Saregamapa Little Champs: सारेगमपची विजेती ठरली गौरी पगारे, पण प्रेक्षकांना निकाल मान्य नाही

Saregamapa Little Champs: ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ 2023 या गायन शो चा महाअंतिम सोहळा नुकताच मोठ्या थाटात पार पडला. सा रे ग म प लिटिल चॅम्प्सच्या या महाअंतिम सोहळ्यात आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे हे गायक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर यात मुंबईची श्रावणी वागळे, जयेश खरे, गोव्याचा हृषिकेश ढवळीकर, देवांश भाटे, जयेश खरे आणि गौरी अलका पगारे हे स्पर्धक महाअंतिम फेरीत अंतिम 6 स्पर्धकांत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले. या अटीतटीच्या स्पर्धेत कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील गौरी अलका पगारे हिने बाजी मारत महाविजेती ठरली. (Zee Marathi’s Saregamapa Little Champs Winner Gauri Pagare)

पण गौरी पगारे हिला विजेती करणे हा निकाल प्रेक्षकांना मात्र मान्य होत नाहीये. अनेक प्रेक्षकांनी या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. तिची गरीब परिस्थिती आहे म्हणून तिला विनर करणं हे चुकीचं असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. हा बाकी चांगलं गाणाऱ्या मुलांवर अन्याय असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली आहे. अनेक प्रेक्षकांनी श्रावणी हि जिंकायला हवी होती असं मत व्यक्त केलंय.

बच्चे कंपनीचे अप्रतिम गाणे

काही महिन्यांपूर्वीच झी मराठीवर सारेगमप लिटिल चॅम्प्स् हा गाण्याचा कार्यक्रम सुरु झाला होता. या शोमधील बच्चे कंपनीने अप्रतिम गाणे गात अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली.

सा रे ग म प लिटिल चॅम्प्सचे या वर्षीचा हा सीजन गुरुकूलवर आधारित होता. यावेळी मुलांना वैशाली म्हाडे आणि सलील कुलकर्णी या गायकांचे मार्गदर्शन लाभले. तर प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर हे प्रमुख परीक्षकाच्या भूमिकेत होते. आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हि या शोची सूत्रसंचालिका होती.

गौरी पगारे ठरली विजेती

‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ 2023 च्या महाअंतिम सोहळ्यात पोहोचलेल्या सर्वच स्पर्धकांनी यावेळी एकाहून एक सरस गाणी सादर केली. मात्र, या सगळ्यात वरचढ ठरली ती गौरी अलका पगारे. गौरीला बक्षीस म्हणून 1 लाख 50 हजार रुपयांचा धनादेश व सोबतच चांदीची वीणा मिळाली.

या स्पर्धेत प्रथम उपविजेता ठरली मुंबईची श्रावणी वागळे व द्वितीय उपविजेते पद जयेश खरेला मिळाले. या दोघांना प्रत्येकी 1 लाख रुपये मिळाले. तर इतर स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरवले गेले.

गौरी पगारेची गरीब परिस्थिती

या शो ची विजेती ठरलेली गौरी पगारे ही खेडेगावातील मुलगी आहे. तिची घरची परिस्थिती एकदम हालाखीची, अगदी दोन वेळच्या जेवणाची आबाळ, या सर्व परिस्थितीवर मात करत गौरीने हे यश मिळवलेय. विशेष म्हणजे तिने गाण्याचे कौणत्याही प्रकारचे शिक्षण घेतले नव्हते. ती सहज गाणी गुणगुणायची, गावच्या मंदिरात किंवा मिळेल त्या ठिकाणी आपली गायन कला सादर करायची. पण आता सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या मंचाने तिला खरी ओळख मिळवून दिली. तसेच आता गायिका वैशाली म्हाडे हिने गौरीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली असून सुरेश वाडकर यांनी तिला त्यांच्या संगीत विद्यालयात शिक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे.

गौरी पगारे हिचे विजेती ठरल्याबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या सुभेच्छा.

निकाल प्रेक्षकांना मान्य नाही

पण गौरी पगारे हिला विजेते पद दिल्यामुळे अनेक प्रेक्षक प्रचंड नाराज आहे. त्यापैकी काही प्रेक्षकांच्या कमेंट मी येथे दाखवलेल्या आहे. ती गरीब असल्याने तिला विजेते करणे चुकीचे, बाकीच्या चांगले गाणाऱ्या मुलांवर हा अन्याय आहे. गाण्यापेक्षा रडगाण्याचे बक्षीस दिले पाहिजे. गौरी गरीब असल्याने तिला वेगळ्या प्रकारे मदत करायला हवी होती विनर म्हणून नाही. गौरीला कलेपेक्षा गरिबीचा जास्त फायदा झाला. अनफेअर निर्णय. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत प्रेक्षकांनी या निकालावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.

अनेक प्रेक्षकांनी मुंबईची श्रावणी वागळे हि जिंकायला हवी होती असं मत व्यक्त केलंय. पण फक्त गरीब असल्याने गौरी पगारे हिला विजेते करून बाकीच्या चांगल्या गाणाऱ्या स्पर्धकांवर एकप्रकारे अन्याय करण्यात आला असं अनेक प्रेक्षकांचे म्हणणे आहे.

Share this Post:

सुजाता कराड या ब्लॉगर आणि कंटेंट रायटर आहेत. त्यांना मनोरंजन क्षेत्रात जास्त रस आहे. त्यामुळे या क्षेत्रातील चित्रपट, मालिका, कलाकार आणि इतर अपडेट्सची माहिती न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सध्या ती मराठीजन या आमच्या वेबसाइटवर लेखिका म्हणून काम करत आहे आणि येथे मनोरंजनाच्या बातम्या आणि अपडेट्स लिहिते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त