Hardeek Joshi on Jaubai Gavat show: अभिनेता हार्दिक जोशी हा सध्या झी मराठीवरील ‘जाऊबाई गावात’ या शो मध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत झळकतोय. या कार्यक्रमातील त्याचे सूत्रसंचालन प्रेक्षकांनाही आवडतंय. पण हे तुम्हाला माहित आहे का? की अभिनेता हार्दिक जोशीने (Hardik Joshi) जाऊबाई गावात या शो साठी अगोदर नकार दिला होता. मग अगोदर नकार आणि नंतर होकार असं कसं काय झालं?
हार्दिकचे या शोला नकार देण्याचे कारण
तर अभिनेता हार्दिक जोशीने झी मराठीवरील ‘जाऊबाई गावात’ या शो साठी अगोदर नकार देण्याचे कारण त्याची वाहिनी ज्योती याच होत्या, आणि नंतर हार्दिकचे या शोला होकार देण्याचे कारण सुद्धा त्याच्या ज्योती वाहिनी ह्याच होत्या. ‘जाऊबाई गावात’ हा शो सुरु होण्याअगोदर अभिनेता हार्दिक जोशीच्या वाहिनी ज्योती या कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी लढत असल्याने त्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होत्या. त्यामुळे आपल्या वाहिनी जवळ थांबता यावं, त्यांची काळजी घेता यावी म्हणून हार्दिकने हा शो करण्यास नकार दिला होता.
चैनेलचे लोक थेट हॉस्पिटलमध्ये गेले
पण पुढे हर्दीकने नकार दिल्याने झी मराठी चैनेलचे लोक थेट हार्दिकच्या वहिनींना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले. यामुळे हार्दिकने ‘जाऊबाई गावात’ शोला नकार दिल्याची माहिती त्याच्या ज्योती वहिनींना समजली आणि त्यांनीच स्वतः हार्दिकला हा शो करायला सांगितले. म्हणूनच पुढे अभिनेता हार्दिक जोशीने झी मराठीवरील ‘जाऊबाई गावात’ या शो साठी आपला होकार दिला. पर दुर्दैवाने हा शो सुरु होण्याआधीच हार्दिकच्या ज्योती वहिनींचे निधन झाले.
काही बरं वाईट होणार याची कल्पना होती
याविषयी अभिनेता हार्दिक जोशीने म्हटलंय की “हा शो जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा मी नकार दिला होता. माझी वहिनी त्यावेळी खूप आजारी होती. ती मला माझ्या आई, बहीण, मैत्रिणीसारखी होती. आजवर मी जे काही नाव कामावलंय त्याची ती साक्षीदार होती. कुठलंही काम करण्यासाठी तिने मला भरपूर पाठिंबा दिला होता. मी घरातून बाहेर पडताना तिच्या पाया पडायचो तेव्हा तिचा हात माझ्या डोक्यावर असायचा. ती जेव्हा हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा तिची अवस्था खूप नाजूक होती. काही बरं वाईट होणार याची मला कल्पना होती. या दिवसात मला तिच्यासोबत राहायचं होतं. त्यामुळे मी हा शो करण्यासाठी नकार दिला होता.”
“पण तिला हे समजलं होतं. कारण चॅनलची लोकं त्यावेळी हॉस्पिटलमध्ये आली होती. मी शो का नाकारतोय हे त्यांना समजले होते. मी शो नाकारतोय याची कल्पना तिलाही आली तेव्हा तिनेच मला हा शो तू करायचाच असे सांगितले होते. तिच्याच वाढदिवसाच्या दिवशी या शोचा पहिला एपिसोड टेलिकास्ट करण्यात आला होता.” अशी माहिती अभिनेता हार्दिक जोशीने दिली आहे.
अभिनेत्री अक्षयाची कॅन्सर बद्दल जनजागृती
अभिनेता हार्दिकच्या वाहिनी ज्योती यांचे कॅन्सर सारख्या गंभीर आजाराने निधन झाल्यानंतर आता हार्दिक पत्नी अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) हिने सुद्धा सर्व मुलींमध्ये आणि महिलांमध्ये कर्करोगाबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. तिने महिलांना Cervical Cancer होऊ नये म्हणून HPV Vaccine या लसीकरणाबाबत माहिती देत सर्वच मुलींनी आणि महिलांनी याचे डोस घेण्याची विनंती केली आहे.
याबद्दल अगोदरच आम्ही एक लेख लिहिलेला आहे. Cervical Cancer होऊ नये म्हणून HPV Vaccine घेण्याबद्दल अभिनेत्री अक्षया देवधर हिने दिलेली सर्व माहिती तुम्ही आमच्या “HPV Vaccine: अभिनेत्री अक्षया देवधरने सर्व मुलींना ही लस घेण्याची केली विनंती – काय आहे Cervical Cancer?” या लेख मध्ये नक्की वाचा. आणि HPV Vaccine घेऊन भविष्यात होणाऱ्या Cervical Cancer च्या धोक्यापासून सुरक्षित राहा. तसेच ही माहिती आपल्या आसपास राहणाऱ्या सर्व महिला आणि मुलींना शेअर नक्की करा.
अभिनेता हार्दिक जोशीच्या वाहिनी ज्योती यांना भावपूर्ण श्रद्धांजली.