Jau Bai Gavat: कलर्स चैनेल वरील बिग बॉस हा शो संपूर्ण भारतातील खूप लोकप्रिय रिऍलिटी शो आहे. मराठी मधेही या शो ची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असतात. सध्या हिंदी मधील बिग बॉस हा शो सुरु आहे तर यानंतर लवकरच कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी हा शो सुद्धा सुरु होणार आहे. पण त्या अगोदरच आता झी मराठी सुद्धा एक नवीन रिऍलिटी शो सुरु करत आहे. बिग बॉस पेक्षा हा एक वेगळ्या प्रकारचा रिऍलिटी शो असल्याने प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आशा आहे. (zee marathi’s new reality show jau bai gavat contestants list and host hardeek joshi)
‘जाऊ बाई गावात’ असं झी मराठी वरील या नवीन रिऍलिटी शो चे नाव आहे. या रिऍलिटी शो मध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेता हार्दिक जोशी हा सूत्रसंचालक म्हणून झळकणार आहे. जाऊ बाई गावात हा शो 4 डिसेंबरपासून, सोमवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता झी मराठीवर दिसणार आहे.
या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना गावाकडच्या वातावरणात राहण्याचे चॅलेंज देण्यात येणार आहे. शहरात अत्यंत ऐशोआरामात जीवन जगणाऱ्या काही तरुणींना काही दिवस आता एका खेडे गावात राहून तेथील कामे एका टास्क प्रमाणे करावे लागतील. मग त्यात चुलीवर स्वयंपाक करणे आणि गायी-म्हशींचे शेन उचलने अशा प्रकारची कामे सुद्धा असणार आहे. त्यामुळे कधीही अशी कामे न केलेल्या शहरातल्या तरुणींसाठी हे एक मोठे आव्हानच असणार आहे.
झी मराठी वरील हा रिऍलिटी शो इतर रिऍलिटी शो पेक्षा वेगळा आणि एकदम नवीन संकल्पना असलेला आहे. म्हणूनच प्रेक्षक या शोची खूप उत्सुकतेने आणि आतुरतेने वाट पाहत आहेत.
या तरुणी आहे स्पर्धक
या रिऍलिटी शोमध्ये सहभागी होत असलेल्या काही स्पर्धकांची नावे जाहीर झाली आहे. संस्कृती साळुंके, स्नेहा भोसले, मोनिशा आजगावकर, श्रेजा म्हात्रे, रसिका ढोबळे आणि हेतल पाखरे या 6 स्पर्धकांचे प्रोमो रिलीज करण्यात आले आहे.
यापैकी संस्कृती साळुंके हिने क्लिनिकल सायकॉलॉजी या विषयातून पदवी मिळवली आहे. सांस्कृतिला खूप महागड्या वस्तू खरेदी करण्याची हौस आहे यासाठी तिला फक्त पैसे लागतात असे तिचे आईवडील एका प्रोमोत सांगत आहे.
या शोमध्ये सहभागी होत असलेली दुसरी स्पर्धक स्नेहा भोसले हिला किक बॉक्सिंग आवडतं. शहरातील श्रीमंत घरातील असलेल्या स्नेहाला जे करायचं असतं ते ती करतेच, यावर ती कोणाचं काहीही ऐकत नाही हे ती प्रोमोत बिनधास्तपणे सांगत आहे.
यांनतरच्या स्पर्धक श्रेजा म्हात्रे हि एक कमर्शिअल मॉडेल आणि कंटेंट क्रिएटर आहे. तर मोनिशा आजगावकर हि एक फोटोग्राफर आणि एक्टिविस्ट आहे.
यासोबतच प्लस साईज मॉडेल हेतल पाखरे आणि फॅशन दिवा म्हणून ओळखली जाणारी रसिका ढोबळे या सुद्धा या रिऍलिटी शो मध्ये एक स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे.
बिग बॉस सारखा पण काहीसा वेगळा
जाऊ बाई गावात या शोमध्ये शहरातील श्रीमंतीत वाढलेल्या या स्पर्धक तरुणी खेडे गावातील आयुष्य कसं जगणार? हे पाहण्याची प्रेक्षकही आतुरतेने वाट बघत आहे. जाऊ बाई गावात हा रिऍलिटी शो बिग बॉस या शो शी मिळता जुळता असल्याचा दिसतोय. कारण येथेही 24 तास कॅमेऱ्यासमोर राहून हे स्पर्धक गावात राहण्याचा हा गेम कसा खेळता हे प्रेक्षकांना दाखवले जाणार असल्याची माहिती मिळतेय. येथेही बिग बॉस सारखे स्पर्धकांना वेगवेगळे टास्क देण्यात येणार आहेत.
कदाचित बिग बॉस सारखेच जाऊ बाई गावात या शोमध्येही नॉमिनेशन आणि वोटिंग असण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही आपल्या आवडत्या स्पर्धकाला वोट करून गावात जास्त दिवस ठेवता येईल. खेडे गावात हा असा रिऍलिटी शो होणार असल्याने सर्वच प्रेक्षक हा शो सुरु होण्याची खूप आतुरतेने वाट बघत आहे.
How to participate?
contact to zee marathi channel
How to apply for this show ..plz kalawa
Aamhala participants karayche asel tr kas karayche online tr form nahiye so …..?????
I m interested 🥹🙏🏻