IPL 2024 : केकेआरने तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकल्यानंतर अंबाती रायुडूचा विराट कोहलीला टोमणा

IPL 2024: आयपीएल 2024 फायनल सामन्यात कोलकाताने हैदराबादवर मात करत 10 वर्षांनी तिसऱ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरले. आयपीएल 2024 च्या फायनलनंतर अंबाती रायुडूने कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंचे कौतुक केले. या दरम्यान त्याने ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या विराट कोहलीला टोमणा मारला. (IPL 2024: Ambati Rayudu Taunts To Virat Kohli After KKR Third Ipl Trophy Win)

IPL 2024 च्या फायनल सामन्यात कोलकाताने हैदराबादवर मात करत तिसऱ्यांदा IPL ची ट्रॉफी जिंकली. यावेळी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील KKR विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला. छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताने व्यंकटेश अय्यर आणि गुरबाज अहमद यांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे सामना जिंकला. रविवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात कोलकाताने बॉल आणि बॅट दोन्हीसह चमकदार कामगिरी केली आणि पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाला कधीही वरचढ होऊ दिले नाही. कोलकाताने याआधी 2014 च्या मोसमात पंजाब किंग्जचा पराभव करून शेवटचे विजेतेपद पटकावले होते आणि आता 10 वर्षांनंतर संघाने पुन्हा ट्रॉफीवर कब्जा केला आहे.

IPL 2024 KKR Won
IPL 2024 KKR Won

IPL 2024 ची ऑरेंज कॅप विराट कोहलीच्या नावावर राहिली. विराट कोहलीने या हंमाच्या सुरुवातीपासून ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडी होता आणि शेवटपर्यंत एकही फलंदाज त्याला मागे टाकू शकला नाही. मात्र यावेळीही तो आपल्या संघाला ट्रॉफीपर्यंत नेऊ शकला नाही. आता केकेआरने सनरायझर्स हैदराबादवर मात तिसऱ्यांदा नाव कोरल्यानंतर माजी खेळाडू अंबाती रायुडूने विराटच्या ऑरेंज कॅपबाबत असेच आणखी एक विधान केले आहे, जे खूप व्हायरल होत आहे. या हंगामात अंबाती रायडूच्या वक्तव्यांमुळे आरसीबीचे चाहते आणि त्याच्यात तणाव निर्माण झाला आहे.

IPL 2024 च्या फायनलनंतर अंबाती रायुडूने कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंचे कौतुक केले. या दरम्यान त्याने ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या विराट कोहलीला टोमणा मारला. अंबाती रायुडू म्हणाला की, “ऑरेंज कॅपने आयपीएल ट्रॉफी जिंकली जात नाही. ट्रॉफी जिंकण्यासाठी संघाचे सहकार्य आवश्यक आहे. केकेआरमध्ये मिचेल स्टार्क, आंद्रे रसेल आणि सुनील नरेन या सर्वांनी योगदान दिले आहे, हे आपण पाहू शकतो. त्यानंतर केकेआर ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाला आहे. ट्रॉफी जिंकण्यासाठी सर्व खेळाडूंना थोडेफार योगदान द्यावे लागते. एक ऑरेंज कॅप जिंकणारा खेळाडू कोणतीही ट्रॉफी जिंकत नाही.” अंबाती रायडूच्या या विधानानंतर आरसीबीचे चाहते पुन्हा एकदा संतापले आहेत.

विराट कोहलीने यंदाच्या आयपीएल हंगामात 15 सामने खेळले. या काळात विराटने 61.75 च्या सरासरीने 741 धावा केल्या. या हंगामात त्याच्या बॅटमधून 5 अर्धशतके आणि 1 शतक झळकले. विशेष बाब म्हणजे विराट कोहलीने 154.69 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या, ज्यात 62 चौकार आणि 38 षटकारांचा समावेश होता. या मोसमात सर्वाधिक अर्धशतके झळकावणाऱ्यांमध्ये विराट कोहली संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे. त्याचा संघ प्लेऑफ्समध्येही पोहोचला होता, पण एलिमिनेटर सामना गमावून या मोसमातून बाहेर पडला होता.

अंबाती रायुडू हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही फ्रँचायझींकडून खेळला आहे. त्याने दोन्ही संघांसाठी विजेतेपद पटकावली आहेत. रायडूने 2013, 2015, 2017 मध्ये मुंबईसाठी आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. यानंतर त्याने चेन्नईसाठी 2018, 2021, 2023 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. त्याने 175 आयपीएल सामन्यांमध्ये 3916 धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि 21 अर्धशतकांचा समावेश आहे.

Share this Post:

संतोष चकोर हे एक लेखक आहेत. 2015 पासून ते डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब आणि ब्लॉगिंग या क्षेत्रातही काम करत आहेत. विशेषतः ते तंत्रज्ञान, आरोग्य आणि इतर क्षेत्रातील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. सध्या ते मराठीजन या आमच्या वेबसाइटवर संपादक आणि लेखक म्हणून काम करत आहेत आणि दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील अपडेट्स लिहितात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त