Sur Nava Dhyas Nava Winner Gopal Gawande: सूर नवा ध्यास नवा चा विजेता ठरला गोपाळ गावंडे

Sur Nava Dhyas Nava Winner Gopal Gawande: कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा’ या शोचा 6व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा (Grand Finale) नुकताच पार पडला. या पर्वात जुनी गाणी नव्या अंदाजात ऐकायला मिळाली. तसेच या वर्षीच्या या सीजनला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. आणि आता महाअंतिम सोहळ्यात या सीजनचा विजेता ठरला आहे अकोल्याचा गोपाळ गावंडे. (Sur Nava Dhyas Nava Grand Finale Winner Gopal Gawande)

गोपाळ गावंडे ठरला विजेता

या संपूर्ण स्पर्धेत गोपाळ गावंडे याने अतिशय उत्कृष्ट गाणी सादर केली. गायना मध्ये गोपाळचे समर्पण, त्याची संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी आणि त्याला मिळालेल्या प्रेक्षकांच्या सपोर्टमुळे तो या शो चा महागायक ठरला आहे.

तसेच सूर नवा ध्यास नवा च्या या सीजनची प्रथम उपविजेती ठरली आहे अंतरा कुलकर्णी आणि दुसरा उपविजेता ठरला आहे अनिमेष ठाकूर.

महाअंतिम सोहळ्यास दिग्गज कलाकारांची हजेरी

सूर नवा ध्यास नवा च्या या महाअंतिम सोहळ्यास अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने हे उपस्थित होते. तसेच ‘ओले आले’ या चित्रपटातील कलाकार अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री सायली संजीव हे सर्व या महाअंतिम सोहळ्यास उपस्थित होते.

सूर नवा ध्यास नवा च्या या महाअंतिम सोहळ्यात पोहोचलेल्या सर्वच Top 6 स्पर्धकांनी अतिशय छान गाणी म्हणत परीक्षकांसोबतच प्रेक्षकांचीही मने जिंकली. पण अखेर गोपाळ गावंडे याने बाजी मारत तो या शो चा विजेता ठरला आहे. याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन.

Share this Post:

सुजाता कराड या ब्लॉगर आणि कंटेंट रायटर आहेत. त्यांना मनोरंजन क्षेत्रात जास्त रस आहे. त्यामुळे या क्षेत्रातील चित्रपट, मालिका, कलाकार आणि इतर अपडेट्सची माहिती न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सध्या ती मराठीजन या आमच्या वेबसाइटवर लेखिका म्हणून काम करत आहे आणि येथे मनोरंजनाच्या बातम्या आणि अपडेट्स लिहिते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त