What is Dermatomyositis: या अभिनेत्रीचे वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी निधन – काय आहे हा त्वचेसंबंधी आजार?

What is Dermatomyositis: बॉलीवूड अभिनेता अमीर खानचा ‘दंगल’ या गाजलेल्या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री सुहानी भटनागरचं निधन झालं आहे. ती डर्मेटोमायोसाइटिस (dermatomyositis) आजाराने ग्रस्त होती. या आजराची लक्षणे आणि इतर सविस्तर माहिती बघूया. (What is Dermatomyositis? Symptoms, Dangal actress Suhani Bhatnagar)

अभिनेत्री सुहानीला डर्मेटोमायोसाइटिस

बॉलिवूडच्या सुपरहिट ‘दंगल’ या चित्रपटातीत (Dangal Movie) छोट्या बबीताची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागरचं (Suhani Bhatnagar) वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी निधन झालं आहे. 11 दिवसांआधीच सुहानीची तब्येत बिघडल्याने तिला एम्समध्ये भरती करण्यात आलं होतं. उपचारा दरम्यान केलेल्या टेस्ट मध्ये अभिनेत्री सुहानी भटनागरला डर्मेटोमायोसाइटिस (Dermatomyositis) हा आजार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

डर्मेटोमायोसाइटिस हा त्वचेसंबंधित एक गंभीर आजार आहे. उपचारादरम्यान सुहानीला स्टिरॉईड्स देण्यात आले. यामुळे तिची प्रतिकारशक्ती अधिकच कमकुवत झाली. तिच्या फुफ्फुसावर परिणाम झाला. हळूहळू तिचे फुफ्फुसही कमकुवत होऊ लागले आणि तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यातच तिचे निधन झाले.

डर्मेटोमायोसाइटिस आजार काय आहे? (What is Dermatomyositis)

आरोग्य तज्ज्ञांच्या मते डर्मेटोमायोसाइटिस (Dermatomyositis) हा अतिशय दुर्मिळ त्वचा रोग आहे ज्यामध्ये त्वचा आणि स्नायू प्रभावित होतात. हा रोग पुरुषांच्या तुलनेने महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. सुरुवातीला या रोगाची लक्षणे अतिशय साधी असतात, पण नंतर हा आजार अत्यंत गंभीर रुप घेऊ शकतो. डर्मेटोमायोसाइटिस लहान मुले, किशोरवयीन आणि प्रौढांसह कोणालाही प्रभावित करू शकते. परंतु लहान मुलांमध्ये आणि प्रौढांमधील या रोगामध्ये काही महत्त्वपूर्ण फरक आहेत. प्रौढांमध्ये या आजारपणामुळे कर्करोगाचा धोका 30% पर्यंत आढळतो, तर लहान मुलांमध्ये असा कोणताही संबंध आढळत नाही. 16 वर्ष वय असणाऱ्या लहान वयापासून हा आजार होऊ शकतो म्हणून याला जुवेनाईल डर्मेटोमायोसिटिस (JDM – Juvenile dermatomyositis) असे म्हणतात.

या आजारामध्ये शरीराची प्रतिकारशक्ती खूपच कमकुवत होते. साधारणपणे आपली रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीराला संसर्गामुळे होणा-या रोगांपासून वाचवते, परंतु या रोगांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वेगळ्या पद्धतीने कार्य करते. ती शरीराविरुद्ध कार्य करू लागते. रोगप्रतिकारक शक्तीचा अतिरेक प्रणाली मुळे Inflammation होते, ज्यामुळे अवयवांमध्ये सूज येते आणि त्यांना नुकसान होते. त्यामुळे या आजारात शरीर रोगांशी लढण्यास सक्षम राहत नाही.

ज्युवेनाईल डर्माटोमायोसिटिस (JDM) मध्ये, त्वचेच्या लहान नसा (डर्माटो) आणि स्नायूंच्या लहान रक्तपेशींमध्ये सूज (मायोसिटिस) आल्यामुळे या रोगाची लक्षणे दिसू लागतात. डर्मेटोमायोसाइटिस आजारात पेशींमध्ये जळजळ होते, ज्यामुळे स्नायू झपाट्याने कमकुवत होऊ लागतात आणि त्वचेवर पुरळ उठतात.

डर्मेटोमायोसाइटिसची लक्षणे

डर्मेटोमायोसाइटिस या आजाराची लक्षणे खूप उशीरा आणि अचानक दिसून येतात. या गंभीर आजाराचे सुरुवातीचे लक्षण त्वचेतील बदल हा आहे. म्हणजेच यात त्वचा निळ्या-जांभळ्या किंवा डस्की रंगात बदलू लागते. त्यामुळे त्वचेवर रॅशेस दिसू लागतात. हे पुरळ सहसा चेहऱ्यावर, डोळ्याभोवती, बोटांवर, कोपर आणि गुडघ्यावर किंवा मानेवर दिसतात. रॅशेसमुळे खाज आणि वेदना होतात. हळूहळू स्नायू कमकुवत होतात. वारंवार खाली पडण्याची समस्या निर्माण होते. कमकुवत आवाज, गिळण्यात अडचण, सांधे दुखणे आणि सुज, ओटीपोटात तीव्र वेदना, कॅल्सिनोसिस असेही लक्षणे या आजारात आढळून येतात.

Dermatomyositis Symptoms:

  • Violet color and dusky red rash: on the face, eyelids, cheeks, chest wall, knees, or back of elbows. (This can be mistaken for eczema)
  • Raised bumps on knuckles
  • Sore and swollen joints
  • Gradual muscle weakness (often in the neck, shoulders, trunk, back, or hips)
  • Difficulty in everyday activities, like climbing stairs, standing up, riding a bicycle, etc.
  • Difficulty swallowing (dysphagia)
  • Weak voice (dysphonia)
  • Frequently falling down
  • Severe abdominal pain (caused by ulcers in the digestive system due to vasculitis)
  • Calcinosis

डर्मेटोमायोसाइटिस कसा होतो?

डर्मेटोमायोसाइटिस हा आजार नेमका असा होतो? या आजाराची नेमकी कारणे कोणती? याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती नाही. जगभरात यावर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. पण हा आजार ऑटोइम्यून डिसऑर्डरसारखाच आहे. यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती चुकून त्याच्या निरोगी ऊतींवर हल्ला करू लागते. अनुवांशिक आणि पर्यावरणीय घटक जसे की विषाणू संसर्ग, तीव्र सूर्यप्रकाश, काही औषधे आणि धूम्रपान हे देखील या आजारासाठी कारणीभूत ठरू शकतात. डर्मेटोमायोसाइटिस हा आजार कोणत्याही देशाच्या आणि समाजातील मुलांना होऊ शकतो. पण हा आजार लहान मुलांमध्ये फारसा आढळत नाही आणि दरवर्षी 10 लाखांपैकी सुमारे 4 मुलांमध्ये आढळतो. अभ्यासातून असेही दिसून आले आहे की काही व्हायरस आणि बॅक्टेरियामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती असामान्यपणे प्रतिक्रिया करू लागते.

डरमॅटोमायोसायटिस आजारावर उपचार काय?

डरमॅटोमायोसायटिस या आजारावर नेमका उपचार उपलब्ध नाही. मात्र वेगवेगळ्या औषधांच्या मदतीने लक्षणं कमी करण्याचा प्रयत्न करता येतो. डरमॅटोमायोसायटिस झालेल्या रुग्णाला इम्यूनोसप्रेसिव्ह औषध दिले जाते. तसेच फिजिकल थेरेपी, इंन्ट्राव्हेनस इम्यूनोग्लोबुलीन थेरेपी अशा वेगवेगळ्या पद्धतीने उपचार केले जातात.

या आजारात उपचारासाठी स्टिरॉइड्सही दिले जातात, पण यामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर आणखी परिणाम होण्याचा धोका असतो. त्याचा फुफ्फुसावर परिणाम होऊन ते कमकुवत होऊ शकते. यामुळे श्वास घ्यायला अडचण निर्माण होते. या आजारात स्नायू आणि त्वचेवर सोबतच परिणाम होत असल्यामुळे त्याचे नेमके निदान करण्यास अनेकदा अडचणी येतात.

Health Disclaimer: आरोग्य विषयक या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून याबद्दल खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी मराठीजन (marathijan.com) हि आमची वेबसाईट किंवा यातील लेखक घेत नाही. लोक आरोग्याबाबत जागरूक असावे आणि त्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी एवढाच या बातमी मागचा आमचा उद्देश आहे.

Health Disclaimer: The information given in this article/post regarding health is preliminary. This information is not a substitute for medical advice and should be checked by a doctor or medical specialist before using this information. Marathijan (marathijan.com) neither our website nor its author takes responsibility for this information. Our aim behind this news is to make people aware about health and inspire them for it.

Share this Post:

संतोष चकोर हे एक लेखक आहेत. 2015 पासून ते डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब आणि ब्लॉगिंग या क्षेत्रातही काम करत आहेत. विशेषतः ते तंत्रज्ञान, आरोग्य आणि इतर क्षेत्रातील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. सध्या ते मराठीजन या आमच्या वेबसाइटवर संपादक आणि लेखक म्हणून काम करत आहेत आणि दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील अपडेट्स लिहितात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त