IPL 2024 च्या Auction मध्ये खेळाडूंवर पैशांचा पाऊस – 2 खेळाडूंवर तब्बल 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त बोली

IPL 2024 Auction: IPL 2024 च्या दुबईमध्ये सुरु असलेल्या लिलावात 2 ऑस्ट्रेलियाई खेळाडूंवर अक्षरशः पैशांचा पाऊस पडलाय असंच म्हणावे लागेल. कारण मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर 20 कोटी रुपयांपेक्षा जास्तची बोली लागली आहे. हे दोघेही वर्ल्डकप विजेत्या टीमचा हिस्सा होते. त्यापैकी पॅट कमिन्स हा तर ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा कॅप्टन आहे. मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांच्यावर 20 कोटी रुपयांपेक्षा जास्तची बोली लागल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय.

2 ऑस्ट्रेलियाई खेळाडूंवर पैशांचा पाऊस

यात कोलकात्याने मिचेल स्टार्क या ऑस्ट्रेलियाई बॉलरसाठी 24.75 कोटी रुपये बोली लावली आहे. म्हणजेच असंही म्हणावे लागेल की कोलकात्याने IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू खरेदी केलाय. तर ऑस्ट्रेलियाई बॉलर पॅट कमिन्स हा दुसरा महागडा खेळाडू ठरलाय. सनराइजर्स हैदराबादने पॅट कमिन्सला तब्बल 20.50 कोटी रुपयांत खरेदी केले आहे.

तर इतर काही खेळाडूंवर देखील दहा कोटी रुपयांपेक्षा जास्त बोली लागली आहे. यापैकी भारतीय बॉलर हर्षल पटेल हा सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्यावर पंजाब किंग्सने 11.75 कोटी रुपये इतकी बोली लावली आहे. तसेच 20 वर्षीय समीर रिझवी या भारतीय खेळाडूची सध्या खूप चर्चा आहे. तो अनकॅप्ड प्लेयर होता. पण त्याच्यावर चेन्नई सुपर किंग्जने तब्बल 8 कोटींची बोली लावत आपल्या संघात सामील करुन घेतलं. त्यामुळे समीर रिझवी कोण आहे? याबद्दल सध्या सोशल मिडीयावर खूप मोठ्या प्रमाणात सर्च केलं जातंय.

तर काही महागड्या आणि चर्चेत असणाऱ्या खेळाडूंवर IPL 2024 च्या Auction मध्ये लागलेली बोली थोडक्यात बघूया.

मिचेल स्टार्क (Mitchell Starc)

ऑस्ट्रेलियाई बॉलर मिचेल स्टार्क हा IPLच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याच्यावर अभिनेता शाहरुख खानच्या Kolkata Knight Riders टीमने तब्बल 24.75 कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात सामील केलंय. मिचेल स्टार्कने 2015 मध्ये शेवटची IPL खेळली होती. त्यानंतर आता वर्ल्डकप 2023 जिंकल्यानंतर म्हणजेच तब्बल 8 वर्षानंतर मिचेल स्टार्क हा पुन्हा एकदा IPL मध्ये खेळणार आहे. स्टार्कसाठी आज IPL 2024 च्या Auction मध्ये सर्वात अगोदर Delhi Capitals, नंतर Mumbai Indians, नंतर Kolkata Knight Riders आणि त्यानंतर Gujarat Titans या टीम्सने बोली लावली. पण यापैकी अखेर Kolkata Knight Riders ने तब्बल 24.5 कोटी रुपयांपर्यंत बोली लावत त्याला आपल्या संघात घेतले.

पॅट कमिन्स (Pat Cummins)

IPL 2024 च्या Auction मधील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ऑस्ट्रेलियाचा बॉलर आणि कॅप्टन पॅट कमिन्स हा आहे. पॅट कमिन्सवर Sunrisers Hyderabad टीमने 20.50 कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात सामील केलंय. बहुतेक David Warner ऐवजी आता Pat Cummins ला Hyderabad टीमचा कॅप्टन बनवण्याच्या उद्देशाने हैदराबाद टीमने ही एवढी मोठी बोली लावली असावी. पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचा एक वेगवान बॉलर तर आहेच पण तो एक यशस्वी कॅप्टन सुद्धा आहे. भारतात खेळून त्याने वर्ल्डकप 2023 च्या फायनल मध्ये भारतीय टीमचा पराभव केला. तसेच Pat Cummins हा शेवटी येऊन फलंदाजी सुद्धा करू शकतो.

Chennai Super Kings ने पॅट कमिन्ससाठी बोली सुरू केली, त्याच्यापाठोपाठ Mumbai Indians बोली लावली. पण खरी चुरस ही Royal Challengers Bangalore आणि Sunrisers Hyderabad यांच्यात झाली. अखेर Sunrisers Hyderabad नेच पॅट कमिन्सला 20.50 कोटी रुपयांची IPL इतिहासातील सर्वांत मोठी बोली लावून आपल्या संघात सामील केले. हे बघून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलंय.

डॅरिल मिचेल (Daryl Mitchell)

डॅरिल मिचेल याच्यासाठी 14 कोटी रुपयांची बोली लावून महेंद्रसिंग धोनीच्या Chennai Super Kings संघाने आपल्या ताफ्यात घेतले आहे. हा न्यूझीलंडच्या एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. डॅरेल मिचेलसाठी दिल्ली आणि पंजाब यांनीही बोली लावली होती. पण बोली 11 कोटींपेक्षा पुढे बोली गेल्यानंतर दिल्लीने माघार घेतली, पण त्यावेळी चेन्नईने बोली लावण्यास सुरुवात केली. आणि अखेर चेन्नईने तब्बल 14 कोटी रुपयांची बोली लावत डॅरेल मिचेल याला आपल्या संघात घेतले.

हर्षल पटेल (Harshal Patel)

भारताचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याच्यासाठी अभिनेत्री प्रिती झिंटाच्या Punjab Kings ने 11.75 कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतले आहे. हर्षल पटेल याची मूळ किंमत दोन कोटी रुपये इतकी होती. त्यामुळे हर्षल पटेल याला त्याच्या बेस प्राईजपेक्षा जवळपास सहा पट अधिक रक्कम मिळाली. IPL 2024 च्या Auction मध्ये Harshal Patel हा सर्वाधिक महागडा भारतीय खेळाडू ठरलाय.

हर्षल पटेलसाठी Gujarat Titans आणि Lucknow Super Giants यांनीही बोली लावली होती, पण अखेर Punjab Kings ने 11.75 कोटी रुपयांची बोली लावत बाजी मारली. या अगोदर हर्षल पटेल हा विराट कोहलीच्या Royal Challengers Bangalore या टीममध्ये होता. IPL 2023 च्या Auction मध्ये RCB ने त्याला 10.75 कोटी रुपयांची मोठी बोली लावून खरेदी केले होते. पण Harshal Patel ला या बोलीला साजेशी कामगिरी करता आली नाही, म्हणून आता RCB ने त्याला रिलिज केले होते.

अल्जारी जोसेफ (Alzarri Joseph)

वेस्ट इंडिजचा वेगवान बॉलर अल्जारी जोसेफ याला Royal Challengers Bangalore ने तब्बल 11.50 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात सामील केलेय. IPL 2021 च्या Auction मध्ये तो अनसोल्ड राहिला. Alzarri Joseph हा सध्या IPL मधील वेस्ट इंडिजचा दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरलाय, यात वेस्ट इंडिजचा पहिला महागडा खेळाडू आहे निकोलस पूरन. पूरनला IPL 2023 मध्ये Sunrisers Hyderabad ने तब्बल 16 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात सामील केले होते.

स्पेंसर जॉनसन (Spencer Johnson)

IPL 2024 च्या Auction मध्ये ऑस्ट्रेलियाई खेळाडूंवर पैशाचा पाऊसच पडलाय. त्यांचा या लिलावात बोलबाला पाहायला मिळतोय. ऑस्ट्रेलियाचा अजून एक खेळाडू Spencer Johnson याला Gujarat Titans टीमने तब्बल 10 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात सामील केलंय. स्पेंसर जॉनसन हा एक वेगवान बॉलर आहे. त्याची बेस प्राइज फक्त 50 लाख रुपये इतकीच होती. या लिलावात Delhi Capitals आणि Gujarat Titans यांच्यात मोठी चुरस पाहायला मिळाली. पण अखेर Gujarat Titans ने बाजी मारली.

समीर रिजवी (Sameer Rizvi)

युवा भारतीय खेळाडू समीर रिजवी हा खेळाडू सध्या खूप चर्चेत आहे. तो भारताचा एक युवा फलंदाज आहे. पण आजच्या IPL Auction नंतर Sameer Rizvi याला खूप मोठ्या प्रमाणात सर्च केलं जातंय. त्याचे कारण म्हणजे धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने तब्बल 8.40 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात सामील करुन घेतलंय. उत्तर प्रदेश कडून खेळणाऱ्या Sameer Rizvi ने आतापर्यंत फक्त 2 फर्स्ट क्लास मैच खेळल्या आहे.

पण नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश T-20 लीग मध्ये तो खूप जबरदस्त खेळला. या टूर्नामेंट मध्ये कानपुर सुपरस्टार या टीमकडून खेळतांना त्याने 10 मैच मध्ये 50.56 अॅव्हरेजने आणि 188.8 च्या स्ट्राइक रेट ने तब्बल 455 रन बनवले. तसेच या टूर्नामेंट मध्ये Sameer Rizvi ने 2 शतक सुद्धा झळकावले. यूपी लीग च्या या 10 मैच मध्ये समीरने तब्बल 38 चौकार आणि 35 षटकार लगावले. त्याच्या याच खेळीने सर्व IPL टीमचे लक्ष वेधून घेतले. IPL 2024 च्या या Auction मध्ये 20 वर्षीय समीर रिझवी हा अनकॅप्ड खेळाडू होता. त्याची बेस प्राइज़ फक्त 20 लाख रुपये इतकीच होती. पण Chennai Super Kings ने मोठी बोली लावत त्याला तब्बल 8.40 कोटी रुपये खर्च करून त्याला आपल्या संघात सामील करुन घेतलंय.

चेन्नई टीममध्ये न्यूझीलंडचा दबदबा

महेंद्रसिंग धोनीच्या Chennai Super Kings या टीममध्ये आता न्यूझीलंडच्या खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळतोय. डॅरेल मिचेल, डेवॉन कॉनवे, रचिन रविंद्र आणि मिचेल सँटनर असे न्यूझीलंडचे 4 खेळाडू चेन्नईने खरेदी केले आहे.

अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 5 कोटी पेक्षा जास्त बोली

IPL 2024 च्या या Auction मध्ये 20 लाख रुपये इतकीच बेस प्राइज़ असणाऱ्या भारताच्या अनेक अनकॅप्ड खेळाडूंवर 5 कोटी पेक्षाही जास्त रुपयांची बोली लागल्याचे बघायला मिळतेय. यापैकी समीर रिजवी याला 8.40 कोटी रुपयांना चेन्नईने खरेदी केले. शाहरुख खान याला गुजरात टाइटंस ने 7.40 रुपयांना खरेदी केले. कुमार कुशाग्र याला 7.20 कोटी रुपयांना दिल्ली कैपिटल्सने खरेदी केले. शुभम दुबे याला राजस्थान रॉयल्स संघाने 5.80 कोटी रुपयांना खरेदी केले. तसेच RCB ने यश दयाल याला 5 कोटी रुपयांना खरेदी केले.

रिली रोसो (Rilee Rossouw)

दक्षिण अफ्रीकेचा आक्रमक फलंदाज Rilee Rossouw याला IPL 2024 च्या या Auction च्या शेवटच्या राउंड मध्ये Punjab Kings टीमने 8 करोड रुपयांची बोली लावत आपल्या संघात सामील केले आहे. Delhi Capitals टीमनेही रिली रोसोला विकत घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, मात्र त्यांच्या खिशात जास्त पैसे नसल्याने अखेर Punjab Kings ने बाजी मारली आहे.

Share this Post:

संतोष चकोर हे एक लेखक आहेत. 2015 पासून ते डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब आणि ब्लॉगिंग या क्षेत्रातही काम करत आहेत. विशेषतः ते तंत्रज्ञान, आरोग्य आणि इतर क्षेत्रातील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. सध्या ते मराठीजन या आमच्या वेबसाइटवर संपादक आणि लेखक म्हणून काम करत आहेत आणि दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील अपडेट्स लिहितात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त