MJPJAY – Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana: महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजना आहे. या योजनेंतर्गत काही आजारांवर शासकीय व खाजगी अंगीकृत रुग्णालयांमार्फत पात्र नागरिकांना नि:शुल्क वैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहेत. आता राज्यातील आरोग्य विमा योजनेची (Health Insurance) व्याप्ती वाढवण्यात आली आहे. राज्यातील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि केंद्राची आयुष्यमान भारत (Ayushman Bharat Yojana) या दोन योजनांचे एकत्रिकरण करण्यात आली आहे. यानुसार आता राज्यातील नागरिकांना 5 लाखांपर्यंत विमा कवच मिळणार आहे. या अगोदर हे विमा कवच 1.5 लाखांपर्यंत होते. तसेच आजार आणि रुग्णालयांची संख्या देखील वाढवण्यात आली आहे. या सोबतच 2 लाख कोटी लोकांना आरोग्य विम्याचे कार्ड वितरित करण्यात येणार आहेत.
तर आज आपण Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana या योजनेचे लाभ घेण्यासाठी पात्रता काय?, MJPJAY आजारांची यादी आणि हॉस्पिटल यादी (Disease List & Hospital List), या योजनेची इतर माहिती कुठे मिळेल? तसेच या योजने संबंधी ABHA Card कसे काढायचे? याबद्दलची सविस्तर माहिती या लेखात बघूया.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही योजना पूर्वी ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ या नावाने ओळखली जात होती. पण पुढे दि. 14 डिसेंबर, 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार योजनेचे नाव बदलून ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ असे करण्यात आलेले आहे. या योजनेंतर्गत राज्यातील 12.50 कोटी नागरिकांना नि:शुल्क वैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहेत.
मूत्रपिंड शस्त्रकियेसाठी उपचार खर्चाची मर्यादा
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत सध्या मूत्रपिंड शस्त्रकियेसाठी (Kidney surgery) असलेली 2.5 लाख रुपयांची उपचार खर्चाची मर्यादा वाढवून ती आता 4.5 लाख रुपये एवढी करण्यात आली आहे. अगोदर महात्मा फुले योजनेत 996 तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत 1209 उपचार समाविष्ट होते. पण यापैकी मागणी नसलेले 181 उपचार वगळण्यात आले आहे. आणि 328 नवीन उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत एकूण उपचार संख्येत 147 वाढ होऊन, ती आता 1356 एवढी झाली आहे. हे जादाचे उपचार महात्मा जोतिराव फुले योजनेत देखील समाविष्ट होतील. त्यामुळे या योजनेत उपचार संख्या 360 ने वाढली आहे. तसेच या दोन्हीही आरोग्य योजनांमधील रुग्णालयांची संख्या एक हजार इतकी आहे.
विमा कंपनी: युनायटेड इंडिया इन्श्युरन्स
सदर योजना दि. 2 जुलै, 2012 ते दि. 31 मार्च, 2020 या कालावधीमध्ये’ नॅशनल इन्श्युरन्स कंपनी’ या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत होती. पण आता दि. 1 एप्रिल, 2020 पासून एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या ‘युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनी’ या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे.
जिल्हानिहाय हॉस्पिटलची यादी
महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये जवळपास विविध आजारांवर उपचार करण्यासाठी शासकीय व खाजगी रुग्णालये समाविष्ट असून जिल्हानिहाय हॉस्पिटलची यादी पुढीलप्रमाणे पाहता येईल:
- MJPJAY Hospital List पाहण्यासाठी अगोदर www.jeevandayee.gov.in या शासनाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
![MJPJAY: महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजना, ABHA Card कसे काढायचे? संपूर्ण माहिती 2 Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana official website](https://marathijan.com/wp-content/uploads/2023/12/MJPJAY-1-1024x520.png)
- होम पेज वर गेल्यानंतर Network Hospitals या पर्याया मधून तुम्हाला हॉस्पिटलची यादी पाहता येईल.
![MJPJAY: महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजना, ABHA Card कसे काढायचे? संपूर्ण माहिती 3 Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Hospital List](https://marathijan.com/wp-content/uploads/2023/12/MJPJAY-web.png)
- यात तुम्ही जिल्हानिहाय किंवा आजारानुसार एक पर्याय निवडून यानुसार हॉस्पिटलची यादी पाहू शकता.
MJPJAY योजनेसाठी नोंदणी कशी करावी?
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा (MJPJAY) लाभ घेण्यासाठी योजनेमध्ये अंगीकृत असणाऱ्या सर्वच हॉस्पिटल मध्ये आरोग्य मित्र सुद्धा असतात. हॉस्पिटल मध्ये रुग्ण अॅडमिट झाल्यानंतर हे आरोग्यमित्र रुग्णांची ऑनलाईन नोंदणी करतात. तसेच ते रुग्णालयात उपचार घेताना रुग्णाला योजने संबंधी योग्य ती मदतही करतात. सुरुवातीला आधार कार्ड आणि रेशनकार्ड रुग्णाच्या जवळ असणे गरजेचे होते. पण आता या योजने अंतर्गत उपचार घेण्यासाठी ABHA कार्ड जवळ असणे गरजेचे आहे. ABHA कार्ड काढण्याची पद्धत एकदम सोप्पी आहे.
ABHA कार्ड म्हणजे काय? याचा फायदा काय?
आभा हेल्थ कार्ड ही खऱ्या अर्थानं नागरिकाच्या आरोग्याची कुंडलीच आहे. आभा (ABHA) म्हणजेच आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट नंबर, हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे ज्यात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती नोंदवली जाते. या कार्डच्या मदतीनं डॉक्टर तुमच्या संपूर्ण आरोग्याच्या सर्व नोंदी पाहू शकतात. म्हणजेच या कार्डद्वारे कोणत्याही रुग्णाचा वैद्यकीय इतिहास अगदी सहज शोधता येणार आहे. हे कार्ड एकप्रकारे आपल्या आधार कार्डसारखंच आहे आणि यावर 14 अंकी युनिक आयडी नंबर असतो. यात तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा हे कार्ड म्हणजेच तुमचं आरोग्यविषयक रेकॉर्ड डिलीटही करू शकतात.
या कार्डचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे दवाखान्यात जाताना तुम्हाला आधीच्या डॉक्टरांची चिठ्ठी, गोळ्यांची कागदं, जुन्या टेस्टचे रिपोर्ट हे सर्व सोबत घेऊन जायची गरज पडणार नाही. तुम्ही आभा नंबर सांगितला की डॉक्टर तुमचा पूर्वीचा आरोग्यविषयक सर्व डेटा पाहू शकतील. तुमचे सर्व रिपोर्ट ऑनलाईन असल्याने तुम्हाला पुन्हा सगळ्या टेस्ट करायची गरज पडणार नाही. आणि यामुळे तुमच्या वेळची आणि पैशाची बचत होईल. राज्यातील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि केंद्राची आयुष्यमान भारत (Ayushman Bharat Yojana) या दोन योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे जर आभा हेल्थ कार्ड असेल तर इतर कागदपत्रे सोबत बाळगण्याची गरज नाही. त्यामुळे या कार्डचा हा खूप मोठा फायदा आहे. हॉस्पिटल इमर्जन्सी मध्ये हे कार्ड खूप उपयोगी ठरू शकतं.
ABHA कार्ड कसे काढणार?
आभा हेल्थ कार्ड तुम्ही सार्वजनिक आणि खासगी दवाखाने, सामुदायिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र इथं जाऊन बनवू शकता. किंवा तुम्ही घरबसल्या ऑनलाईन सुद्धा हे कार्ड बनवू शकता. यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मिशन या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन तुम्हाला नोंदणी करायची आहे.
![MJPJAY: महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजना, ABHA Card कसे काढायचे? संपूर्ण माहिती 4 How to create ABHA Card or Digital Health ID?](https://marathijan.com/wp-content/uploads/2023/12/MJPJAY-4-1024x445.png)
ABHA Card घरबसल्या ऑनलाईन बनवून डाऊनलोड करण्यासाठी खालीलप्रमाणे स्टेप्स वापरा:
- सर्वांत अगोदर NHA | Official website Ayushman Bharat Digital Mission (abdm.gov.in) या वेबसाईटला गुगल वर सर्च करा. आणि पहिल्याच वेबसाईटवर क्लिक करा. किंवा येथे क्लिक करून वेबसाईटला भेट द्या.
- पुढे Create Ayushman Bharat Health Account हे होम पेज ओपन होईल.
- यानंतर Create ABHA Number वर क्लिक करा. किंवा येथे क्लिक करा.
- आता तुम्ही तुमचा आधार नंबर किंवा ड्राईव्हींग लायसन्स नंबर टाकून तुमचा ABHA Number बनवू शकतात.
- यात मागितलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
- येथे तोच मोबाईल नंबर द्या जो तुमच्या आधार नंबरशी लिंक असेल. यावर तुम्हाला OTP सुद्धा येईल.
- सर्व माहिती टाकल्यानंतर तुमचा आभा नंबर आभा address बरोबर लिंक झाल्याचा मेसेज स्क्रीनवर येईल. यानंतर आता BACK बटन दाबायचं आहे.
- पुन्हा होम पेजवर आभा नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून लॉग-इन करा. आभा नंबर, जन्म वर्ष आणि दिलेलं गणित सोडवून Continue वर क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर ओटीपी पाठवून ही माहिती Validate करा.
- पुढे ओटीपी टाकून Continue वर क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला तुमचं आभा कार्ड दिसेल.
- Download या पर्यायावर क्लिक करून तुम्ही आभा कार्ड डाऊनलोड करू शकता.
- यासोबतच तुम्ही ABHA हे National Health Authority चे स्मार्टफोन App डाउनलोड करून याद्वारेही तुमचे ABHA Card बनवू शकता.
- तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा ABHA Number तयार करून तुमचे ABHA Card घरबसल्या ऑनलाईन बनवून डाऊनलोड करू शकतात. तसेच ऑनलाईन तुम्ही तुमच्या आभा कार्डवरील ईमेल, फोन नंबर आणि इतर माहिती माहिती एडिट सुद्धा करू शकता. यासोबतच ही सर्व माहिती तुम्ही delete किवा deactivate सुद्धा करू शकता.
![MJPJAY: महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजना, ABHA Card कसे काढायचे? संपूर्ण माहिती 5 How to create ABHA Health Card using your Aadhar number?](https://marathijan.com/wp-content/uploads/2023/12/MJPJAY-5-1024x386.png)
राज्यातील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि केंद्राची आयुष्यमान भारत (Ayushman Bharat Yojana) या दोन योजनांचा लाभ घेण्यासाठी हे ABHA Card नक्की बनवून घ्या.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत कोणते उपचार समाविष्ट आहेत?
खालील 34 Specialized Category च्या संदर्भात कॅशलेस उपचारांद्वारे वैद्यकीय आणि सर्जिकल प्रक्रियेसाठी हॉस्पिटलायझेशन कव्हर करण्यासाठी ही पॅकेज वैद्यकीय विमा योजना आहे. MJPJAY लाभार्थीला 121 फॉलोअप प्रक्रियांसह 996 वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया प्रक्रियेचा लाभ मिळतो आणि PMJAY लाभार्थीला 183 फॉलोअप प्रक्रियेसह 1209 वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया प्रक्रियांचा (अतिरिक्त 213 वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया प्रक्रिया) लाभ मिळतो. 996 MJPJAY प्रक्रियेपैकी 131 सरकारी आरक्षित प्रक्रिया आहेत आणि PMJAY 1209 प्रक्रियेसाठी अतिरिक्त 37 सरकारी आरक्षित प्रक्रिया आहेत.
कॅशलेस उपचारांसाठी 34 Specialized Category:
- Burns
- Cardiology
- Cardiovascular and Thoracic surgery
- Critical Care
- Dermatology
- Endocrinology
- ENT surgery
- General Medicine
- General Surgery
- Hematology
- Infectious diseases
- Interventional Radiology
- Medical Gastroenterology
- MEDICAL ONCOLOGY
- Neonatal and Pediatric Medical Management
- Nephrology
- Neurology
- Neurosurgery
- Obstetrics and Gynecology
- Ophthalmology
- Orthopedics
- Pediatric Surgery
- Pediatric Cancer
- Plastic Surgery
- Polytrauma
- Prosthesis and Orthosis
- Pulmonology
- Radiation Oncology
- Rheumatology
- Surgical Gastroenterology
- Surgical Oncology
- Urology (Genitourinary Surgery)
- Mental disorders
- Oral and Maxillofacial Surgery
MJPJAY पॅकेजेसमध्ये कोणता कोणता खर्च मिळणार?
MJPJAY च्या या पॅकेजेसमध्ये जनरल वॉर्डमधील बेड चार्जेस, नर्सिंग आणि बोर्डिंग चार्जेस, सर्जन आणि ऍनेस्थेटिस्ट शुल्क, मेडिकल प्रॅक्टिशनर आणि कन्सल्टंट्सचे शुल्क, ऑक्सिजन, ओ.टी. आणि आयसीयू शुल्क, सर्जिकल उपकरणांची किंमत, औषधांची किंमत, डिस्पोजेबल, उपभोग्य वस्तू, रोपण, कृत्रिम उपकरणांची किंमत, रक्त संक्रमणाची किंमत (राज्य सरकारच्या धोरणानुसार प्रदान केले जाणारे रक्त), एक्स-रे आणि निदान चाचण्या, अन्न आंतररुग्ण, राज्य परिवहनाद्वारे एक वेळचा वाहतूक खर्च किंवा द्वितीय श्रेणीचे रेल्वे भाडे (केवळ रूग्णालय ते रुग्णाच्या निवासस्थानापर्यंत). या पॅकेजमध्ये रूग्णाच्या रूग्णालयातून डिस्चार्ज होण्याच्या तारखे पर्यंत रूग्णाच्या उपचाराचा संपूर्ण खर्च समाविष्ट आहे, ज्यात रूग्णाचा व्यवहार कॅशलेस होईल. मृत्यूच्या उदाहरणात, नेटवर्क हॉस्पिटलमधून गाव/टाउनशिपपर्यंत मृतदेहाची वाहतूक देखील याच पॅकेजचा भाग असेल.
योजने संबंधी इतर माहिती कुठे बघायची?
राज्यातील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana) आणि केंद्राची आयुष्यमान भारत (Ayushman Bharat Yojana – Pradhan Mantri Jan Arogya Yojana) या दोन योजनांची इतर माहिती हवी असल्यास www.jeevandayee.gov.in या महाराष्ट्र सरकारच्या ऑफिशियल वेबसाईटवर माहिती बघा. तसेच या योजने संबंधी माहितीसाठी Toll Free Number आहे: 155 388 , 1800 233 2200, यावरही तुम्हाला माहिती मिळेल.
तसेच MJPJAY योजनेमध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अंगीकृत असणाऱ्या सर्वच हॉस्पिटल मध्ये आरोग्य मित्र असतात. या आरोग्य मित्रांकडून तुम्ही या योजनेबद्दल सर्व माहिती घेऊ शकतात. (Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana and Ayushman Bharat Yojana – Pradhan Mantri Jan Arogya Yojana and Ayushman Bharat Health Account – ABHA Card – Scheme Eligibility – Disease list – Required document list – Hospitals list)