Deepti on Food Wastage: भारतीय संस्कृतीत अन्नाला पूर्णब्रम्ह म्हटलं जातं. एकीकडे आपल्या देशात अनेक गरीब लोकांना दो वेळेचे जेवण सुद्धादुसरीकडे नीट मिळत नाही, आणि दुसरीकडे अनेक लग्न सोहळ्यांत आणि इतर मोठ्या कार्यक्रमांत प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी होत असते. असं चित्र आपल्या भारत देशात नेहमी बघायला मिळत असतं. (Marathi Actress Deepti Devi angry on food wastage in indian weddings)
लग्न म्हटलं की आपल्या देशात हा सोहळा अत्यंत धुमधडाक्यात साजरा केला जातो. या सोहळ्यात लाखो रुपये खर्च करून हजारो लोकांना जेवण दिले जाते. लग्न सोहळ्यातील हा खर्च आपल्या भारतात अजूनही नवरी मुलीचा परिवारच करतो. अशा मोठ्या लग्न सोहळ्यात लोक जेवतांना पूर्ण प्लेट भरून जेवण घेतात पण ते पूर्ण खात नाही. मग प्लेटमध्ये उरलेले अन्न फेकून दिले जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी या लग्न सोहळ्यांत किंवा अशा मोठ्या कार्यक्रमांत होत असते. यावरच आता एका मराठी अभिनेत्रीने आपली नाराजी व्यक्त केली आहे.
‘नाळ, नाळ 2, चंपक, कंडिशन्स अप्लाय’ अशा चित्रपटांमध्ये झळकलेली मराठी अभिनेत्री दीप्ती देवी हिने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एका कार्यक्रमातील अन्नाच्या नासाडी करत लोक कशा प्रकारे प्लेटमध्ये उरलेले अन्न फेकून देतात याचा एक फोटो शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. या फोटोत एक माणूस ते फेकून दिलेले किंवा वाया घालवलेले अन्न एकत्र करत आहे. या फोटो सोबतच अभिनेत्री दीप्तीने लोकांना अन्न वाया न घालवण्याची विनंतीही केली आहे.
अन्नाच्या नासाडीचा फोटो शेअर करत अभिनेत्री दीप्ती देवी हिने म्हटलंय की “स्वत:च्या पैशांची पाणीपुरी विकत घेतली तर थाळीतले पाणीही पितात, आईस्क्रीम घेतली तर त्याचे झाकणही चाटतात किंवा शेंगदाणेदेखील घेतले तर त्याचे टर्फल पण सोडत नाही, मग कुणाच्या लग्नसमारंभात अन्न का वाया घालवतात?”
“लग्न समारंभातील अन्नासाठी कुणाच्या तरी बापाने आयुष्य कष्ट करुन घालवलेले असते. म्हणून हात जोडून विनंती आहे की, जेवढी भूक असेल आणि पोटात जितकं मावेल तितकंच अन्न घ्या. कृपया अन्न वाया घालवू नका. अन्न हे पूर्ण ब्रम्ह आहे.” असं म्हणत अभिनेत्री दीप्तीने लोकांना अन्न वाया न घालवण्याची विनंतीही केली आहे.
