntiHinduZee आणि #AntiHinduNetflix विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. भगवान श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या अपेक्षेने संपूर्ण जग जल्लोष करत असताना, झी स्टुडिओ, नाद स्टुडिओ आणि ट्रायडेंट आर्ट्स निर्मित नेटफ्लिक्सवर अन्नपूराणी हा हिंदूविरोधी चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

  1. हिंदू पुजारीची मुलगी, बिर्याणी शिजवण्यासाठी नमाज पढते.
  2. या चित्रपटात लव्ह जिहादचा प्रचार करण्यात आला आहे.
  3. फरहान (अभिनेता) भगवान श्री राम देखील मांसाहारी होते असे सांगून अभिनेत्रीला मांस खाण्यास प्रवृत्त करतो”.

असे आक्षेप घेत रमेश सोळंकी यांनी हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी जाणीवपूर्वक हा चित्रपट बनवला आहे आणि प्राण प्रतिष्ठाच्या आसपास प्रदर्शित केला आहे असा आरोप केलाय. तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिसांना या चित्रपटाविरोधात तातडीने कारवाई करावी ही विनंती त्यांनी केली आहे.

रमेश सोळंकी यांनी दाखल केलेल्या FIR मध्ये Annapoorani चित्रपटातील मुख्य अभिनेत्री नयनतारा आणि अभिनेता जय संपत यांच्यासोबतच या चित्रपटाचे दिग्दर्शक नीलेश कृष्णा, झी स्टुडिओ, नाद स्टुडिओ, ट्रायडेंट आर्ट्स, नेटफ्लिक्स आणि झी स्टुडिओचे प्रमुख शारिक पटेल यांचेही नावे आहे.

काय आहे नेमकं चित्रपटात?

Annapoorani या तमिळ चित्रपटात अभिनेत्री नयनताराने शेफ बनण्याचे स्वप्न असणाऱ्या मुलीची भूमिका साकारली आहे. पण ती यात हिंदू पुजार्‍याची मुलगी दाखवलीय. त्यामुळे तिला मांसाहार बनवताना कशा प्रकारे अडचणींचा सामना करावा लागतो हे सर्व दाखवलंय.या चित्रपटाच्या एका सीन मध्ये अभिनेत्री नयनतारा हिंदू असूनही नमाज पढताना दाखवण्यात आली. स्वयंपाक स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी तिचे हे पात्र डोक्यावर स्कार्फ बांधून नमाज पढते. याचे कारण असे दाखवले आहे की हे मुलीचे पात्र कॉलेजमध्ये शिकत असताना तिने तिच्या मैत्रिणींसाठी बिर्याणी बनवली होती. त्यावेळी बिर्याणी खूप चविष्ट झाली होती. आणि त्यावेळी तिने बिर्याणी बनवण्यापूर्वी नमाज अदा केल्याचे तिला आठवतं. नमाज पढल्यामुळे तिची बिर्याणी अधिक चवदार झाली असा तिचा भ्रम होतो. त्यामुळेच स्वयंपाक स्पर्धेत भाग घेण्यापूर्वीच ती नमाज अदा करायला जाते. जेणेकरून तिची बिर्याणी पहिल्यासारखी चविष्ट बनेल आणि ती ही स्पर्धा जिंकेल. असं सर्वकाही या सीन मध्ये दाखवलंय. पण यात एका हिंदू पुजाऱ्याच्या मुलीचे असे नमाज पढने ही गोष्ट अनेक प्रेक्षकांना खटकली आहे.

त्या सोबतच हा चित्रपट लव्ह जिहादलाही प्रोत्साहन देतोय असाही आरोप या चित्रपटावर होतोय. कारण या चित्रपटातील हिंदू पुजाऱ्याच्या त्या मुलीचा वर्गमित्र मुस्लीम दाखवलाय आणि त्याला ती मुलगी आवडत असल्याचे दाखवले आहे.

एका सीन मध्ये तर हे मुस्लीम पात्र त्या पुजाऱ्याच्या मुलीला मांस खाऊ घालण्यासाठी तिला सांगतो. यात तो असंही सांगतो की “भगवान राम देखील मांस खात असत.जंगलात असताना म्हणजेच प्रभू राम, सीता आणि लक्ष्मण हे वनवासात गेले होते तेव्हा त्यांनी तेथे शिकार करुन मांस शिजवून खाल्लं होतं. रामायणातही लिहिलं आहे रामाने मांस खाल्लं होतं. शंकरानेही मटण खाल्लं होतं असाही उल्लेख पुराणात आहे”. असं हा मुस्लीम तरुण त्या पुजाऱ्याच्या मुलीला सांगतो. हे सर्व चित्रपटात बघून अनेक प्रेक्षक प्रचंड संतापलेय. या काही सीन मुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप होतोय.

रमेश सोळंकी यांनी Annapoorani चित्रपटाविरोधात FIR दाखल केली असली तरी पोलिसांनी अद्याप याप्रकरणी कोणतीही कारवाई केलेली नाही. पण सध्या मात्र या चित्रपटाविरोधात वातावरण प्रचंड तापले आहे. या चित्रपटावर कारवाई करण्याची आता जोरदार मागणी होतेय.

Share this Post:

संतोष चकोर हे एक लेखक आहेत. 2015 पासून ते डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब आणि ब्लॉगिंग या क्षेत्रातही काम करत आहेत. विशेषतः ते तंत्रज्ञान, आरोग्य आणि इतर क्षेत्रातील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. सध्या ते मराठीजन या आमच्या वेबसाइटवर संपादक आणि लेखक म्हणून काम करत आहेत आणि दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील अपडेट्स लिहितात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त