Dangerous Side Effects of Tea: चहा पिताय, त्याअगोदर हे वाचा – होतील हे गंभीर आजार – चहा भारतीयांसाठी नाहीच

Dangerous Side Effects of Tea: चहा हा असंख्य भारतीयांचा जीव की प्राण. कारण भारतात चहा पिल्या शिवाय अनेकांचा दिवसच सुरु होत नाही. काहींना तर चहा पिल्या शिवाय कोणतेही काम होत नाही. म्हणजेच अगोदर चहा पिणार मग महत्वाची कामे करणार असेही लोक भारतात जास्त आढळतात. काही तर असेही लोक आहे जे एकाच दिवसात वारंवार चहा पितात. पण चहाचे अशाप्रकारे भारतीयांना वेड असल्याने अनेकांसाठी चहा बनवणे हे रोजगाराचे एक चांगले मध्यम सुद्धा आहे. यामुळेच आता देशात अनेक ठिकाणी चहाचे हॉटेल एका स्पेशल ब्रंड मध्ये रुपांतरीत झाल्याचे दिसताय. त्यांच्या देशभरात आता अनेक शहरांत शाखा सुद्धा निर्माण झाल्याय.

आणि चहाचा हा व्यवसाय सुरु करायला जास्त भांडवल सुद्धा लागत नाही. रस्त्यावर एकदम छोटी टपरी किंवा साध्या गाड्यावर एखादा गरीब व्यक्ती सुद्धा हा चहाचा व्यवसाय सुरु करू शकतो. त्यामुळेच चहाने आपल्या देशाला खूप मोठ्या प्रमाणात रोजगार दिलाय. पण खरंच चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? या विषयीच आज आपण थोडक्यात माहिती बघूया.

चहा हे भारतीय उत्पादन नाही

चहाबद्दल पहिली गोष्ट म्हणजे चहा हे आपल्या भारत देशाचे उत्पादन नाही, 1750 पूर्वी भारतात कुठेही चहाचे अस्तित्व नव्हते. पूर्वी भारतीय लोक चहा ऐवजी फक्त दुध प्यायचे. पण पुढे इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांनी चहाचे रोपटे सोबत आणले. भारतातील काही ठिकाने जी इंग्रजांना अनुकूल होती, जिथे प्रचंड थंडी होती, तिथे त्यांनी टेकड्यांवर चहाची झाडे लावली आणि तेथे चहाचे उत्पादन सुरू केले. इंग्रजांनी स्वतःसाठी चहाच्या बागा लावल्या होत्या. कारण ज्यांचा रक्तदाब कमी राहतो त्यांच्यासाठीच चहा हे औषध आहे. पण ज्यांचा रक्तदाब सामान्य आणि उच्च आहे त्यांच्यासाठी चहा विष आहे.

tea
Tea

थंड प्रदेशात राहणाऱ्या लोकांचा रक्तदाब खूप कमी असतो. त्यामुळेच युरोप-अमेरिकेसारख्या थंड प्रदेशातून येणाऱ्या लोकांना लो बीपीचा त्रास होतो. बीपी वाढवायचा असेल तर चहा सर्वोत्तम आहे आणि कॉफी दुसऱ्या क्रमांकावर आहे.

इंग्रजही युरोपातून आले होते. म्हणूनच त्यांनी औषध म्हणून चहा किंवा कॉफी सोबत आणली. पण हळुहळु सर्व भारतीय लोकांना याची सवय झाली. ब्रिटिशांसाठी हा चहा किंवा कॉफी नक्कीच अमृत आहे, पण भारतीयांसाठी ते विष आहे. कारण भारतीय लोक थंड प्रदेशातील नसून उष्ण प्रदेशात राहतात.

शरीरात 48 रोग निर्माण होतात – राजीव दीक्षित

प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक आणि प्रखर वक्ता ज्यांचे आयुर्वेदासंबंधी अनेक व्हिडीओ व्हायरल आहे ते म्हणजे राजीव दीक्षित. राजीव दीक्षित यांनी आयुर्वेदाचा खूप प्रचार केला आणि चहा हा आपण भारतीयांसाठी कसा वाईट याबद्दल त्यांच्या अनेक व्याख्यानांमध्ये त्यांनी उल्लेख केला आहे.

Rajiv Dixit (Indian activist who promoted Ayurveda)
Rajiv Dixit (Indian activist who promoted Ayurveda)

राजीव दीक्षित यांनी त्याच्या एका व्याख्यानात म्हटले की ” वर्षभर चहा पिणे आणि प्रत्येक वेळी चहाची वेळ आहे असे म्हणणे हे खूप धोकादायक आहे. आणि काही लोक तर असंही म्हणतात की चहा प्यायल्याशिवाय त्यांना सकाळी टॉयलेटलाही होत नाही, हे खरंच खूप धोकादायक आहे. थंड देशांमध्ये राहणाऱ्या लोकांचे पोट आधीच अल्कधर्मी (alkaline) असते आणि उष्ण देशांमध्ये राहणाऱ्या लोकांचे पोट आधीच आम्लयुक्त (acidic) असते. चहा आधीच आम्लयुक्त आहे आणि ते त्यांचे अल्कधर्मी रक्त थोडे अम्लीय बनण्यास मदत करते. पण आम्हा भारतीयांचे रक्त अगोदरच आम्लयुक्त आहे आणि आमचे पोटही आम्लयुक्त आहे, त्यात आपण चहा पीत असतो, चहामुळे आपल्या रक्तातील आम्लता आणखी वाढते जी अत्यंत हानिकारक आहे.

आयुर्वेदानुसार जेव्हा रक्तात आम्लता वाढते तेव्हा शरीरात 48 रोग निर्माण होतात. त्यातील पहिला आजार म्हणजे कोलेस्टेरॉल वाढणे. सामान्य माणसाच्या भाषेत कोलेस्टेरॉलचा अर्थ रक्तातील कचरा वाढणे. आणि हे कोलेस्टेरॉल हृदयापासून रक्त घेउन येणाऱ्या वाहिन्यांमध्ये जमा होऊन रक्त अडवू लागते. आणि मग हा ब्लॉकेज हळूहळू इतका वाढतो की संपूर्ण रक्त वाहिनी भरून जाते आणि मग त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येतो. त्यामुळे विचार करा की हा चहा तुम्हाला हळूहळू कुठपर्यंत नेऊ शकतो”. असं राजीव दीक्षित म्हणाले होते.

चहामुळे आयुष्यभर खा बीपीच्या गोळ्या

राजीव दीक्षित पुढे असंही म्हणाले होते की “इंग्रजांचा बीपी लो असल्याने ते लोक त्यांचा बीपी नॉर्मल ठेवण्यासाठी चहा किंवा कॉफी पितात, पण जर तुमचे बीपी नॉर्मल असेल आणि तुम्ही चहा पिण्याची सवय चालू ठेवली तर हळूहळू तुमचा बीपी वाढू लागेल. आणि हा High Blood Pressure तुम्हाला मेडिकल गोळ्या-औषधांकडे घेऊन जाईल. मग डॉक्टर तुम्हाला बीपी कमी करण्यासाठी गोळ्या घेण्यास सांगतील. आणि मग आयुष्यभर गोळ्याही खाव्या लागेल कारण डॉक्टर तुम्हाला म्हणणार नाहीत की चहा सोडा, ते म्हणतील नेहमी BPच्या गोळ्या घेत रहा, कारण गोळ्या विकल्या तर त्यांना कमिशनही मिळत राहील आणि मेडिकल गोळ्यांचे इतर साईड इफेक्ट झाल्याने दुसरे आजार सुद्धा निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे यात डॉक्टरांचा फायदाच असतो. त्यामुळे चहा कितपत प्यायचा किंवा तो प्यायचा की नाही हे डॉक्टर सांगणार नाही ते आपल्यालाच त्याचे फायदे आणि तोटे समजून घेऊन ठरवावे लागेल”. असं राजीव दीक्षित म्हणाले होते.

चहा मुळे एनर्जी जाणवते

चहा मध्ये कैफीन और टेनिन असते. त्यामुळे चहा किंवा कॉफी पिल्यानंतर लगेचच कॅफीन आणि टॅनिनमुळे आपल्याला काहीप्रमाणात एनर्जी आल्यासारखे जाणवते. म्हणूनच आपल्या देशात अनेकजण महत्वाचे कामे करण्याअगोदर चहा पिणे पसंद करतात. पण काहींना वारंवार चहा पिण्याची सवय असते. एकप्रकारे त्यांना हळूहळू या चहाचे व्यसन लागले आहे. आणि आता त्यांना चहा पिल्याशिवाय कोणतेही कामे करता येत नाही अशी त्यांची अवस्था झाल्याची दिसतेय.

दिवसातून एक-दोनदा चहा प्यायल्याने कोणतेही नुकसान होत नाही असंही काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. परंतु जर तुम्ही चहा एकाच दिवसातून जास्त वेळा किंवा चुकीच्या वेळी प्यायला तर ते शरीराला अनेक प्रकारे हानी पोहोचवू शकते.

उपाशीपोटी चहा पिणे हानिकारक

अनेक तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा शरीरातील पाण्याची पातळी खूप कमी असते. चहा किंवा कॉफी एसिडिक असते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शरीरात एसिडिक सिस्टम असते. रिकाम्या पोटी चहा प्यायल्यावर लगेचच अॅसिडिक संतुलन बिघडते. त्यामुळे चहा पिणाऱ्यांना गॅसची समस्या, आंबट ढेकर आणि आम्लपित्ताची समस्या दिसून येते. चहामध्ये थियोफिलाइन नावाचे एक संयुग आढळते, ज्यामुळे सकाळी उपाशीपोटी चहा किंवा कॉफी प्यायल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे तोंडातील बॅक्टेरिया शुगर ला ब्रेक करतात. त्यामुळे तोंडात अॅसिडची पातळी वाढते.

यासोबत रिकाम्या पोटी चहा पिणाऱ्यांमध्ये हार्ट बर्नची समस्याही दिसून येते. यात छातीत जळजळ आणि पोटात गॅस होणे या मुख्य समस्या आहेत. ही समस्या दीर्घकाळ राहिल्यास अल्सर होऊ शकतो. ही अॅसिडिटीची गंभीर स्टेज अवस्था आहे.

तसेच रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. चहामध्ये असे अनेक घटक असतात ज्यामुळे वारंवार लघवीला लागते. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. या कारणामुळेच चहा पिणाऱ्यांनी जास्त पाणी प्यावे असंही म्हटलं जातं.

तज्ज्ञांच्या मतानुसार जेवण केल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर एक किंवा दोन तासांनी चहा प्यायला हवा, ही चहा पिण्याची योग्य वेळ असते. तसेच हलका नाश्ता आणि टोस्ट चहासोबत घ्यावा. असंही अनेकांचे मत आहे.

दुधाचा चहा विष आहे – आचार्य मनीष जी

आयुर्वेद आणि निसर्ग उपचार गुरू आचार्य मनीष जी यांनीही चहा पिण्याचे अनेक नुकसान सांगितले आहे. आचार्य मनीष जी हे आरोग्य प्रेरणा वक्ता आणि आयुर्वेद तज्ञ (Health Motivation Speaker and Ayurveda expert) म्हणून ओळखले जातात. त्यांचे अनेक शहरांत आयुर्वेदिक क्लिनिक (Acharya Manish Ayurveda Centers) आहे, ज्याला Shuddhi Clinics म्हटले जाते.

Acharya Manish Ji (Health Motivation Speaker and Ayurveda expert)
Acharya Manish Ji (Health Motivation Speaker and Ayurveda expert)

आचार्य मनीष जी यांनी चहा पिण्याने होणारे नुकसान सांगत म्हटलंय की “संपूर्ण जगात 235 देश आहेत, पण दुधाचा चहा भारत सोडून जगात कुठेही पिला जात नाही. सर्व प्रथम, चहा आहे तरी काय? तर दुधात कॅसिन नावाचे प्रोटीन असते. चहामध्ये फ्लेवोनोइड्स असते. फ्लेवोनोइड्स आणि केसीन एकत्र आल्यावर रासायनिक अभिक्रिया होते, यावर जगभरातील अनेक देशांमध्ये संशोधन झाले आहे. यामुळे दुधाचा चहा विष बनतो.

चहा तुमचे यकृत खराब करते, तुमच्या रक्ताला एसिडिक बनवते, तुमचे पित्त वाढवते, तुमच्या किडनीचे नुकसान करते. मुळव्याध चहामुळे होतो, मायग्रेन आणि डोकेदुखीचा त्रास चहामुळे होतो. अगदी चहा हा तुम्हाला नपुंसक सुद्धा बनवू शकतो. म्हणून चहा पिणे किती चुकीचे आहे पण तरीही आपल्या देशात चहाची विक्री एक लाख करोड रुपयांची आहे. तुम्ही हर्बल टी, लेमन टी, ग्रीन टी या प्रकारचे चहा पिऊ शकता आणि हे सर्व चांगले आहे. पण फक्त त्यात दूध घालू नका.” असं आचार्य मनीष जी यांनी म्हटले आहे.

चहामुळे वाढलेली अ‍ॅसिडिटी कमी कशी करायची?

आतापर्यंत खूप ज्यादा प्रमाणात चहा पिऊन पोट खूप अ‍ॅसिडिक झालंय. तर त्याची आम्लीयता कशी कमी करायची यावर सुद्धा राजीव दीक्षित यांनी उपाय सांगितलाय. यात ते म्हणताय की “साधी गोष्ट आहे की जर तुमचे पोट आम्लयुक्त झाले असेल तर जास्त अल्कधर्मी गोष्टी खा. कारण अम्लीय (acidic) आणि अल्कधर्मी (alkaline) यांचे मिश्रण केल्यास ते तटस्थ (neutral) होईल.

त्यामुळे क्षारीय (alkaline) पदार्थांपैकी तुम्ही जिरे पाणी पिऊ शकता. पाण्यात जिरे टाका, ते खूप गरम करा, थोडे थंड झाल्यावर प्या. पाण्यात दालचिनी टाका, गरम करा, थंड करा आणि प्या. आणि अजून एक अतिशय क्षारीय गोष्ट आहे, ती म्हणजे अर्जुन सालाचा काढ़ा (Arjun Bark Kadha/अर्जुन छाल का काढ़ा), तो 40-45 रुपये किलो दराने कुठेही मिळतो, तुम्ही ते गरम दुधात घालून पिऊ शकता. हे हृदयातील blockage, उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल इत्यादी त्वरीत बरे करते.

Arjun Bark Kadha/अर्जुन छाल का काढ़ा
Arjun Bark Kadha/अर्जुन छाल का काढ़ा

आणखी एका गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे, ते म्हणजे माणसांशिवाय कोणताही प्राणी चहा पीत नाही. कुत्रा, मांजर, गाय, पक्षी, तुमच्या आवडीच्या कोणत्याही प्राण्याला द्या, तो कधीच चहा पिणार नाही. चहाचा वास घेताच प्राणी तोंड दूर करतात. पण दुध दिले तर लगेच पितात. यातूनच चहा किती हानिकारक आहे ते समजून घ्या.

चहा ऐवजी दुध प्या. ते शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि त्याने शेतकऱ्यांना सुद्धा खूप फायदा होईल. चहा आणि कॉफी सारख्या बोगस गोष्टींवर आपण अनेक रुपये खर्च करतो, त्या ऐवजी दुधावर खर्च केला तर त्याचा फायदा दुध विकणाऱ्या शेतकऱ्यांना होईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि त्याचा आपल्या भारत देशाला देखील आर्थिक फायदा होईल. पण आपल्या देशात लाखो-करोडो रुपये चहावर खर्च होतात आणि यातील बरेच पैसे चहा आणि कॉफी विकणाऱ्या विदेशी कंपन्या घेऊन जातात.

आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, तुमच्या शरीरासाठी योग्य असलेल्या वस्तू तुम्ही जेथे राहतंय तेथून जवळपास 20 किलोमीटरच्या परिसरात उपलब्ध असतील. तुमच्या उष्ण भागापासून शेकडो मैल दूर असलेल्या थंड टेकड्यांवर बनवलेला चहा किंवा कॉफी हे तुमच्यासाठी योग्य नाही. हे फक्त त्या लोकांसाठी आहे जे तेथील थंड प्रदेशात राहताय. त्यामुळे तुम्ही चहा पिणे सोडून द्या, उलट आता जास्त अल्कधर्मी पदार्थांचे सेवन करून तुमचे आम्लयुक्त पोट आणि रक्त निरोगी ठेवा”. असं राजीव दीक्षित यांनी म्हटलंय.

Health Disclaimer: आरोग्य विषयक या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून याबद्दल खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी मराठीजन (marathijan.com) हि आमची वेबसाईट किंवा यातील लेखक घेत नाही. लोक आरोग्याबाबत जागरूक असावे आणि त्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी एवढाच या बातमी मागचा आमचा उद्देश आहे.

Share this Post:

संतोष चकोर हे एक लेखक आहेत. 2015 पासून ते डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब आणि ब्लॉगिंग या क्षेत्रातही काम करत आहेत. विशेषतः ते तंत्रज्ञान, आरोग्य आणि इतर क्षेत्रातील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. सध्या ते मराठीजन या आमच्या वेबसाइटवर संपादक आणि लेखक म्हणून काम करत आहेत आणि दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील अपडेट्स लिहितात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त