Premachi Goshta: मुक्ता-सागरच्या लग्नाला आलेल्या सायली-अर्जुन मध्ये आहे हे खास नातं

Premachi Goshta: अभिनेत्री तेजश्री प्रधान व राज हंचनाळे यांची प्रमुख मुख्य असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. सध्या चर्चा आहे ती या मालिकेतील मुक्ता आणि सागर (Mukta and Sagar) यांच्या लग्नाची. त्यांच्या या लग्नाला स्टार प्रवाह वरील इतर मालिकांतील अनेक कलाकार आल्याचे पाहायला मिळताय.

नुकतंच ‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag) या लोकप्रिय मालिकेत सायली आणि अर्जुन (Sayali and Arjun) यांनी देखील मुक्ता-सागरच्या लग्नास हजेरी लावली आहे. मालिकेत मुक्ता-सागरबरोबर सायली आणि अर्जुन यांचे खास नातं असल्याचं दाखवलं जाणार आहे. यात अर्जुन हा सागरचा एक खास मित्र म्हणून लग्नाला आला आहे तर सायली ही मुक्ताची खूप जवळची मैत्रिण दाखवली जाणार आहे. तसेच मुक्ता सायलीच्या आश्रमातल्या मुलांवर मोफत उपचार करायची असंही दाखवले जाईल. आणि त्यामुळेच सायली ही मुक्ताला शुभेच्छा देण्याबरोबरच तिच्या आश्रमातील मुलांवर प्रेमाने उपचार केल्याबद्दल सायली ही मुक्ताचे आभार सुद्धा मानणार आहे. अशी कहाणी या मालिकेत दाखवली जाईल. (tharala tar mag sayali and arjun relation with mukta and sagar in premachi goshta serial)

या मालिकेत चिमुकल्या सईवरच्या प्रेमापोटी दोन विरोधी स्वभावाचे मुक्ता आणि सागर यांचे लग्न होत आहे. त्यांच्या या लग्नामुळे सतत एकमेकांच्या विरोधात असणारे आणि सतत वाद घालणारे गोखले आणि कोळी कुटुंब आता एकत्र येत आहे. पण एकत्र आल्यानंतरही यांच्यातील वाद थांबणार की सुरूच राहणार हे पुढील कहाणीत स्पष्ट होईल.

‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतील मुक्ता आणि सागर यांच्या लग्नात ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेतील आनंदी आणि सार्थक तसेच ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेतील पिंकी आणि युवराज यांनी देखील हजेरी लावली आहे. प्रेमाची गोष्ट मालिकेतील या लग्नात नवरी बनलेली मुक्ता म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचा या लग्नातील लुक सर्व प्रेक्षकांना आवडतोय. तिच्या या लूकचे खूप कौतुक होत आहे.

Share this Post:

सुजाता कराड या ब्लॉगर आणि कंटेंट रायटर आहेत. त्यांना मनोरंजन क्षेत्रात जास्त रस आहे. त्यामुळे या क्षेत्रातील चित्रपट, मालिका, कलाकार आणि इतर अपडेट्सची माहिती न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सध्या ती मराठीजन या आमच्या वेबसाइटवर लेखिका म्हणून काम करत आहे आणि येथे मनोरंजनाच्या बातम्या आणि अपडेट्स लिहिते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त