Jui Gadkari: “जुई मुलांना नादी लावतेय.. जुईचा घटस्फोट झालाय, तिला मुलंही आहेत” – अभिनेत्री जुई गडकरी चा खुलासा

Jui Gadkari: स्टार प्रवाह वरील ‘ठरलं तर मग’ (Tharla Tar Mag) ही सध्या महाराष्ट्रातील सर्वाधिक बघितली जाणारी मालिका आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ही मालिका TRP मध्ये सतत पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) ही सध्या मराठी प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री बनली आहे. (Tharla Tar Mag Actress Jui Gadkari about her Body shaming)

असा सुरु झाला अभिनय क्षेत्रातील प्रवास

अभिनेत्री जुई गडकरी ही आता जरी एक प्रसिद्ध अभिनेत्री बनली असली तरीही तिचा या अभिनय क्षेत्रातील प्रवास हा सहज सोप्पा नव्हता. तिला आतापर्यंत अनेक संकटांना तोंड द्यावं लागलंय. पण सुरुवातील जुईला अभिनयाची नाही तर गाण्याची फार आवड होती. अभ्यासात अजिबातही रस नसल्याने शाळेत जेमतेम मार्क मिळवणाऱ्या जुईला कॉलेजमध्ये मात्र कल्चरल कोट्यातून अॅडमिशन घ्यावे लागले होते.

एकदा एका मैत्रिणीचे ऑडिशन होते, त्यामुळे जुई सुद्धा तिच्यासोबत गेली होती. यावेळी जुईने सुद्धा ऑडिशन दिले आणि तिची निवड झाली. येथूनच जुईचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरु झाला. एकदा तर जुईला एकाचवेळी तीन तीन मालिकांच्या ऑफर आल्या. पण या मालिकांत काम करत असतांना तीला प्रचंड धावपळ करावी लागली. त्यामुळे पुढे जुईला असंही वाटू लागलं की आता अभिनय क्षेत्रात काम करणे थांबवावे आणि साधी नोकरी करून आयुष्य छान जगावं असा तिने विचार केला होता.

आईमुळे स्वीकारली ‘पुढचं पाऊल’ मालिका

पण यानंतर ‘पुढचं पाऊल’ या मालिकेत तिची प्रमुख भूमिकेसाठी निवड झाली. मग आईने समजावल्यानंतर जुईने ही मालिका स्वीकारली. अभिनय क्षेत्रात आल्यापासून काम मिळवण्यासाठी जुईला अजिबात स्ट्रगल करावा लागला नाही. कारण तिने सांगितल्याप्रमाणे सुरुवातीपासून तिला एक काम संपलं की दुसरं काम मिळत गेलं. कामात खूप व्यस्त असल्याने बाहेरचं खाणं, पार्ट्या करणं हे जुईच्या आसपासही नव्हतं, त्यामुळे मिळालेले पैसे ती सेव्ह करायची म्हणूनच तिला आर्थिक चणचण कधीच भासली नाही.

जुईला जीवघेणं आजारपण

पण म्हणतात ना की प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी भयानक वाईट काळ येतोच. तसाच काळ जुईच्या आयुष्यातही आला. अभिनय क्षेत्रातील या प्रवासादरम्यान जुईला एका जीवघेण्या आजारपणाला तोंड द्यावे लागले. पण या काळातही जुईने अजिबातही हार मानली नाही. अगोदर तिने मेडिकल उपचाराने ठीक होण्याचा प्रयत्न केला, पण पाहिजे तसे यश मिळाले नाही, मग तिने स्वामी समर्थांचे नाव घेत एक दिवस सर्व गोळ्या-औषधे फेकून देत योगा आणि इतर आयुर्वेदिक उपचार करणे सुरु केले. यांनतर आता जुई पुन्हा तिचे नॉर्मल आयुष्य जगत आहे. तसेच तीने आता ठरलं तर मग या मालिकेद्वारे पुन्हा अभिनय क्षेत्रात दमदार पुनरागमन केलं आहे.

“जुई मुलांना नादी लावतेय..”

अभिनय क्षेत्रातील या प्रवासादरम्यान जुईला अनेक वेळा बॉडी शेमिंगही केलं गेलं. अनेकदा तिला नको ते टोमणेही ऐकावे लागले. त्यातील एक टोमणा तिला प्रचंड जिव्हारी लागला होता. नुकत्याच राजश्री मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत जुईने याबद्दल खुलासा केला आहे. राजश्री मराठीच्या ‘तिची गोष्ट’ या भागात बोलतांना अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली की “वाईट बोलणारे तर काय वाट्टेल ते बोलत असतात. मला अनेकदा बॉडी शेमिंग केलं गेलंय. बारीक, सावळी असं काही बोललं गेलंय. ती एक कमेंट जी खूप लागली होती ती म्हणजे मी मुलांना नादी लावते हे ऐकलंय मी माझ्याबद्दल. मी कुणाच्या अध्यात मध्यात कधी नसते. तर मला किती त्रास झाला असेल. आणि अशा व्यक्ती कडून ही कमेंट यावी जिने बोलूच नये नीतिमत्ता वगरेच्या बाबतीत. मी मनाला नाही लावून घेत पण डोक्यात राहतं. त्यामुळे माझं असं झालं की बोला. पण मी नाहीये ना तशी. मी नादी लावणारी असते तर मी खूप जणांना नादी लावून माझं लग्नही झालं असतं. तेव्हा मी लहान होते ना. मी रडायचे. मला आईने सांगितलेलं की विचार करायचा, या गोष्टी तिथल्या तिथे ठेवायच्या. नाहीतर माझे बाबा तर अजून डेंजर. ते म्हणायचे तुझ्या बापाने कुणाचं ऐकून घेतलं नाही कधी. ऐकून घेत जाऊ नको. तिथल्या तिथे बोलत जा. पण माझं असं होतं की मी त्या लोकांना बोलून माझं तोंड का खराब करू. त्यांना उत्तर द्यावं एवढी त्यांची पात्रता नाहीये. पण आता माझं कामच त्यांच्या थोबाडीत मारतं.”

“जुईचा घटस्फोट झालाय..”

तसेच यापुढे अभिनेत्री जुईने तिच्या लग्नाविषयी पसरवण्यात आलेल्या अफवांविषयी म्हटलंय की “जुईचा घटस्फोट झालाय, तिला मुलंही आहेत, अशा अफवा माझ्याबद्दल पसरवण्यात आल्या. या अफवांवर मी फक्त हसते. माझं लग्न व्हावं यासाठी मीच खूप उत्सुक आहे आणि ते जेव्हा होईल तेव्हा मी ते सगळ्यांना सांगणारच आहे. मी बऱ्याचदा सेटवरचे फोटो शेअर करत असते त्यामुळे माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र पाहून माझं लग्न झालं असल्याच्या अफवा पसरू लागल्या. मलाही माझ्या हक्काचं मंगळसूत्र गळ्यात घालून मिरवायचं आहे.” असं अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली आहे.

Share this Post:

सुजाता कराड या ब्लॉगर आणि कंटेंट रायटर आहेत. त्यांना मनोरंजन क्षेत्रात जास्त रस आहे. त्यामुळे या क्षेत्रातील चित्रपट, मालिका, कलाकार आणि इतर अपडेट्सची माहिती न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सध्या ती मराठीजन या आमच्या वेबसाइटवर लेखिका म्हणून काम करत आहे आणि येथे मनोरंजनाच्या बातम्या आणि अपडेट्स लिहिते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त