Narendra Modi Cabinet: मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील मंत्र्यांना मिळाली ही खाती..

Narendra Modi Cabinet: नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर १० जून रोजी सायंकाळी खातेवाटपही जाहीर करण्यात आले. यात महाराष्ट्राच्या वाट्याला दोन नेत्यांना कॅबिनेट मंत्रिपदं आणि चार नेत्यांना राज्यमंत्रिपदं मिळाली आहेत. यात त्यांना कोणती खाती मिळाली याबद्दल माहिती बघूया. (PM Narendra Modi Cabinet Portfolios Allocated – Nitin Gadkari, Raksha Khadse, Piyush Goyal, Murlidhar Mohol, Prataprao Jadhav)

मोदी सरकारकडून महाराष्ट्रावर अन्याय?

मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात ४८ खासदार असलेल्या आपल्या महाराष्ट्राला केवळ दोनच कॅबिनेट मंत्रिपदं दिली आहेत. त्यामुळे मोदी सरकारने महाराष्ट्रावर अन्याय केल्याचेही महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे. यात नितीन गडकरी (भाजपा) आणि पीयुष गोयल (भाजपा) या दोन नेत्यांचा कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर इतर चार नेत्यांना राज्यमंत्रिपदं मिळाली आहेत. यापैकी शिवसेनेच्या शिंदे गटाला स्वतंत्र कार्यभार असलेलं राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. रक्षा खडसे (भाजपा), मुरलीधर मोहोळ (भाजपा), प्रतापराव जाधव (शिवसेना शिंदे गट), रामदास आठवले (आरपीआय) या महाराष्ट्रातील चार नेत्यांना राज्यमंत्रिपदं मिळाली आहेत.

महाराष्ट्रातील नेत्यांना मिळालेली खाती

कॅबिनेट मंत्री
१. नितीन गडकरी – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
२. पीयूष गोयल – वाणिज्य आणि उद्योग मंत्री

Narendra Modi Cabinet
Narendra Modi Cabinet

राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)
१. प्रतापराव जाधव – आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आणि आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री

राज्यमंत्री आणि त्यांच्याकडील खाती
१. रामदास आठवले – सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री.
२. रक्षा खडसे – युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री
३. मुरलीधर मोहोळ – सहकार राज्यमंत्री आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री

Narendra Modi Cabinet
Narendra Modi Cabinet

मोदी सरकार मधील खातेवाटप (Narendra Modi Cabinet)

कॅबिनेट मंत्री
१. राजनाथ सिंह – संरक्षण मंत्री
२. अमित शाह – गृहमंत्री; सहकार मंत्री
३. नितीन गडकरी – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
४. जगत प्रकाश नड्डा – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री; रसायने आणि खते मंत्री
५. शिवराज सिंह चौहान – कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आणि ग्रामविकास मंत्री
६. निर्मला सीतारामण – अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री
७. डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर – परराष्ट्र व्यवहार मंत्री
८. मनोहर लाल खट्टर – गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री आणि उर्जा मंत्री.
९. एच. डी. कुमारस्वामी – अवजड उद्योग मंत्री आणि पोलाद मंत्री
१०. पीयूष गोयल – वाणिज्य आणि उद्योग मंत्री
११. धर्मेंद्र प्रधान – शिक्षण मंत्री
१२. जीतन राम मांझी – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री
१३. राजीव रंजन सिंह उर्फ ​​ललन सिंह – पंचायत राज मंत्री आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री
१४. सर्वानंद सोनोवाल – बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री
१५. वीरेंद्र कुमार – सामाजिक न्याय मंत्री
१६. के. आर. नायडू – नागरी विमान वाहतूक मंत्री
१७. प्रल्हाद जोशी – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री
१८. जुआल ओरम – आदिवासी व्यवहार मंत्री
१९. गिरीराज सिंह – वस्त्रोद्योग मंत्री
२०. अश्विनी वैष्णव – रेल्वेमंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्री, आणि इलेक्ट्रॉनिक्स तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री
२१. ज्योतिरादित्य सिंधिया – दळणवळण मंत्री, ईशान्य क्षेत्राचे विकास मंत्री
२२. भूपेंद्र यादव – पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री
२३. गजेंद्रसिंह शेखावत – सांस्कृतिक कार्य मंत्री आणि पर्यटन मंत्री
२४. अन्नपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास मंत्री
२५. किरेन रिजिजू – संसदीय कामकाज मंत्री, अल्पसंख्याक व्यवहार मंत्री
२६. हरदीप सिंग पुरी – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री
२७. मनसुख मांडविय – कामगार आणि रोजगार मंत्री आणि युवा कार्य तथा क्रीडा मंत्री
२८. जी. किशन रेड्डी – कोळसा मंत्री आणि खाण मंत्री
२९. चिराग पासवान – अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री
३०. सी. आर. पाटील – जलशक्ती मंत्री

Narendra Modi Cabinet
Narendra Modi Cabinet

तर असे हे मोदी सरकारचे खातेवाटप आहे. पण तुम्हाला काय वाटतं? अजून कोणत्या नेत्यांना मंत्रिपद मिळायला हवे होते ते यथे कॉमेंट करून नक्की सांगा..

आमच्या मराठीजन या वेबसाईट वरील आर्टिकल वाचण्यासोबतच आमचे विविध कोर्सेस ऑनलाईन बघण्यासाठी आमच्या मराठीजन LMS Courses या वेबसाईटला भेट द्या. जर तुम्हाला ऑफलाईन कोर्सेस शिकायचे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. या सोबतच तुम्ही आमचे युट्युब व्हिडीओ ही बघू शकता.

Share this Post:

संतोष चकोर हे एक लेखक आहेत. 2015 पासून ते डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब आणि ब्लॉगिंग या क्षेत्रातही काम करत आहेत. विशेषतः ते तंत्रज्ञान, आरोग्य आणि इतर क्षेत्रातील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. सध्या ते मराठीजन या आमच्या वेबसाइटवर संपादक आणि लेखक म्हणून काम करत आहेत आणि दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील अपडेट्स लिहितात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त