Jui Gadkari: जुई गडकरीला डॉक्टरांनी सांगितलं “तू आई होऊ शकणार नाहीस” – धक्कादायक खुलासा

Jui Gadkari: स्टार प्रवाह वरील ‘ठरलं तर मग’ (Tharla Tar Mag) ही सध्या महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय मालिका आहे. यात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) हिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. आज जुई ही मराठी मधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. पण काही महिन्यांपूर्वी ती अतिशय गंभीर आजाराने त्रस्त होती. “तू आई होऊ शकणार नाहीस” असंही डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं. नुकतंच जुई गडकरीने ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या आजारपणाबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहे. (Tharla Tar Mag Actress Jui Gadkari Shocking Revelation)

या मुलाखतीत अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली आहे की “मी आई होऊ शकणार नाही हे डॉक्टरांनी मला वयाच्या 27 व्या वर्षी सांगितलं होतं. डॉक्टरांनी मला जेव्हा हे सांगितलं तेव्हा मी ‘पुढचं पाऊल’ ही मालिका करत होते. मालिकेत तेव्हा कल्याणीला बाळ होणार असल्याचा ट्रॅक सुरू होता. त्यावेळी एकीकडे खऱ्या आयुष्यात मला बाळ होणार नाही आणि दुसरीकडे मालिकेत मला एका आईची भूमिका साकारायची होती. ते दिवस माझ्यासाठी खूप त्रासदायक होते.”

“मानसिकदृष्ट्या मी खचले होते. मणका डिजनरेट झाला होता. पिट्युटरी ग्रंथीमध्ये प्रोलॅक्टिन ट्युमर झाला होता. त्यामुळे मी आई होऊ शकत नाही, अशी शक्यता डॉक्टरांनी वर्तवली होती. सुरुवातीला फक्त डोकं दुखायचं, पुढे वजन वाढलं. मासिक पाळीत अडचणी येऊ लागल्या.”

“आपल्या समाजात स्त्रीला मुलबाळ झाल्यावरच ती पूर्ण होते असा समज आहे. पण ज्या महिलांना बाळ होऊ शकत नाही त्यांनी काय करायचं? त्या स्त्रिया नाहीत का? तिच्यात मातृत्व नाही का? मला आज अनेक लोक म्हणतात वयाची 35 वर्षे पार केलीस आता कधी लग्न करणार? पण माझा प्रॉब्लेम वेगळा आहे. महत्त्वाचं म्हणजे यासगळ्यात माझं कुटुंब माझ्यासोबत आहे. त्यामुळे मला फरक पडत नाही. आता माझे रिपोर्ट सकारात्मक येत असून भविष्यात मी जुळ्या मुलांची आई होऊ शकते.” असं अभिनेत्री जुईने म्हटलं आहे.

अभिनेत्री जुई गडकरीने आता तिच्या या गंभीर आजारावर मात करत ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात दमदार कमबॅक केलं आहे.

Share this Post:

सुजाता कराड या ब्लॉगर आणि कंटेंट रायटर आहेत. त्यांना मनोरंजन क्षेत्रात जास्त रस आहे. त्यामुळे या क्षेत्रातील चित्रपट, मालिका, कलाकार आणि इतर अपडेट्सची माहिती न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सध्या ती मराठीजन या आमच्या वेबसाइटवर लेखिका म्हणून काम करत आहे आणि येथे मनोरंजनाच्या बातम्या आणि अपडेट्स लिहिते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 thoughts on “Jui Gadkari: जुई गडकरीला डॉक्टरांनी सांगितलं “तू आई होऊ शकणार नाहीस” – धक्कादायक खुलासा”

  1. It seems like you’re repeating a set of comments that you might have come across on various websites or social media platforms. These comments typically include praise for the content, requests for improvement, and expressions of gratitude. Is there anything specific you’d like to discuss or inquire about regarding these comments? Feel free to let me know how I can assist you further!

    Reply
  2. Thank you for reaching out! If you have any specific questions or topics in mind, please feel free to share them, and I’ll do my best to assist you. Whether you’re curious about a particular technology, scientific concept, literary work, or anything else, I’m here to provide information, advice, or engage in a discussion. Don’t hesitate to let me know how I can help you further!

    Reply

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त