sadhi mansa and gharoghari matichya chuli

स्टार प्रवाह वरील ही प्रसिद्ध मालिका बंद होणार? सुरु होणार 2 नवीन मालिका | Sadhi Mansa and Gharoghari Matichya Chuli

Sadhi Mansa and Gharoghari Matichya Chuli: गेल्या काही वर्षांपासून स्टार प्रवाह आणि स्टार प्रवाह वरील मालिका TRP मध्ये सर्वांत पुढे आहे. त्या तुलनेत झी मराठी मात्र मागे पडलेय. त्यामुळेच आता झी मराठीने त्यांच्या अनेक मालिका बंद करून त्या जागेवर नवीन मालिका सुरु केल्या आहे. पण झी मराठीच्या नवीन मालिकांमुळे आपल्या चैनेलचा TRP कमी होऊ नये म्हणून आता स्टार प्रवाह सुद्धा काही नवीन मालिका सुरु करत आहे. (star pravah new serial sadhi mansa and gharoghari matichya chuli, aai kuthe kay karte or tujhech mi geet gaat aahe end)

स्टार प्रवाहवर ‘घरोघरी मातीच्या चुली’ आणि ‘साधी माणसं’ या दोन नवीन मालिका सुरु होत आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे ही प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. तर साधी माणसं या मालिकेत अभिनेत्री शिवानी बावकर आणि अभिनेता आकाश नलावडे हे मुख्य भूमिकेत आहे.

‘घरोघरी मातीच्या चुली’ ही नवीन मालिका येत्या 18 मार्च पासून संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे. सध्या या वेळी ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सुरु आहे. त्यामुळे अनेकांचा असा अंदाज आहे की आई कुठे काय करते बंद होऊ शकते. पण कदाचित ही मालिका बंद न करता तिचा वेळ बदलण्यात येऊ शकतो. कारण असंही आई कुठे काय करते या मालिकेचा TRP आता कमी झाला आहे. अनेक प्रेक्षकांना ही मालिका आता रटाळ वाटू लागली आहे. म्हणूनच या मालिकेचा वेळ बदलून त्या जागेवर घरोघरी मातीच्या चुली ही नवीन मालिका सुरु होत आहे.

star pravah new serial gharoghari matichya chuli
star pravah new serial gharoghari matichya chuli

स्टार प्रवाहवर ‘साधी माणसं’ ही अजून एक नवीन मालिका सुरु होत आहे. या नवीन मालिकेसाठी ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका बंद होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच आता आई कुठे काय करते किंवा तुझेच मी गीत गात आहे या दोन्हीपैकी एक मालिका बंद होनार आणि दुसऱ्या मालिकेची वेळ बदलणार आहे.

star pravah new serial sadhi mansa
star pravah new serial sadhi mansa

दुसरीकडे झी मराठीवर सुद्धा अनेक नवीन मालिका सुरु होत आहे. त्यामुळेच TRP ची लढाई कोणता चैनेल जिंकणार? किंवा कोणत्या चैनेल वरील नवीन मालिका चांगला TRP मिळवण्यात यशस्वी होणार? हे सर्व काही दिवसांत स्पष्ट होईल.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top