Non-Veg Side Effects: मांसाहार करणाऱ्यांनो सावधान! चिकन मटन खाल्याने होऊ शकतात हे गंभीर आजार

Non-Veg Side Effects on Human Body: आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे अनेक लोक त्यांच्या शरीराला पुरेसा वेळ देण्यास असमर्थ ठरतात. यामुळे आता फार कमी वयातच लोकांना विविध प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणूनच निरोगी आणि तंदुरुस्त जीवनासाठी आपल्या दररोजच्या आहाराकडे लक्ष देणे खूप गरजेचे बनले आहे.

पूर्वी माणूस हा जंगलात राहत असे, तेव्हा आपल्याकडे खाण्याचे जास्त पर्याय उपलब्ध नव्हते. तेव्हा तर शाकाहार आणि मांसाहार असा कोणताही प्रकार नव्हता. कारण जंगलात राहणारे सर्वच मनुष्य मांसाहारी होते असं म्हटलं जातं. आपल्या उदरनिर्वाहासाठी माणूस जंगलातील फळे खाऊन आणि इतर प्राण्यांची शिकार करून जीवन जगत असे. पण मांसाहार केला तरीही तेव्हा जंगलातील मनुष्य जास्त निरोगी होता कारण तेव्हा मनुष्य खूप मेहनत घेत असत. यामुळे खाल्लेले मांस सहज पचवले जात होते.

पुढे मानवाला शेतीचा शोध लागला आणि खाण्याचे असंख्य पर्याय उपलब्ध झाले. त्यानंतर मानव शाकाहाराकडे वळू लागला. आजकाल तर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने शाकाहारी होणे हे अधिक चांगले मानले जाते. त्याचे कारण म्हणजे आजकाल मनुष्य पूर्वीसारखे ज्यादा मेहनत घेत नाही. सध्याच्या ऑफिस संस्कृतीमध्ये अनेक लोकांचे तर दिवसभर बसून काम असते. मग मांस पचवणे फार अवघड बनते. याचे शरीरावर अनेक वाईट परिणाम होतात. याविषयी आपण खाली माहिती दिलेली आहे. तसेच मांसाहार नाही तर मग काय खायला हवे याविषयी सुद्धा काही माहिती खाली दिलेली आहे.

हाडे कमकुवत होऊ शकतात

जवळजवळ सर्वच लोक प्रथिनांचा म्हणजेच प्रोटीनचा (protein) चांगला स्रोत म्हणून प्राण्यांचे मांस खातात. पण हेल्थ लाइनच्या एका अहवालानुसार वनस्पती आधारित प्रथिनऐवजी प्राणी आधारित प्रथिनांचे सेवन करणे आरोग्यासाठी अधिक धोकादायक असू शकते. कारण प्राण्यांचे मांस खाल्याने तुमची हाडे कमकुवत होऊ शकतात. तसेच जे लोक मांस खाणे नियंत्रित करू शकत नाहीत किंवा जे लोक जास्त प्रमाणात आणि सतत मांस खातात, त्यांना हाडाचे फ्रॅक्चर आणि ऑस्टिओपोरोसिसचा (Osteoporosis) धोका जास्त वाढतो.

आहारतज्ञ अंजली मुखर्जी (Nutritionist Anjali Mukherjee) यांनी असं म्हटलंय की हाडांच्या आरोग्यासाठी प्रथिने आवश्यक आहेत, परंतु जास्त प्रमाणात प्राणी आधारित प्रथिने विशेषत: लाल मांस (Red Meat) हाडांना हानी पोहोचवू शकतात. उच्च प्रथिनेयुक्त आहार तुमच्या हाडांवर परिणाम करतो आणि यामुळे तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता देखील होऊ शकते. लाल मांसामुळे आपले रक्त आम्लयुक्त बनते आणि हाडांपासून कॅल्शियम तयार होण्याचे कारण बनते, ज्यामुळे हाडे कमकुवत होऊ शकतात. म्हणून आपण मर्यादित प्रमाणात मांस सेवन केले पाहिजे. तसेच आपण आपल्या आहारात दुग्धजन्य पदार्थ आणि वनस्पती आधारित प्रथिनांचा अधिक समावेश केला पाहिजे. भरपूर फळे, भाज्या आणि कडधान्ये खाऊन तुमच्या शरीराला आवश्यक असलेली प्रथिने तुम्ही मिळवू शकता.” असं आहारतज्ञ अंजली मुखर्जी यांनी सांगितलंय.

पचनसंस्थेवर भार वाढतो

जास्त मांस खाल्ल्याने पचनसंस्थेवर (Digestive System) भार वाढतो. मांस पचवण्यासाठी शरीराला खूप मेहनत करावी लागते. त्यामुळे थकवा वाढतो. जे लोक सतत मांस खातात त्यांना काही दिवसाने जास्त थकवा जाणवू लागतो. तसेच मटणामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे रक्त घट्ट होते आणि शरीर डिहाइड्रेट होते. जेव्हा असे होते, तेव्हा तुम्हाला डोकेदुखी जाणवू शकते.

हार्मोण असंतुलित होतात

दुकानदार कोंबडी जास्त काळ टिकवण्यासाठी ऑक्सिटॉसिनचे (Oxytocin) इंजेक्शन देतात. म्हणूनच चिकन जास्त खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. जास्त चिकन खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील ऑक्सिटॉसिनचे प्रमाण वाढते. यामुळे महिलांमधील DNA आणि हार्मोण असंतुलित होतात आणि प्रजननाची समस्या निर्माण होते. पुरुषांमध्येही शुक्राणू कमी होतात.

ब्रॉयलर चिकन अधिक धोकादायक

ब्रॉयलर चिकन (broiler chicken) म्हणजेच कोंबड्यांची वाढ लवकर होण्यासाठी पोल्ट्री फार्म (Poultry farm) मध्ये त्यांच्या आहारात मोठ्या प्रमाणावर केमिकल्स आणि अँटिबायोटिक्सचा (Antibiotics) समावेश केला जातो. यामुळे अवघ्या 40 दिवसांत त्या कोंबड्यांची वाढ होत असते. पण या कृत्रिम पद्धतीने वाढवलेल्या कोंबड्यांचे मांस आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतं. हे ब्रॉयलर चिकन उच्च तापमानाला शिजवल्यानंतर कॅन्सरचा धोका असल्याचे काही संशोधनात म्हटले आहे.उदा. ग्रिल्ड चिकन (Grilled Chicken). मुळात चिकन जास्त शिजवल्यामुळं त्यातील प्रोटिनची मात्रा कमी झालेली असते, त्यामुळं ते आरोग्यासाठी हानीकारक असतं असंही या संशोधनांत म्हटलंय. तसेच ब्रॉयलर चिकनचा एक लेगपिस हा 60 सिगारेट इतकाच धोकादायक असू शकतो असंही म्हटलं जातं. (Broiler Chicken Side Effects on Human Body).

ब्रॉयलर कोंबड्यांना वजनावर जास्त किंमत मिळते, म्हणून त्यांचे वजन जास्त आणि पटकन वाढावे यासाठी त्यांना इंजेक्शन्सही दिले जातात. यामुळे त्यांच्या शरिरात अनेक हानीकारक केमिकल्सचा शिरकाव झालेला असतो. आणि पुढे त्याच कोंबडीचे मांस आपण खल्ल्यास ते केमिकल्स आपल्या शरिरात सुद्धा प्रवेश करतात. यामुळे लठ्ठपणाबरोबरच, पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता कमी होणे, मुलींमध्ये वयात येण्याविषयीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. ब्रॉयलर चिकनमध्ये बॅड फॅट्स मोठ्या प्रमाणावर आढळतात. त्यामुळे लठ्ठपणा, उच्च रक्तदाब यांसारख्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

ब्रॉयलर चिकनच्या वाढीसाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर अँटिबायोटिक्स दिली जातात. त्यामुळे आपण आठवड्यातून जितक्या वेळा ब्रॉयलर चिकन खात असतो तितक्या वेळा ते अँटिबायोटिक्स इंजेक्शन आपण स्वतःला टोचून घेतल्यासारखे असल्याचे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

कॅन्सर होण्याचा धोका

रेड मीट आणि प्रोसेस्ड मीट (Processed meat) यांच्या अतिसेवनामुळे आतड्यांचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो हे मागील अनेक अभ्यास आणि संशोधनातून सिद्ध झाले आहे. परंतु या अभ्यासातून पहिल्यांदाच असे समोर आले आहे की मांसाचे अतिसेवन त्या 25 गैर-कर्करोगजन्य आजारांशी संबंधित आहे, ज्यामुळे बहुतेक लोक रुग्णालयात दाखल होतात.

पोल्ट्री मांस (poultry meat) जास्त खाणाऱ्या लोकांमध्ये Gastro-oesophageal reflux disease (GERD), Gastritis, Duodenitis, Diverticular disease, Gall Bladder Disease आणि Diabetes होण्याचा धोका जास्त असतो.

इम्यूनिटीही कमी होते

रेड मीट असो किंवा प्रोसेस्ड मीट या दोन्हीमध्येही भरपूर प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट (Saturated fat) असते. या प्रकारची चरबी अँटिऑक्सिडंट्स न बनण्याच्या प्रमाणावर प्रभाव पाडते. याशिवाय, यामुळे इनफ्लेमेशन (Inflammation) होण्याचा धोका देखील वाढतो. त्यामुळे जास्त मांस खाणाऱ्यांची इम्यूनिटी (Immunity) म्हणजेच रोगप्रतिकार शक्ती कमी होते. त्यामुळेच चांगल्या आरोग्यासाठी आठवड्यातून 3 वेळापेक्षा कमी मांस खाण्याचा सल्ला दिला जातो.

हृदयविकाराचा धोका

मांसामध्ये भरपूर कार्बोहाइड्रेट्स आणि फैट (Carbohydrates and fat) असतात. त्यामुळे हृदयविकाराचा (Heart disease) धोका तीन पटीने वाढू शकतो. मांस खाल्ल्याने खराब कोलेस्टेरॉल म्हणजेच LDL झपाट्याने वाढते.

9 वेगवेगळ्या प्रकारचे आजार होण्याचा धोका

जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने देखील हे अनेकदा सांगितले आहे की जास्त मांस, विशेषत: लाल मांस आणि प्रक्रिया केलेले मांस खाल्ल्याने आरोग्यास गंभीर हानी होऊ शकते. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या बीएमसी मेडिसीन या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या नवीन अभ्यासातून असे समोर आले आहे की जर एखाद्या व्यक्तीने आठवड्यातून 3 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस लाल मांस, प्रक्रिया केलेले मांस आणि पोल्ट्री मीट (Poultry Meat) म्हणजेच चिकन खाल्ले तर त्याला 9 वेगवेगळ्या प्रकारचे आजार होण्याचा धोका आहे.

या अभ्यासात ब्रिटनमधील 4 लाख 75 हजार मध्यम वयाच्या लोकांचा समावेश करण्यात आला होता. यावेळी, संशोधकांनी या लोकांच्या आहाराची तसेच मेडिकल रिकॉर्ड आणि रुग्णालयात भर्ती होण्याची आणि यापैकी काहींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा सर्व डेटा तपासला. हा अभ्यास एकूण 8 वर्षे चालला. या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ज्या यापैकी ज्या लोकांनी आठवड्यातून 3 दिवस किंवा त्याहून जास्त दिवस मांस खाल्ले त्यांचे आरोग्य कमी मांस खाणार्‍यांपेक्षा जास्त खराब झाले होते.

अकाली मृत्यूचा धोका

अनेक आहारतज्ज्ञांनी मांसाहार करणाऱ्यांना त्यांच्या आहारात लाल मांस, चिकन आणि त्या संबंधित इतर प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. कारण यामुळे Obesity, Ischemic Heart Disease, Pneumonia, Diverticular Disease, Colon Polyps, Diabetes आणि cancer ई आजार होण्याचा धोका असतो. तसेच मांसचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने आयुर्मानही कमी होते. अनेकांना अकाली मृत्यूचा धोकाही निर्माण होतो. असंही अनेक संशोधनांतून समोर आले आहे. यापैकी काहींची माहिती आपण या लेखात बघितली आहे.

मांसाहार नाही तर मग काय खावे?

तर आता मांस किंवा चिकन खाण्याने आपल्या शरीरात निर्माण होणारे हे आजार बघता आपण मांसाहार नाही तर मग काय खावे? असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. अनेक आहारतज्ज्ञ शाकाहारासोबत मासे किंवा ऑरगॅनिक चिकन (Organic Chicken) खाण्याचा सल्ला देतात. पण आजकाल बिना केमिकल युक्त ऑरगॅनिक चिकन शोधणे फार अवघड आहे. कारण काही लोक ऑरगॅनिक चिकनच्या नावाखाली केमिकल इंजेक्शन दिलेले चिकन विकतात. किंवा त्या चिकनला अगोदरच काही आजार असतात. त्यामुळे असे चिकन खाल्ल्याने आपल्या शरीरावर खूप वाईट परिणाम होऊ शकतात.

तर मांस किंवा चिकन खाण्यापेक्षा शाकाहारात आज अनेक पर्याय उपलब्ध आहे. प्राण्यांचे मांस खाण्याऐवजी आहारात धान्य, शेंगा, हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, दुग्धजन्य पदार्थ, फळे आणि काजू हे आपल्याकडे अगदी सहज उपलब्ध होणारे पदार्थांचा खाण्यात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच क्विनोआ (Quinoa – हे एक प्रकारच्या बिया आहे), टोफू (Tofu -सोयाबीनच्या दुधापासून बनवलेले चीज), राजगिरा, कुट्टू (buckwheat), चिया बियाणे (chia seeds) ई हे पदार्थ प्रोटीनचा खूप चांगला स्रोत आहे. त्यामुळे मांसाहार खाण्यापेक्षा हे पदार्थ खाणे शरीरासाठी अधिक लाभदायक ठरेल.

Health Disclaimer: आरोग्य विषयक या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून याबद्दल खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी मराठीजन (marathijan.com) हि आमची वेबसाईट किंवा यातील लेखक घेत नाही. लोक आरोग्याबाबत जागरूक असावे आणि त्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी एवढाच या बातमी मागचा आमचा उद्देश आहे.

Health Disclaimer: The information given in this article/post regarding health is preliminary. This information is not a substitute for medical advice and should be checked by a doctor or medical specialist before using this information. Marathijan (marathijan.com) neither our website nor its author takes responsibility for this information. Our aim behind this news is to make people aware about health and inspire them for it.

Share this Post:

संतोष चकोर हे एक लेखक आहेत. 2015 पासून ते डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब आणि ब्लॉगिंग या क्षेत्रातही काम करत आहेत. विशेषतः ते तंत्रज्ञान, आरोग्य आणि इतर क्षेत्रातील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. सध्या ते मराठीजन या आमच्या वेबसाइटवर संपादक आणि लेखक म्हणून काम करत आहेत आणि दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील अपडेट्स लिहितात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त