Maratha reservation: मराठा आरक्षणासाठी जातीय सर्वेक्षणास या मराठी कलाकारांचा विरोध – लात आणि कानाखाली मारण्याची भाषा

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी सध्या महाराष्ट्रात जातीय सर्वेक्षण होत असल्याने अनेकांना त्यांची जात विचारली जात आहे. यात सरकारी शिक्षक किंवा महानगरपालिकेचे कर्मचारी लोकांच्या घरी जाऊन प्रत्येकाला त्यांची जात विचारत हे सर्वेक्षण करत आहे. यात या कर्मचाऱ्यांची काहीही चूक नाही. त्यांना सरकारने जे काम दिलेय तेच ते करत आहे. (These Marathi actors oppose caste survey for Maratha reservation)

पण यात काही मराठी कलाकार असे आहे की ज्यांना या कर्मचाऱ्यांनी जात विचारल्याचे अजिबातही आवडलेले दिसत नाही. त्यामुळे हे कलाकार त्या कर्मचाऱ्यांवर आपला राग व्यक्त करतांना दिसताय. यात मराठी अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री केतकी चितळे यांनी जात विचारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर राग व्यक्त करत संतप्त पोस्ट केल्या आहे. पण त्यांच्या या पोस्ट मुळे मराठा समाजातील अनेकजण त्यांच्यावर प्रचंड भडकले आहे. (Marathi Actor Pushkar Jog and Ketaki Chitale on caste survey for Maratha reservation)

अभिनेता पुष्करची लात आणि कानाखाली मारण्याची भाषा

प्रसिद्ध मराठी अभिनेता पुष्कर जोग हा आता दिग्दर्शक आणि निर्माता या जबाबदाऱ्या सुद्धा पार पाडत आहे. तसेच अभिनेता पुष्कर जोग हा सोशल मिडियावर सुद्धा खूप सक्रीय असतो. तो अनेक सामाजिक विषयांवर आपली परखड मतं मांडत असतो. महापालिकेचे कर्मचारी घरी जातीय सर्वेक्षण करायला आल्यामुळे नुकतंच पुष्कर जोगने सोशल मीडियावर एक संतप्त पोस्ट शेअर केली आहे.

पुष्कर जोगने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलंय की “काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय म्हणून माझी जात विचारत होते. ते जर बाईमाणूस नसते तर 2 लात नक्कीच मारल्या असत्या… कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार.” असं अभिनेता पुष्करने म्हटलंय.

Actor Pushkar Jog on caste survey for Maratha reservation
Actor Pushkar Jog on caste survey for Maratha reservation

यात सरकारी कर्मचाऱ्यांनी तेच काम केलंय जे सरकारने त्यांना करण्यास सांगितलंय. मराठा आरक्षणा संदर्भात जातीय सर्वे सुरु असल्याने ते सर्वांना जात विचारणारच. मग यात चिडण्यासारखे काय? आणि यात त्या कर्मचाऱ्यांची काय चूक? ते तर फक्त आपलं काम करताय. यावरून त्यांना लात आणि कानाखाली मारण्याची भाषा करणे योग्य आहे का?

अभिनेत्री केतकी मराठा जातीबद्दल द्वेष करतेय का?

दुसरीकडे अभिनेत्री केतकी चितळे हिने सुद्धा मराठा आरक्षणा संदर्भात जात सर्वेक्षण करायला आलेल्या महिलेला अनेक प्रश्न विचारले आहे. याबद्दल तिने एक व्हिडीओ रेकॉर्ड केलाय. यात केतकीला त्या महिला कर्मचाऱ्याने “तुम्ही मराठा आहात का?” असं प्रश्न विचारल्यावर केतकीने “अजिबात नाही. चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण आहे.” असं अभिमानाने म्हटलंय.

हा व्हिडिओ शेअर करत केतकीने म्हटलंय की “या देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क, समान कायदा, समान नियम नाहीत. आज ज्या दिवशी भारत सार्वभौम प्रजासत्ताक झाला, त्या दिवशी महानगरपालिका भेदभाव करण्यासाठी लोकांना घरी पाठवून, दारं ठोठवून जात विचारत आहे. अब गाओ संविधान, संविधान.” असं म्हणत केतकीने जात सर्वेक्षाणाबद्दल संतप्त पोस्ट केली आहे.

अभिनेत्री केतकी चितळेच्या या पोस्टखाली मराठा समाजाच्या अनेक व्यक्तींनी तिच्यावर टीका करत ती मराठा जातीबद्दल द्वेष करत असल्याचे म्हटलं आहे. तसेच तुम्हाला एवढा स्वतःचा जातीचा अभिमान आहे, तर मग इतरांना का असू नये? असंही या मराठा समाजाच्या व्यक्तींनी केतकीला म्हटलंय.

Ketaki Chitale on caste survey
Ketaki Chitale on caste survey

मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या जात सर्वेक्षणाला विरोध केल्याने अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री केतकी चितळे यांच्यावर सध्या खूप टीका होत आहे.

Share this Post:

संतोष चकोर हे एक लेखक आहेत. 2015 पासून ते डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब आणि ब्लॉगिंग या क्षेत्रातही काम करत आहेत. विशेषतः ते तंत्रज्ञान, आरोग्य आणि इतर क्षेत्रातील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. सध्या ते मराठीजन या आमच्या वेबसाइटवर संपादक आणि लेखक म्हणून काम करत आहेत आणि दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील अपडेट्स लिहितात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त