Popcorn Tax: राजस्थानच्या जैसलमेरमध्ये नुकतीच जीएसटी कौन्सिलची बैठक पार पडली. या बैठकीत जनतेकडून जीएसटीची वसुली करण्याच्या धोरणामुळे महागाईचा भडका आणखी उडण्याची शक्यता आहे. या बैठकीत पॉपकॉर्नवरही जीएसटी लावण्याचा निर्णय़ घेण्यात आला. यात जीएसटी हा पॉपकॉर्नच्या फ्लेवरनुसार वेगवेगळा असणार आहे.
थिएटरमध्ये सिनेमा पाहताना असंख्य लोक आवडीने पॉपकॉर्न खातात, अनेकांचे तर ते अत्यंत फेव्हरेट बनले आहे. पण आता याच पॉपकॉर्नसाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. नुकत्याच झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत पॉपकॉर्नवर तीन वेगवेगळे जीएसटी लावण्याचा निर्णय घेतलाय.
तुम्ही जर साधे पॉपकॉर्न विकत घेतलात म्हणजे ज्यावर कोणतंही लेबल नसेल किंवा ते पॅक केलेले नसतील तर अशा पॉपकॉर्न्सवर 5 टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे.
पण नवीन निर्णया नुसार फ्लेवर बदललल्यावर जीएसटी कसा वाढत जाणार ते पाहुयात. समजा तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवरचे, पॅक केलेले आणि त्यावर लेबल असलेले पॉपकॉर्न खरेदी केलात तर त्यासाठी जास्त किंमत मोजावी लागणार आहे. अशा पॉपकॉर्न्सवर 12 टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आता तिसऱ्या कॅटेगरीचे पॉपकॉर्न. शुगर कन्फेक्शनरी श्रेणीतले पॉपकॉर्न्स ज्यात कॅरेमलसारख्या घटकांचा वापर करण्यात येतो असे पॉपकॉर्न तुमचा खिसा आणखी कापणार आहेत. कारण त्यावर आता तब्बल 18 टक्के जीएसटी लागणार आहे.
असं देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पॉपकॉर्नच्या या वेगवेगळ्या जीएसटी दरांबाबत स्पष्टीकरण दिलंय.
त्यामुळे आता चित्रपट गृहात चित्रपट बघायला जाताना पॉपकॉर्न कोणते खायचे हे तुम्हाला आता जीएसटी बघून ठरवावं लागणार आहे.
Watching India's Finance Minister explain the GST rate on different types of popcorn (salted, caramel), itself deserves to be enjoyed with popcorn 🍿
— Gurjot Ahluwalia (@gurjota) December 22, 2024
pic.twitter.com/ZK01CVHYgS