Nava Gadi Nava Rajya Off Air: नवा गडी नवं राज्य मालिका बंद – झी मराठीवर अजून एक नवीन शो सुरु होणार

Nava Gadi Nava Rajya Off Air: झी मराठी वरील एकामागून एक मालिका बंद होण्याचा सपाटा सुरु झालाय. त्याजागेवर झी मराठी नवीन कार्यक्रम सुरु करत आहे. याबद्दल आज थोडक्यात माहिती बघूया. (Zee Marathi serial Nava Gadi Nava Rajya off air, and Start new show Drama Juniors.)

मागील काही वर्षांपासून झी मराठी ची TRP साठी तडफड सारखी दिसून येतेय. नवीन सुरु झालेल्या मालिका चांगला TRP न मिळाल्याने 5-6 महिन्याच्या आतच बंद करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या वर्षांपासून झी मराठीवरील एका मागून एक मालिका बंद होताना दिसतेय. विषय चांगला असला तरी TRP कमी असलेल्या मालिका बंद करण्याचा निर्णय झी मराठी कडून घेण्यात येतोय. ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेनंतर आता झी मराठीने अजून एक मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बंद होणारी मालिका म्हणजे ‘नवा गडी नवं राज्य’.

बालकलाकार साईशाच्या एक्झिट नंतर TRP घसरला

बालकलाकार साईशा भोईर ही या मालीकेतून बाहेर पडल्यानंतर ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेच्या TRP मधेही मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याची दिसली. यानंतर मालिकेच्या वेळेतही बदल करण्यात आला. गेल्या काही दिवसांपूर्वी झी मराठीवरील अनेक मालिकांच्या वेळेत बदल करण्यात आला. झी मराठीवर नवीन शो आणि नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्यामुळे जुन्या मालिकेच्या वेळेत बदल केला जात आहे.

झी मराठीवर नवीन रिअ‍ॅलिटी शो

4 डिसेंबरपासून अभिनेता हार्दिक जोशीचा ‘जाऊ बाई गावात’ हा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यानंतर आता झी मराठीवर लवकरच अजून एक नवीन रिअ‍ॅलिटी शो सुरु होतोय. ‘ड्रामा Juniors’ असं नव्या रिअ‍ॅलिटी शोचं नाव आहे. ड्रामा Juniors कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या शहरात लहान मुलांच्या ऑडिशन्स घेण्यात येणार आहे. यासाठी लवकरच झी मराठीकडून ऑडिशन्सच्या तारखा जाहीर करण्यात येतील. या कार्यक्रमात प्रेक्षकांना लहान मुलांच्या बहुरंगी अभिनयाची झलक पाहता येणार आहे.

मालिकेचं शूटिंग संपलं

बहुतेक या नवीन कार्यक्रमामुळेच आता अभिनेत्री पल्लवी पाटील आणि अभिनेता कश्यप परुळेकर यांची मुख्य भूमिका असलेली नवा गडी नवं राज्य ही मालिका आता बंद होत आहे. दोन दिवसांपूर्वीच मालिकेचं शूटिंग संपलं असून डिसेंबर महिन्यातच मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार असल्याची माहिती मिळत आहे. नुकतंच या मालिकेतील काही कलाकारांनी मालिकेच्या शेवटच्या दिवसाचे सेटवरील काही फोटो शेअर केले आहे.

Share this Post:

सुजाता कराड या ब्लॉगर आणि कंटेंट रायटर आहेत. त्यांना मनोरंजन क्षेत्रात जास्त रस आहे. त्यामुळे या क्षेत्रातील चित्रपट, मालिका, कलाकार आणि इतर अपडेट्सची माहिती न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सध्या ती मराठीजन या आमच्या वेबसाइटवर लेखिका म्हणून काम करत आहे आणि येथे मनोरंजनाच्या बातम्या आणि अपडेट्स लिहिते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त