स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2024 सर्व विजेत्यांची नावे – ठरलं तर मग ने मारली बाजी | Star Pravah Parivar Awards 2024

Star Pravah Parivar Awards 2024: स्टार प्रहावरील मालिका या महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय मालिका आहे. त्यामुळे दरवर्षी या मालिकांतील कोणत्या कलाकारांना पुरस्कार मिळाले याचीही खूप चर्चा होत असते. ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2024’ हा सोहळा नुकताच पार पडला. आता यातील सर्वच विजेत्यांची नावे समोर आली आहेत. (Star Pravah Parivar Awards 2024 All Winners Names)

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2024 मध्ये कोणती मालिका आणि कोणते कलाकार सर्वोत्कृष्ट ठरले हे जाणून घेण्याची सर्वच प्रेक्षकांची इच्छा आहे. या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्यात सूत्रसंचालनाची धुरा ईशा केसकर, तेजश्री प्रधान व अभिजीत खांडकेकर यांनी सांभाळली होती.

गेल्या अनेक महिन्यांपासून अभिनेत्री जुई गडकरी हिची ‘ठरलं तर मग’ ही मालिका महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय मालिका आहे. TRP रेटिंग मध्ये ही मालिका नेहमीच एक नंबर वर असते. यावर्षीच्या पुरस्कार सोहळ्यांत ठरलं तर मग या मालिकेने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. तर बघूया या वर्षीच्या पुरस्कार विजेत्यांची नावे.

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2024 विजेत्यांची संपूर्ण यादी :

  • सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य ( स्त्री ) : गुंजा (कुन्या राजाची गं तू राणी)
  • सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य ( पुरुष ) : सागर (प्रेमाची गोष्ट)
  • सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा ( स्त्री ) : सावनी (प्रेमाची गोष्ट)
  • सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा ( पुरुष ) : मल्हार (तुझेच मी गीत गात आहे)
  • सर्वोत्कृष्ट निवेदक : वैदेही परशुरामी, सारा
  • सर्वोत्कृष्ट आई : मुक्ता (प्रेमाची गोष्ट)
  • सर्वोत्कृष्ट वडील : अन्ना (मन धागा धागा)
  • सर्वोत्कृष्ट भावंड : कला, नैना, काजल (लक्ष्मीच्या पावलांनी)
  • सर्वोत्कृष्ट मुलगी : कला (लक्ष्मीच्या पावलांनी)
  • महाराष्ट्राचा धमाका : सिद्धार्थ जाधव
  • महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व : सिंधू (लग्नाची बेडी)
  • महाराष्ट्राची लक्षवेधी जोडी : पिंकी आणि युवराज (पिंकीचा विजय असो)
  • सर्वोत्कृष्ट खलनायिका : रागिणी (शुभविवाह), सावनी (प्रेमाची गोष्ट)
  • सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडी : नित्या व अधिराज (सुख म्हणजे नक्की काय असतं)
  • सर्वोत्कृष्ट अनुरुप जोडी : सायली-अर्जुन (ठरलं तर मग)
  • सर्वोत्कृष्ट सासू : रमा आई (अबोली)
  • सर्वोत्कृष्ट सून : रमा (मुरांबा)
  • सर्वोत्कृष्ट पती : सार्थक (मन धागा धागा जोडते नवा)
  • सर्वोत्कृष्ट पत्नी : भूमी (शुभविवाह)
  • विशेष सन्मान : आई कुठे काय करते
  • सर्वोत्कृष्ट परिवार : सुभेदार कुटुंब (ठरलं तर मग)
  • महाराष्ट्राची महामालिका : ठरलं तर मग

तर असे हे पुरस्कार विजेत्यांची नावे आहे. यात्त ठरलं तर मग ही सर्वाधिक लोकप्रिय मालिका नक्कीच आहे यात कोणतीही शंका नाही. पण यातील काही पुरस्कार विजेत्यांवर प्रेक्षकांनी प्रश्न उपस्थित केले आहे.

Share this Post:

सुजाता कराड या ब्लॉगर आणि कंटेंट रायटर आहेत. त्यांना मनोरंजन क्षेत्रात जास्त रस आहे. त्यामुळे या क्षेत्रातील चित्रपट, मालिका, कलाकार आणि इतर अपडेट्सची माहिती न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सध्या ती मराठीजन या आमच्या वेबसाइटवर लेखिका म्हणून काम करत आहे आणि येथे मनोरंजनाच्या बातम्या आणि अपडेट्स लिहिते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त