Side Effects of Brinjal: भारतामध्ये अनेकांची नेहमी आणि सर्वाधिक वेळा खाण्यात येणारी प्रसिद्ध भाजी कोणती असं म्हटलं तर ती वांगे-बटाटयाची भाजी (Aloo Baingan). संपूर्ण भारतात जवळजवळ प्रत्येकाच्याच घरात ही भाजी बनवली जाते. यापैकी वांगी तर अनेकांना खायला आवडतात. पण खरंच वांगी खाणे हे तितके सुरक्षित आणि आरोग्याच्या दृष्टीने तितके चांगले आहे का? वांगी कुणी खावी आणि कुणी नाही? याबद्दलच आज आपण माहिती बघूया.
वांग्याची भाजी खाण्याचे फायदे (Health Benefits of Brinjal)
वांगे बटाटयाची भाजी ही तर भारतातील सर्वांत प्रसिद्ध भाजी. यापैकी वांग्याला तर भारतात भाज्यांचा राजा असंही म्हटलं जातं. कारण इतर कोणत्याही भाजीसोबत वांगी कापून टाकले की त्याची छान भाजी होते. या भाजीत योग्य प्रमाणात मसाले टाकले तर त्याची अप्रतिम चव लागते. त्यामुळेच भारतातील जवळजवळ प्रत्येकच घरात वांग्याची भाजी नेहमीच बनवली जाते. त्यात विशेष म्हणजे ही भाजी तुम्हाला प्रत्येक हंगामात आणि स्वस्त दरात उपलब्ध होत असते. हिवाळ्यात तर वांग्याची भाजी खाण्याचे अनेक फायदे सांगितले जातात. थंडीच्या दिवसात वांगे खाल्यास वजन कमी होते असंही म्हटलं जातं. तसेच रक्तातील साखर आणि हृदयविकारही नियंत्रणात ठेवण्यास मदत होते असंही याच्या फायद्यांमध्ये सांगितलं जातं.
वांग्याची भाजी खाण्याचे असे काही फायदे सांगितले असले तरीही वांग्याची भाजी खाणे प्रत्येकासाठीच फायदेशीर ठरत नाही. काहींचे तर यामुळे खूप मोठे शारीरिक नुकसान होऊ शकते. म्हणूनच काही लोकांनी तर ही भाजी चुकुनही खाऊ नये, अन्यथा आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
यांनी चुकुनही वांग्याची भाजी खाऊ नये (Side Effects of Brinjal)
वांग्याच्या भाज्यांपैकी वांगे-बटाटा, वांग्याचे भरीत, वांग्याची मसालेदार रस्सा असलेली भाजी तसेच भरलेली वांगी हे भारतात अनेकांचे आवडते भाजी प्रकार आहे. वांगे खाल्ल्याने काही लोकांच्या शरीरात ऍलर्जी निर्माण होऊ शकते. त्यापैकी विशेष म्हणजे तुमच्या अंगाला खाज येण्याची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच घशात खाज सुटणे, अंगभर त्वचेवर पुरळ उठणे, अस्वस्थता निर्माण होणे आणि घसा खवखवणे अशाही समस्या निर्माण होऊ शकतात.
वांगे खाल्याने आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे ज्यांना अगोदर पासूनच पित्ताचा त्रास आहे अशा लोकांनी वांगी खाऊ नये. नाहीतर त्यांची पित्ताची समस्या अजूनच वाढू शकते. तसेच किडनी स्टोन म्हणजेच मुतखड्याचा अगोदर पासूनच त्रास असणाऱ्या लोकांनी वांगे खाऊ नये. कारण वांग्यात ऑक्सलेट नावाचे तत्व आढळते, त्यामुळे वांगे खाल्याने किडनी स्टोनची समस्या अजूनच वाढू शकते.
ज्या लोकांना गॅस-अॅसिडिटीची समस्या असते किंवा ज्यांचे पोट नेहमी खराब असते अशा लोकांनी वांग्याची भाजी खाऊ नये. तसेच ज्या लोकांना डोळ्यांची जळजळ होत असल्याची समस्या असते अशा लोकांनी वांगे खाऊ नये. अशा लोकांसाठी वांगे खाणे खूप नुकसानकारक ठरू शकते. वांगे खाल्याने त्यांना डोळ्यांत जळजळ होण्याची समस्या अधिक वाढू शकते आणि डोळ्यांत वेदना होऊन सूज सुद्धा येऊ शकते. तसेच काही लोकांना डोळ्यांची नजर कमजोर होण्याची समस्याही निर्माण होऊ शकते.
जगातील सर्वांत खराब भाज्यांपैकी एक
वांगे-बटाटयाची भाजी ही अनेकांची फेवरेट भाजी आहे. परंतु वांगे खाल्ल्याने होणारे नुकसान बघता काही आरोग्य विषयक समस्या असलेल्या लोकांनी वांगे न खाणेच अधिक चांगले आहे. पण यासोबतच आता वांगे-बटाटयाची भाजी ही आता जगातील सर्वांत खराब भाज्यांपैकी एक भाजी ठरली ठरली आहे. याबद्दल नुकतंच एक अहवाल समोर आला आहे. ‘टेस्ट अॅटलस’ (Taste Atlas) यांनी जगातील सर्वात खराब रेटिंग असलेल्या 100 खाद्यपदार्थांची सूची जारी केली आहे. जगातील सर्वात निकृष्ट दर्जाचे आणि खराब खाद्यपदार्थ कोणते हे शोधण्यासाठी एक सर्वेक्षण करण्यात आले होते, त्याच सर्वेक्षणाच्या आधारे जगातील सर्वांत खराब 100 भाज्यांची ही यादी तयार करण्यात आली आहे. (Aloo Baingan is worst rated food in the world)
जगातील सर्वांत खराब भाज्यांच्या या यादीत भारताची वांगे-बटाटयाची भाजी देखील शामिल आहे. 1 ते 100 पैकी ही भाजी 60 व्या क्रमांकावर आहे. यात वांगे-बटाटयाच्या भाजीला 5 पैकी केवळ 2.7 रेटिंग मिळाले आहे. पण यात चांगली गोष्ट अशी की जगातील सर्वात खराब रेटिंग असलेल्या 100 खाद्यपदार्थांच्या या यादीमध्ये भारताच्या एकाच भाजीचा समावेश आहे. म्हणजेच वांगे-बटाटयाची भाजी वगळता इतर सर्व भारतीय भाज्या चांगल्या असून जगभरात पसंत केल्या जातात त्याचे हे उदाहरण आहे.
तर अशा प्रकारे वांगे खाण्याचे काही फायदे तर अनेक नुकसान देखील आहे. आणि आता तर वांगे-बटाटयाची भाजी ही जगातील सर्वांत खराब भाज्यांपैकी एक ठरली आहे. म्हणूनच वर दिलेल्या आरोग्य विषयक समस्या असलेल्या लोकांनी वांगे खाणे टाळावे. हेच त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल.
Health Disclaimer: आरोग्य विषयक या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून याबद्दल खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी मराठीजन (marathijan.com) हि आमची वेबसाईट किंवा यातील लेखक घेत नाही. लोक आरोग्याबाबत जागरूक असावे आणि त्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी एवढाच या बातमी मागचा आमचा उद्देश आहे.
Health Disclaimer: The information given in this article/post regarding health is preliminary. This information is not a substitute for medical advice and should be checked by a doctor or medical specialist before using this information. Marathijan (marathijan.com) neither our website nor its author takes responsibility for this information. Our aim behind this news is to make people aware about health and inspire them for it.