अभिनेता विशाल निकम ची स्टार प्रवाह वर नवीन मालिका | Yed Lagla Premach Star Cast

Yed Lagla Premach: नुकतंच काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाहने ‘घरोघरी मातीच्या चुली आणि साधी माणसं’ या दोन नवीन मालिकांची घोषणा केली होती. पण आता स्टार प्रवाहने अजून एका नवीन मालिकेची घोषणा केली आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे. (Actor Vishal Nikam’s New Serial on Star Pravah Yed Lagla Premach star cast)

‘येड लागलं प्रेमाचं’ असं या मालिकेचे नाव आहे. या मालिकेचा पहिलाच आणि दमदार असलेला प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. या मालिकेत बिग बॉस मराठीचा विजेता अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री पूजा बिरारी हे महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. हे दोघे या नव्या मालिकेत राया व मंजिरीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. तसेच जेष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी, अतिशा नाईक असे अनेक तगडे कलाकार या नवीन मालिकेत झळकणार आहे.

महाराष्ट्राचं कुलदैवत अशी ओळख असणाऱ्या विठुरायाच्या पंढरपुरात या मालिकेची गोष्ट घडणार आहे. मालिकेत राया सुरुवातीला गुंड दाखवलाय तर मंजिरी ही एक साधी आणि चुकीच्या गोष्टींविरोधात लढणारी मुलगी दाखवली आहे. सुरुवातीला एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या राया आणि मंजिरी यांचा पुढे एकमेकांच्या प्रेमात पडण्यापर्यंतचा प्रवास या मालिकेत दाखवला जाईल.

‘येड लागलं प्रेमाचं’ या नवीन मालिकेचा प्रोमो अनेक प्रेक्षकांना आवडला आहे. प्रेक्षकांसोबत इतर अनेक मराठी कलाकारांनी सुद्धा या मालिकेच्या प्रोमोला पसंती दाखवली आहे.

Share this Post:

सुजाता कराड या ब्लॉगर आणि कंटेंट रायटर आहेत. त्यांना मनोरंजन क्षेत्रात जास्त रस आहे. त्यामुळे या क्षेत्रातील चित्रपट, मालिका, कलाकार आणि इतर अपडेट्सची माहिती न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सध्या ती मराठीजन या आमच्या वेबसाइटवर लेखिका म्हणून काम करत आहे आणि येथे मनोरंजनाच्या बातम्या आणि अपडेट्स लिहिते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त