Vaishnavi Dhanraj: या अभिनेत्रीला घरच्यांनीच केली जबर मारहाण – चेहऱ्यावर आणि हातावर गंभीर जखमा

Vaishnavi Dhanraj: CID या प्रसिद्ध मालिकेत झळकलेली अभिनेत्री वैष्णवी धनराज (Actress Vaishnavi Dhanraj) हिला तिच्या घरच्यांनीच केली जबर मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. याबद्दल वैष्णवीचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. (tv actress vaishanavi dhanraj in police station against her family)

अभिनेत्री वैष्णवीचा घरच्यांवर गंभीर आरोप

अभिनेत्री वैष्णवी धनराज हिचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. यात अभिनेत्री वैष्णवीच्या चेहऱ्यावर आणि हातावर गंभीर जखमांच्या खुणा पाहायला मिळत आहे. तसेच या व्हिडिओ मध्ये घरच्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप अभिनेत्री वैष्णवीने केला आहे. घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या वैष्णवी धनराजने याबाबत मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. तीचा हा व्हिडिओही मुंबईतील मीरा रोड येथील काशिमीरा पोलीस चौकीतील आहे. व्हिडिओत ती मदतीची याचना करतांना दिसतेय. हा व्हिडिओ पाहून प्रेक्षकांनाही मोठा धक्का बसलाय.

अभिनेत्री वैष्णवी धनराज ही ‘CID, मधुबाला आणि बेपन्ना’ अशा काही टीव्ही शो मध्ये झळकली होती. पण आता सध्या अभिनेत्री वैष्णवी ही तिच्या या व्हायरल व्हिडिओ मुळे खूप चर्चेत आली आहे. खरंतर तिचा हा व्हिडीओ बघून अनेकांना धक्का बसलाय. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री वैष्णवीच्या चेहऱ्यावर, ओठांवर आणि हातावर जखमांच्या खुणा दिसत आहेत. तसेच रक्तस्त्राव होईपर्यंत तिला मारहाण करण्यात आल्याचे तिचे म्हणणे आहे.

वैष्णवीने मागितली मदत

व्हिडिओमध्ये वैष्णवी म्हणतेय की “नमस्कार, मी वैष्णवी धनराज आहे. मला आत्ता खरोखर मदतीची गरज आहे. मी सध्या काशिमीरा (मीरा रोड) पोलीस ठाण्यात आहे. माझ्या घरच्यांनी मला मारहाण केली. मला वाईटरित्या त्यांनी मारलं. कृपया, मी तुम्हा सर्वांना आवाहन करते की मला मदत करावी, मला मदतीची खरचं गरज आहे. मीडिया, न्यूज चॅनेल आणि इंडस्ट्रीतील सर्व लोक कृपया मला मदत करा”.

व्हिडिओ शेअर करणार्‍या हिमांशूने ‘X’ वर सांगितले आहे की कुटुंबातील सदस्यांनी वैष्णवीचा मोबाईल फोनही जप्त केला आहे.

वैष्णवीला पतीकडूनही झाली होती मारहाण

अभिनेत्री वैष्णवी धनराज याआधीही घरगुती हिंसाचाराची शिकार झाली होती. अभिनेत्री वैष्णवीने 2016 मध्ये अभिनेता नितीन शेरावत सोबत लग्न केले होते. ‘स्पॉटबॉय’ला दिलेल्या मुलाखतीत वैष्णवीने म्हटले होते की ती घरगुती हिंसाचाराला बळी पडली होती आणि त्यामुळे तिचा घटस्फोट झाला. यात तिने सांगितले होते की “मी घाबरले आणि घरातून पळून गेले. माझ्या पतीने मला एवढी मारहाण केली होती की माझ्या पायातून रक्तस्त्राव झाला होता. भावनिक, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तो माझा पत्नी म्हणून शेवटचा दिवस होता”. असं खुलासा तिने केला होता. त्यावेळीही अभिनेत्री वैष्णवी धनराज खूप चर्चेत आली होती.

आता पुन्हा एकदा अभिनेत्री वैष्णवी चर्चेत आहे. आता तर तिने तिच्या घरच्यांवरच घरगुती हिंसाचाराचे आरोप केले आहे. तसेच तिच्या व्हायरल व्हिडिओत तिच्या चेहऱ्यावर आणि हातावर गंभीर जखमांच्या खुणा पाहायला मिळत आहे. हे बघून प्रेक्षकांनाही धक्का बसलाय.

Share this Post:

सुजाता कराड या ब्लॉगर आणि कंटेंट रायटर आहेत. त्यांना मनोरंजन क्षेत्रात जास्त रस आहे. त्यामुळे या क्षेत्रातील चित्रपट, मालिका, कलाकार आणि इतर अपडेट्सची माहिती न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सध्या ती मराठीजन या आमच्या वेबसाइटवर लेखिका म्हणून काम करत आहे आणि येथे मनोरंजनाच्या बातम्या आणि अपडेट्स लिहिते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त