Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil: ‘संघर्षयोद्धा : मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटाचे शुटींग सुरु, हे आहे कलाकार | Sangharsh Yoddha Movie

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठे मुंबईच्या दिशेने निघाल्याचे पाहायला मिळत आहे. आता लवकरच मनोज जरांगे पाटील यांच्यावर चित्रपट येत आहे. या चित्रपटातून त्यांनी मराठा आरक्षणासाठी केलेला संघर्ष प्रेक्षकांना बघायला मिळेल.

संघर्षयोद्धा : मनोज जरांगे पाटील

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून उपोषण आंदोलन करत सरकारला सळो की पळो करून सोडणारे मनोज जरांगे पाटील यांचे नाव आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर आता देशभरात त्यांच्या नावाची चर्चा होत असते. आताही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अखेर आंतरवाली सराटीमधून मुंबईकडे रवाना झाले आहे. यात त्यांच्या सोबत हजारोंच्या संख्येने मराठा समुदाय आहे.

मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी केलेला संघर्ष आता सर्वांना चित्रपट रुपात मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. ‘संघर्षयोद्धा : मनोज जरांगे पाटील’ असं या चित्रपटाचे नाव आहे. नुकतंच जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. मुंबईतील काही भागांमध्ये सुद्धा या चित्रपटाचे शूटिंग करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले होते.

चित्रपटात झळकणार हे कलाकार

‘संघर्षयोद्धा : मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेता ‘रोहन पाटील’ साकारणार आहे. तसेच या चित्रपटात सुरभी हांडे, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, जयवंत वाडकर हे कलाकार सुद्धा झळकणार आहे. (Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil Movie star cast)

या चित्रपटाची निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केली आहे. तर शिवाजी दोलताडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे. 26 एप्रिल 2024 ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे अंतरवाली सराटी येथे उपोषण आंदोलन सुरु असतांना स्वतः या चित्रपटाबद्दल माहिती दिली होती. या चित्रपटाची टीम त्यांना भेटायला आणि त्यांची परवानगी घ्यायला आली होती. मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः या चित्रपटाबद्दल सांगितल्यापासून प्रेक्षकांनाही या चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता आहे.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top