Zee Marathi Award 2023: झी मराठी अवॉर्ड 2023 विजेत्यांची नावे – हि ठरली सर्वोत्कृष्ट मालिका

4 नोव्हेंबर रोजी झी मराठीचा यावर्षीचा पुरस्कार सोहळा tv वर दाखवण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यास माधुरी दीक्षित, मलायका अरोरा या बॉलिवूड अभिनेत्री उपस्थित होत्या. झी मराठीवरील अनेक कलाकारांनी त्यांचे डान्स परफॉर्मन्स सादर करत या पुरस्कार सोहळ्यास रंगत आणली.

‘झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड 2023’ या पुरस्कार सोहळ्यात ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने अनेक पुरस्कार जिंकल्याचे पाहायला मिळाले. झी मराठीच्या या पुरस्कार सोहळ्यात अक्षरा-अधिपतीच्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेचा दबदबा पाहायला मिळाला. या मालिकेने एकूण 10 पुरस्कार पुरस्कार जिंकले. महत्वाचे म्हणजे सर्वोत्कृष्ट नायिका, सर्वोत्कृष्ट नायक आणि सर्वोत्कृष्ट मालिका हे पुरस्कार सुद्धा ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेलाच मिळाले. तसेच या मालिकेतील अभिनेत्री शिवानी रांगोळेला एकूण 3 पुरस्कार मिळाले. यावेळी शिवानीच्या खऱ्या सासूबाई अभिनेत्री मृणाल कुलकर्णीं याही प्रचंड खुश होत्या. त्यांनी त्यांच्या सुनेचे पुरस्कार स्विकारतांना फोटोही काढले.

तर बघूया झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड 2023 च्या पुरस्कार विजेत्यांची नावे:

सर्वोत्कृष्ट मालिका- तुला शिकवीन चांगलाच धडा
सर्वोत्कृष्ट कुटुंब- खोत कुटुंब (सारं काही तिच्यासाठी)
विशेष योगदान पुरस्कार- रोशन परब
सर्वोत्कृष्ट नायक- अधिपती (तुला शिकवीन चांगलाच धडा)
सर्वोत्कृष्ट नायिका- अक्षरा (तुला शिकवीन चांगलाच धडा)
सर्वोत्कृष्ट अनुरुप जोडी- अक्षरा-अधिपती (तुला शिकवीन चांगलाच धडा)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार- चिंगी (नवा गडी नवं राज्य)1

सर्वोत्कृष्ट वडील- रघुनाथ (सारं काही तिच्यासाठी)
सर्वोत्कृष्ट आई- उमा (सारं काही तिच्यासाठी)
विशेष लक्षवेधी चेहरा- अक्षरा (तुला शिकवीन चांगलाच धडा)
सर्वोत्कृष्ट जावई- अधिपती (तुला शिकवीन चांगलाच धडा)
सर्वोत्कृष्ट सून- उमा (सारं काही तिच्यासाठी)
सर्वोत्कृष्ट सासरे- प्रकाश (तू चाल पुढं)
सर्वोत्कृष्ट सासू- सुलक्षणा (नवा गडी राज्य नवं)

सर्वोत्कृष्ट खलनायक- संकल्प (अप्पी आमची कलेक्टर)
सर्वोत्कृष्ट खलनायिका- भुवनेश्वरी (तुला शिकवीन चांगलाच धडा)
सर्वोत्कृष्ट मैत्री- नैत्रा-फाल्गुनी (सातव्या मुलीची सातवी मुलगी)
सर्वोत्कृष्ट आजोबा- पाटकर (नवा गडी नवं राज्य)
सर्वोत्कृष्ट आजी- अधिपतीची आजी (तुला शिकवीन चांगलाच धडा)
सर्वोत्कृष्ट व्यक्तीरेखा पुरुष- रघुनाथ (सारं काही तिच्यासाठी)
सर्वोत्कृष्ट व्यक्तीरेखा स्त्री- भुवनेश्वरी (तुला शिकवीन चांगलाच धडा)

विशेष योगदान पुरस्कार- प्रल्हाद कुडतरकर
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तीरेखा पुरुष- फुलपगारे सर (तुला शिकवीन चांगलाच धडा)
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तीरेखा स्त्री- फाल्गुनी (सातव्या मुलीची सातवी मुलगी)
सर्वोत्कृष्ट भावंडे- ओवी-निशी (सारं काही तिच्यासाठी)
विशेष योगदान पुरस्कार- महेंद्र कदम
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तीरेखा स्त्री- मयुरी (तू चाल पुढं)
सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत- तू चाल पुढं

तर या कलाकारांनी झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड 2023 चे पुरस्कार जिंकले आहे.

Share this Post:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त