Priyadarshini Indalkar: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनी इंदलकरला भयंकर मेसेज, कमेंट्स, धमक्या

Priyadarshini Indalkar: पुण्यातील ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांचं रामायणातील व्यक्तिरेखा असलेलं नाटक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हंगामा करत बंद पाडलं. कारण या नाटकात राम सीतेचा रोल करणाऱ्या पात्रांच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद तसेच सीता तर सिगारेट पीत असल्याचे या नाटकात दाखवण्यात आले. यामुळे प्रचंड वाद झाला. अनेकांनी त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत तेथे हंगामा केला आणि नाटक बंद पाडले.

यानंतर अभाविपंकडून पोलिसांत तक्रार देण्यात आली. याप्रकरणी आता ललित कला केंद्राचे विभागप्रमुख प्रवीण भोळे यांच्यासह सहा जणांना पोलिसांनी अटक केली. या घडलेल्या प्रकारानंतर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. काहींनी या नाटकाचा विरोध केलाय. तर काही कलाकारांनी नाटकातील कलाकारांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवलाय.

प्रियदर्शिनीने निषेध नोंदवला

महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कॉमेडी शो मध्ये झळकणारी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर हिने सुद्धा instagram वर स्टोरी पोस्ट करत त्या नाटकातील कलाकारांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला. या पोस्ट मध्ये प्रियदर्शिनीने म्हटलंय की “ललित कला केंद्र, पुणे येथील विद्यार्थी कलावंतांवर हल्ला करुन नाटक बंद पाडणाऱ्या दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध…” अशी पोस्ट प्रियदर्शिनी इंदलकरने केली.

Maharashtrachi Hasyajatra actress Priyadarshini Indalkar
Maharashtrachi Hasyajatra actress Priyadarshini Indalkar

प्रियदर्शिनीला मेसेज करत धमक्या

पण अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरच्या या पोस्ट नंतर तिला अनेकांनी मेसेज करत धमक्या दिल्या आहे. प्रियदर्शिनीने पुन्हा एक नवीन स्टोरी पोस्ट करत म्हटलंय की “ललित कला केंद्रावरील हल्ल्यावर मी एक भूमिका व्यक्त केल्याबद्दल गेले 3-4 दिवस मला अनेक भयंकर मेसेज, कमेंट्स आणि काही धमक्या येत आहेत. ही पोस्ट कदाचित काही गोष्टी सोप्या करून सांगेल.” असं म्हणत प्रियदर्शिनीने हितेश पोरजे यांची या प्रकरणावरील एक पोस्ट शेअर केली आहे.

Maharashtrachi Hasyajatra actress Priyadarshini Indalkar
Maharashtrachi Hasyajatra actress Priyadarshini Indalkar

हितेश पोरजे यांची पोस्ट

हितेश पोरजे यांनी त्यांच्या या पोस्ट मध्ये म्हटलंय की “मी काही ललित कला केंद्राचा विद्यार्थी नाही. नाटक अथवा फिल्मशी संबंधित कुठल्याच इंस्टिट्यूटचा पार्ट नाही. पण गेल्या आठवड्यात झालेल्या ललित कला केंद्राच्या वादानिमित्त काही गोष्टी मनात आल्या त्या इथे मांडतोय.

ललित कला केंद्राच्या अनेक विद्यार्थ्यांना मी जवळून ओळखतो. अगदी आत्ताच्या विद्यार्थ्यांपासून ते हिंदी-मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या एस्टॅब्लिश्ड ॲक्टर्सपर्यंत. विदर्भापासून ते कोकणापर्यंतच्या कित्येक छोट्या छोट्या गावांतून अनेक मुलं-मुली इथे शिकायला येतात. पुणे शहरात आपसूकपणे अंगावर येणारे सामाजिक-सांस्कृतिक गुंते मोकळे करत कष्टाने नाटकं उभी करतात, प्रयोग करतात. लोककला आणि पाश्चात्य नाट्यकलेचे प्रशिक्षण घेत खऱ्या अर्थाने संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतात.

संपूर्ण प्रकरण ज्या नाटकाभोवती फिरतंय, त्याचा संपूर्ण प्रयोग हल्लेखोरांनी पाहिलेला नाही. नाटकाचा जो फॉर्म वापरला गेलाय तो समजून घेऊन त्याबद्दल त्यांनी चर्चा करण्याची, वाद घालण्याची हिंमत दाखवली नाही. सो कॉल्ड धर्म-संस्कृतीरक्षक हे असे असतांना देशाला आणि संस्कृतीला कोण कुठे पोहोचवतंय ह्यात कंफ्यूजन व्हायलाच नको.

आता सगळ्यात मोठा मुद्दा. प्रकरण इतकं मोठं झाल्यावर पुढच्या वर्षी एखादा पालक आपल्या मुला-मुलीला ललितमध्ये प्रवेश घ्यायला लगेचंच परवानगी देईल का? नाही दिली परवानगी तर नुकसान कुणाचं? तर अगदी आत्मियतेने नाटक-अभिनय शिकू पाहणाऱ्या निमशहरी, खेड्यातल्या मुलांचं. नाटक-फिल्मद्वारे जातीय आणि धार्मिक वर्चस्वाला आव्हान देण्याची गरज असतांना ही पॅरेलेल सोशल सेंसरशिप आपली मुळं आतवर रुजवणार. हे असंच वाढत राहिलं तर नुकसान कुणाचं!? तर आपल्याच समृद्ध अशा नाटक आणि सिनेमाच्या वारश्याचं. एकदा फक्त एफटीआयआय वर हल्ला करणाऱ्यांचा व्हिडिओ बघा. त्यातली मुलं बघा. पुण्याच्या आसपासची सगळी बहुजनांची पोरं. एकदा फक्त ललित कला केंद्रात तोडफोड करणाऱ्या आणि गुन्हा दाखल झालेल्या भाजप युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांची नावं वाचा. धर्म आणि संस्कृतीची डौलदार पालखी वाहायची कुणी आणि तिच्या आत बसून गंमत बघायची इतरांनीच!” अशी पोस्ट हितेश पोरजे यांनी केली आहे.

प्रियदर्शिनी इंदलकरला चॅलेंज

पण हितेश पोरजे यांच्या या पोस्ट खाली सुद्धा अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर हिला खूप ट्रोल करण्यात आले आहे. अनेकांनी प्रियदर्शिनीला म्हटलंय की “तू महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये मोहम्मद आणि आयेशावर एक विनोदी स्किट करून दाखव… तुला कळेल दहशतवाद काय असतो ते. हाडाची कलाकार असशील तर करून दाखवशील. दाखव तुझं अभिव्यक्तीस्वातंत्र्य. ओपन चॅलेंज.. हिम्मत असेल तर स्वीकार चॅलेंज.” असं म्हणत या सोशल मिडिया युजर्सने प्रियदर्शिनीला चॅलेंज दिले आहे.

Share this Post:

सुजाता कराड या ब्लॉगर आणि कंटेंट रायटर आहेत. त्यांना मनोरंजन क्षेत्रात जास्त रस आहे. त्यामुळे या क्षेत्रातील चित्रपट, मालिका, कलाकार आणि इतर अपडेट्सची माहिती न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सध्या ती मराठीजन या आमच्या वेबसाइटवर लेखिका म्हणून काम करत आहे आणि येथे मनोरंजनाच्या बातम्या आणि अपडेट्स लिहिते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त