How To Earn Money Online: आजकाल नव नवीन तंत्रज्ञान दररोज येत आहे. विशेषतः AI तंत्रज्ञानाने तर सध्या धुमाकूळ घातलाय. आता हजारोंच्या वर AI वेबसाईट आणि टूल्स उपलब्द आहे. याद्वारे तुम्ही ऑनलाईन घरबसल्या पैसे तर कामावूच शकतात पण त्याही पेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे या AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक कामे करणं सहज आणि सोप्पं झालंय. कोविड काळापासून अनेक लोक घरबसल्या पैसे कमावण्याचे विविध मार्ग शोधत असतात. तर आज नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण ऑनलाईन घरबसल्या अनेक कामे करू शकतो. याविषयीच आणि कोणते कोणते काम आपण घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने आणि तेही अगदी कमी भांडवलाची गुंतवणूक करून करू शकतो, याविषयी आपण माहिती बघूया. (How To Earn Money Online from Home)
ब्लॉगिंग (Blogging)
घरबसल्या ऑनलाईन पैसे कमावण्याचा सर्वांत सोप्पा मार्ग म्हणजे ब्लॉगिंग. यासाठी तुमच्याकडे फक्त कॉम्पुटर, लॅपटॉप किंवा स्मार्टफोन या तीन पैकी कोणतेही एक इलेक्ट्रोनिक डीव्हाईस असणे गरजेचे आहे. आणि त्यात इंटरनेट असावे. आजकाल तर स्मार्टफोन आणि इंटरनेट हे प्रत्येकाकडे असतेच. त्यामुळे कमी भांडवलात पैसे कमावण्याचा हा खूप चांगला मार्ग आहे. यात तुम्हाला ज्या विषयाची आवड आहे, त्या विषयात तुम्ही दररोज वेगवेगळे आर्टिकल किंवा ब्लॉग लिहू शकतात. यात काही वेबसाईट तर फ्री ब्लॉगिंगची सुविधा उपलब्ध करून देतात. त्यापैकीच एक म्हणजे गुगलचे ब्लॉगर (Blogger). यावर फ्री मध्ये तुम्ही ब्लॉग लिहू शकतात आणि याचा बातम्या देण्यासाठीही तुम्ही वापर करू शकतात. पुढे यावर तुम्ही गुगलच्या AdSense द्वारे जाहिराती लावून पैसे कमवू शकतात.
ब्लॉगिंग काही दिवस फ्री मध्ये वापरल्यानंतर जर तुम्हाला यात चांगला अनुभव आला तर तुम्ही काही पैसे गुंतवून स्वतःचे .in किंवा .com यासारखे डोमेन नेम विकत घेऊ शकतात. Hostinger किंवा GoDaddy यासारख्या वेबसाईट वरून तम्ही अगदी कमी पैशात वेबसाईट डोमेन विकत घेऊ शकतात. GoDaddy वर तर सध्या ऑफर चालू असल्याने यात तुम्हाला डोमेन नेमच पहिल्या वर्षी फक्त एक रुपया खर्च येतो. पण या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पूर्ण 3 वर्षासाठी डोमेन नेम विकत घ्यावे लागते.
तुमच्याकडे जर भांडवल म्हणून गुंतवणूक करण्यास अजून काही पैसे असतील किंवा काही महिने फ्री मध्ये वापरून चांगला अनुभव आल्यावर तुम्ही स्वतःचे होस्टिंग विकत घेऊन तुमच्या वेबसाईटला अतिशय चांगले आणि प्रोफेशनल रूप देऊ शकतात. यासाठी Hostinger ही सर्वांत लोकप्रिय असलेली वेबसाईट आहे जी तुम्हाला होस्टिंग सुविधा पुरवते. यात जर होस्टिंग घेतले तर तुम्हाला एक वर्षासाठी डोमेन नेम सुद्धा फ्री मध्ये मिळते. प्रती महिना फक्त 149 रुपयांत तुम्ही यावर होस्टिंग घेऊ शकतात. जर तुम्हाला तुमची जुनी वेबसाईट आणि जुने डोमेन नेम कायम ठेवून फक्त होस्टिंग बदलायची असेल तर तुम्ही येथे Hostinger वर ते सुद्धा करू शकतात.
Affiliate Marketing
यात जर तुम्ही टेक्निकल वस्तू किंवा ऑनलाईन शॉपिंग मध्ये विकल्या जाणाऱ्या वस्तूंचा रिव्यू तुमच्या वेबसाईट किंवा ब्लॉगवर लिहित असाल, तर गुगलच्या AdSense सोबतच तुम्ही अजून एका मार्गाने पैसे कमवू शकतात ते म्हणजे Affiliate Marketing. यासाठी तुम्हाला Flipkart किंवा Amazon या सारख्या शॉपिंग वेबसाईटवर आपले Affiliate खाते उघडावे लागेल. तुमच्या वेबसाईटवर त्या वस्तूचे रिव्यू किंवा माहिती बघून तुम्ही दिलेल्या लिंक द्वारे लोकांनी ती वस्तू शॉपिंग वेबसाईटवरून खरेदी केल्यास याचे काही टक्के कमिशन तुम्हाला मिळते.
Sponsorship
या सोबतच तुमची वेबसाईट किंवा ब्लॉग जर जास्त फेमस झाला तर तुम्हाला Sponsorship च्या ऑफर सुद्धा मिळतात. याद्वारे अनेक लोक तुमच्याशी ऑफलाईन संपर्क साधून त्यांच्या वस्तू तुमच्या वेबसाईटवर प्रमोट करायला सांगतात, किंवा तुम्हाला ते त्यांच्या वस्तू देवून त्याचे रिव्यू करायला सांगतात. याचे ते तुम्हाला पैसेही देतात. याद्वारेही तुमची चांगली कमाई होऊ शकते.
युट्युब (YouTube)
आजकाल सर्वांकडे स्मार्टफोन असल्याने ऑनलाईन पैसे कमावण्याचा अजून एक सोप्पा आणि सहज करता येईल असा मार्ग म्हणजे युट्युब वर व्हिडीओ अपलोड करणे. फक्त हे व्हिडिओ तुम्ही स्वतः बनवलेले असावे म्हणजेच दुसऱ्याचे Copyright असलेले व्हिडिओ असू नये. तसेच YouTube ने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करू नका. हे काही नियम पाळून तुम्ही युट्युब वरून लाखो रुपये कमवू शकतात. यासाठी तुम्हाला YouTube वर तुम्हाला एक चैनेल बनवावा लागतो. Gmail वर खाते उघडून तुम्हाला युट्युबवर चैनेल बनवता येईल. युट्युब वर चैनेल बनवल्यानंतर तुम्हाला आवड असलेल्या विषयांवर तुम्ही व्हिडिओ बनवू शकतात. युट्युबने ठरवून दिलेल्या सर्व पात्रता पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमच्या व्हिडिओवर गुगलच्या AdSense द्वारे जाहिराती लावून पैसे कमवू शकतात. (YouTube Monetization Eligibility Criteria)
युट्युब वरून Google AdSense साठी अप्लाय करण्याआधी तुमच्या चैनेलचे 500 सबस्क्राईबर आणि शेवटच्या 90 दिवसांत कमीत कमी 3 व्हिडिओ अपलोड केलेले असावे किंवा 3000 Public Watch Hours किंवा 3 मिलियन Public Shorts Views या काही पात्रता पूर्ण करणे गरजेचे आहे.
तुमचा युट्युब जर चांगला फेमस झाला तर मग तुम्ही ब्लॉगिंग सारखेच येथेही Affiliate Marketing आणि Sponsorship द्वारे लाखो रुपये कमवू शकतात. वर दिल्याप्रमाणे अगदी ब्लॉगिंग सारखीच प्रोसेस तुम्हाला येथेही करायची आहे. फक्त ब्लॉगिंग करतांना तेथे तुम्हाला लेख लिहायचे होते आणि येथे युट्युबवर तुम्हाला व्हिडिओ बनवावे लागतात.
फ्रीलांसिंग (Freelancing)
घरबसल्या ऑनलाईन पैसे कमावण्यासाठी Freelancing हा एक चांगला पर्याय आहे. याला एक प्रकारे online contract job असंही म्हणता येईल. पण यासाठी तुमच्याकडे काही कॉम्पुटर स्कील असणे गरजेचे आहे. हे स्कील म्हणजे Graphic design, Writing, Editing, Photography, Videography, Data entry, Website design, Gig work, Financial support, Marketing, Software programming, Sales, असे काही कमी वेळेत पूर्ण करण्याचे काम असतात. ज्याला short-term work असेही म्हणतात. यातील एखाद्या कामाचे स्कील जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही काही वेबसाईटवर नोंदणी करून आपली एक चांगली प्रोफाईल बनवू शकतात. यासाठी UpWork, LinkedIn, Craigslist, Fiverr अशा काही वेबसाईट आहे ज्यावर तुम्ही Freelancing job साठी नोंदणी करू शकतात.
इन्स्टाग्राम आणि फेसबुक (Instagram & Facebook)
युट्युब प्रमाणेच Instagram आणि Facebook वर शॉर्ट व्हिडिओ बनवून तुम्ही पैसे कमवू शकतात. येथेही तुम्ही Affiliate Marketing आणि Sponsorship द्वारे लाखो रुपये कमवू शकतात. तसेच फेसबुकवर तर दिलेल्या पात्रता पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमच्या व्हिडिओवर युट्युब प्रमाणे जाहिराती लावून पैसे कमवू शकतात.
AI टूल्स (AI Tools)
आजकाल अनेक AI टूल्स उपलब्द आहे. या AI चा वापर करून तुम्ही जे विचार करताय त्याप्रमाणे फोटो किंवा व्हिडीओ बनवून ते व्हिडीओ प्लॅटफॉर्म वेबसाईटवर अपलोड करून पैसे कमवू शकतात. आता तर AI च्या मदतीने तुम्ही एक अनिमेशन चित्रपट आणि म्युझिक सुद्धा बनवू शकतात. AI च्या मदतीने तुम्ही वेबसाईट डिझाईन सुद्धा करू शकतात. त्यामुळे AI च्या सहाय्याने तुम्ही लाखो रुपये अगदी घरबसल्या कमवू शकतात. पण याचा दुरुपयोग करणे टाळावे. AI उपयोग चांगल्या कार्यासाठी केला तर नक्कीच याचा तुम्हाला आर्थिक फायदा होईल.
शेअर मार्केट (Stock Markets)
तुम्हाला शेअर मार्केटचा जर चांगला अनुभव असेल तर तुम्ही Stock Markets मध्ये विविध कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी-विक्री करून पैसे कमवू शकतात. पण येथे तुम्हाला अगोदर त्या शेअर्स (Stock) मध्ये पैसे गुंतवून ते शेअर्स विकत घ्यावे लागतात आणि योग्य वेळी त्यांचे भाव वाढताच ते विकावे लागतात. हे सर्व तुम्ही घरबसल्या ऑनलाईन करू शकतात. यासाठी काही स्मार्टफोन App द्वारे तुम्ही गुंतवणूक करू शकतात. त्यासाठी फेमस App आहे Groww, Angel One, Paytm Money, Zerodha Kite, Upstox, 5paisa, ICICI Direct हे भारतातील काही Best Trading Apps आहे. या Apps च्या माध्यमातून तुम्ही Stock Markets मध्ये Invest करू शकतात.
पण लक्षात घ्या की शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवण्यात खूप जोखीम सुद्धा आहे. कारण तुम्ही घेतलेल्या शेअर्सचे भाव कधी वाढू शकतात तर कधी कमीही होऊ शकतात. हे एकाच दिवसात वारंवार होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही भाव वाढतील या आशेने घेतेले शेअर्सचे भाव अजून कमी होऊ शकतात. अशा वेळी जर तुम्ही ते शेअर्स विकले तर तुम्हाला नुकसान सुद्धा होऊ शकते. म्हणूनच शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करतांना खूप काळजीपूर्वक गुंतवणूक करा.
उत्पादनांची पुनर्विक्री (Reselling Products)
आजकाल अनेक महिला घरबसल्या उत्पादनांची पुनर्विक्री करून पैसे कमावतात. हे काम ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करता येतात. उत्पादनांची पुनर्विक्री म्हणजेच Reselling Products द्वारे कमिशनच्या माध्यमातून लाखो रुपये कमावता येतात. विशेषतः महिला यातून पैसे कमवतांना दिसतात. अनेक महिला साड्या, कपडे, ज्वेलरी हे Products ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट वरून मागवतात आणि ते आपले कमिशन लावून ऑनलाईन किंवा ऑफलाईन Resell करतात. यासाठी महिला खासकरून Meesho हे App वापरतांना दिसतात. पण फक्त महिलाच नाही तर पुरुष सुद्धा हे काम ऑनलाईन करू शकतात. यासाठी Meesho सोबतच GlowRoad, Flipkart, Amazon, Shop 101, eBay, Cartlay, OLX India, Quikr, OfferUp, Shopee, resale, Decluttr यासारखे काही वेबसाईट आणि App आहे ज्याद्वारे तुम्ही हा Reselling चा उद्योग घरबसल्या ऑनलाईन सुरु करू शकतात.
ऑनलाईन शिकवा किंवा कोर्स विका (Teach or Sell Courses Online)
कोविड नंतर ऑनलाईन शिक्षणाचे जाळे आता जगभर पसरले आहे. एखादा शिक्षक त्याच्या घरात बसून जगभरातील अनेक विध्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवू शकतो किंवा तो त्याचे रेकॉर्ड केलेले कोर्स ऑनलाइन विकू शकतो. यातून त्या शिक्षकाला लाखो रुपये मिळतात. सध्या हा उद्योग खूप मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यात अनेक शैक्षणिक क्लासेस, डिजिटल मार्केटिंग क्लासेस, शेअर मार्केट किंवा इतर फायनान्सीयल क्लासेस, असे वेगवेगळ्या विषयांतील क्लासेस आता ऑनलाईन घेतले जातात. अशा काही वेबसाईट आहे की ज्याद्वारे तुम्ही ऑनलाईन शिकवून पैसे कमवू शकतात. या वेबसाईट म्हणजे Vedantu, BYJU’S, Chegg, Khan Academy, Toppr, Udemy, WizIQ, Teachable, Udacity, Coursera, अशा काही वेबसाईट आहे ज्याद्वारे शिकवून तुम्ही ऑनलाईन पैसे कमवू शकतात. तसेच अशाही काही वेबसाईट आहे की ज्यावर तुम्ही तुमचे रेकॉर्ड केलेले कोर्स विकून पैसे कमवू शकतात. Udemy, Skillshare, Thinkific, Teachable, Ruzuku, LearnDash, Podia, Kajabi, अशा काही वेबसाईट आहे ज्यावर तुम्ही तुमचे कोर्स विकू शकतात. किंवा तुम्ही स्वतः ही सोशल मिडियाद्वारे मार्केटिंग करून तुमचे कोर्स विकू शकतात.
हे काही उद्योग आहे ज्याद्वारे घरबसल्या काम करून ऑनलाईन तुम्ही हमखास आणि चांगले पैसे कमवू शकतात. पण इतरही अनेक मार्ग आहे की ज्याद्वारे तुम्ही ऑनलाईन पैसे कमवू शकतात. उदा. रेफरिंग (Refer and Earn). पण या मार्गांद्वारे तुम्हाला कमी प्रमाणात पैसे मिळतात. कारण यात मेहनत सुद्धा फारच कमी असते. म्हणूनच जास्तीत जास्त पैसे हवे असेल तर वर दिलेल्या वेबसाईटवर काम करा. याचा तुम्हाला नक्कीच चांगला आर्थिक फायदा होईल.