Alka Yagnik: प्रसिद्ध गायिका अलका याग्निक (Alka Yagnik) यांना दुर्मिळ आजाराची लागण झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. अलका याग्निक यांनी बॉलिवूडला अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यांची गाणी रसिकांना मंत्रमुग्ध करतात. त्यांच्या सुरेल आवाजाने जगाला वेडं लावलंय. पण आता त्यांना दुर्मिळ आजाराची लागण झाल्याची बातमी ऐकताच चाहते चिंतित झाले आहेत. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे. यासोबतच अलका याग्निक यांनी आजारपणाची व्यथाही पोस्टमध्ये चाहत्यांसोबत शेअर केली आहे. हा आजार नेमका कोणता आहे, याची कारणं लक्षणे आणि उपाय जाणून घ्या.
अलका याग्निक एक प्रसिद्ध भारतीय गायिका आहे. त्या नव्वदच्या दशकातील सर्वोत्कृष्ट गायकांपैकी एक आहे. त्यांचे संगीताशी असलेले नाते अनेक दशकांपूर्वीचे आहे. चार दशकांहून अधिक काळ त्यांचा आवाज लोकांचं मनोरंजन करत आहे. या काळात त्यांनी ‘तू शायर है मैं तेरी शायरी’, ‘गली में आज चांद निकला’, ‘अगर तुम साथ हो’ अशा अनेक सुपरहिट गाण्यांना आपला आवाज दिला आहे.
पण आता सध्या अलका याग्निक एका गंभीर आजाराने त्रस्त आहेत. याबद्दल त्यांनी नुकतंच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करून त्यांच्या तब्येतीची माहिती दिली आहे. यात त्यांनी सांगितले की त्यांना दुर्मिळ शारीरिक समस्या आहे, ज्यामुळे त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांना व्हायरल अटॅकमुळे हा त्रास झाला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या चाहत्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.
गायिका अलका याग्निक यांना रेअर सेंसरिनुरल नर्व्ह हिअरिंग लॉस (Sensorineural Nerve Hearing Loss) हा दुर्मिळ आजार झाला आहे. या आजारामध्ये कानापासून मेंदूपर्यंत जाणारी नस डॅमेज होते.
अचानक ऐकू येणं बंद होण्यामागची कारणे काय?
हा आजार होण्याची काही कारणे:
- वाढत्या वयोमानानुसार नस डॅमेज होतात.
- काही वेळेस व्हायरल इंन्फेक्शनमुळे मेनिन्जायटिस (मेंदूवरील आवरणाला सूज आणणारा आजार), गोवर आणि मेनिएर रोग यांसारख्या रोगांनंतर नसांचे नुकसान होते.
- डोक्याला किंवा कानाला दुखापत झाल्यामुळेही नसांचे नुकसान होते.
- कानाच्या आतील पेशींना इजा पोहोचवणाऱ्या काही औषधांमुळे नसा डॅमेज होऊन बहिरेपणा येतो.
- बराच वेळ मोठ्या आवाजाच्या संपर्कात राहिल्याने बहिरेपणा येऊ शकतो.
- सतत हेडफोन लावून गाणी ऐकल्यास देखील अशाप्रकारचा बहिरेपणा आल्याच्या अनेक घटना घडल्या आहे.
या आजारावर उपाय काय?
दरम्यान, व्हायर इंन्फेक्शनमुळे बहिरेपणा आला असेल तर, हळूहळू रुग्ण बरा होताना, त्याला ऐकू येऊ लागते. पण, हा आजार पूर्णपणे बरा होत नाही. मात्र, उपचारांमुळे काही प्रमाणात ऐकण्याची क्षमता परत आणता येऊ शकते. यामध्ये, औषधे, कॉक्लियर इम्प्लांट आणि श्रवणयंत्र यांचा समावेश आहे. या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कर्णबधिर व्यक्तीस आवाज ऐकणे शक्य होऊ शकते.
Hey, I’m Jack. Your blog is a game-changer! The content is insightful, well-researched, and always relevant. Great job!