Kantara Chapter 1 Open Auditions: सुवर्ण संधी – कांतारा चित्रपटात तुम्हीही काम करू शकता – असं अप्लाय करा

Kantara Chapter 1 Open Auditions: दक्षिण भारतीय ‘कांतारा’ हा चित्रपट बघितला नसेल असा क्विचीतच कोणीतरी भारतात सापडेल. कर्नाटक चित्रपट सृष्टीतील कांतारा चित्रपट सुपरहिट ठरला होता. पण आता याच्या पुढच्या पार्ट मध्ये तुम्हालाही काम करण्याची संधी आहे. यासाठी इतर माहिती थोडक्यात बघूया.

भगवान परशुराम यांच्या सारखे पात्र

2022 मध्ये कांतारा या चित्रपटाता पहिला भाग प्रदर्शित झाला होता. ‘कांतारा’ या चित्रपटातील मुख्य अभिनेता ऋषभ शेट्टी या या चित्रपटामुळे संपूर्ण भारतात लोकप्रिय झाला. ऋषभ शेट्टीने या चित्रपटात अभिनयासोबतच दिग्दर्शन सुद्धा केले आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयानं आणि दिग्दर्शनानं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. कांताराच्या सक्सेसनंतर ऋषभ शेट्टी आता ‘कांतारा: चॅप्टर 1’ बनवत आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं बजेट हे 125 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. असंही म्हटलं जातंय की Kantara Chapter 1 मध्ये भगवान परशुराम यांच्या सारखे पात्र दाखवले जाणार आहे. त्यामुळे हा नवीन पार्ट बघण्याची प्रेक्षकांनाही खूप उत्सुकता आहे. पण आता या नवीन चित्रपटात तुम्हालाही काम करण्याची संधी आहे.

ओपन ऑडिशनची घोषणा

Kantara Chapter 1 या चित्रपटासाठी आता ओपन ऑडिशन सुरु झाली आहे. ओपन ऑडिशन ज्यात देशातल्या कोणत्याही भागातील व्यक्ती या ऑडिशन मध्ये सहभागी होऊ शकते. अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी याने Kantara Chapter 1 साठी ओपन ऑडिशनची घोषणा केली आहे. यानुसार Kantara Chapter 1 चित्रपटात काही महत्वाच्या आणि सामान्य लोकांची भूमिका साकारण्यासाठी प्रेक्षकांना सुद्धा एक चांगली संधी मिळाली आहे. संपूर्ण भारतातील कोतेही व्यक्ती यात सहभागी होऊ शकतात. त्यासोबतच ऋषभ शेट्टी ने या Open Auditions साठी अप्लाय कसं करता येईल याविषयी देखील माहिती दिली आहे.

येथे करा अप्लाय

अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीनं त्याच्या एक्स म्हणजेच ट्विटर अकाऊंचवरून ही माहिती शेअर केली आहे. यासाठी अगोदर कांताराच्या ऑफिशियल वेबसाईटवर स्वतःची प्रोफाईल अपलोड करायची आहे. यानंतर ज्यांचे प्रोफाईल चांगले वाटेल त्या लोकांना यातून शॉर्ट लिस्ट करण्यात येईल. यानंतर निवडलेल्या लोकांना प्रत्यक्षात भेटून अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी समोर Audition होणार आहे. ऋषभ शेट्टीनं शेअर केलेल्या या पोस्टमध्ये त्याने लिहिलं आहे की ‘ज्यांना कलाकार होण्याची इच्छा आहे. त्यांनी या आणि कांताराच्या टीमचा भाग व्हा. आजचं अप्लाय करा. kantara.film च्या वेब साईटवर जाऊन तुमचं प्रोफाइल अपलोड करा’. असं ऋषभ शेट्टीनं म्हटलंय.

अप्लाय कसं करायचं?

Kantara Chapter 1 चित्रपटाच्या ऑडिशनसाठी अगोदर तुम्ही Google वर kantara.film ही कांतारा चित्रपटाची ऑफिशियल वेबसाईट सर्च करा. येथे फोटो मध्ये याबद्दल माहिती दाखवली आहे. त्याप्रमाणे kantara.film या वेबसाईटवर क्लिक करा.

Kantara Chapter 1 Open Auditions official website
Kantara Chapter 1 Open Auditions official website

यानंतर या वेबसाईटवर सुरुवातीलाच होम पेजवर Kantara Chapter 1 चित्रपटाचे पोस्टर दिसेल. या पोस्टरवर कांतारा या चित्रपटाच्या नावाखाली Audition Now चे ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.

How To Apply for Kantara Chapter 1 Open Auditions
How To Apply for Kantara Chapter 1 Open Auditions

यानंतर तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी Continue या ऑप्शनवर क्लिक करा.

How To Apply for Kantara Chapter 1 Open Auditions
How To Apply for Kantara Chapter 1 Open Auditions

यानंतर तुम्हाला या फॉर्म मध्ये तुमची सर्व माहिती टाकायची आहे. येथे तुम्हाला जे विचारले जाईल ती सर्व माहिती भरा आणि तुमची प्रोफाईल तयार करा.

How To Apply for Kantara Chapter 1 Open Auditions
How To Apply for Kantara Chapter 1 Open Auditions

याप्रकारे सर्व माहिती देवून प्रोफाईल अपलोड केल्यानंतर तुमची निवड केली जाईल. याबद्दल तुमची निवड झाल्याचे तुम्हाला कळवले जाईल. यानंतर अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी हा समोरासमोर भेटून तुमचे ऑडिशन घेईल.

पुरुष-महिलांसाठी वयोमर्यादा

Kantara Chapter 1 या चित्रपटाच्या Auditions साठी पुरुषांसाठी वयाची मर्यादा ही 30 ते 60 वर्ष आहे. तर महिलांसाठी 18 ते 60 वर्षांची वय मर्यादा आहे. फक्त जे प्रोफेश्नल Actor आहेत तेच नाही तर जे न्यूकमर्स आहेत ते देखील अप्लाय करू शकतात. ज्यांना अभिनय क्षेत्रात काम करायचं आहे त्यांच्यासाठी ही एक खूप चांगली संधी आहे. अभिनेता ऋषभ शेट्टीच्या या पोस्टवर अनेकांनी त्यांचं नाव देत ऑडिशनसाठी अप्लाय केलं आहे. पण तुम्हाला सोशल मिडियावर अप्लाय करायचा नाही तर kantara.film या वेबसाईटवर जाऊन अप्लाय करायचं आहे.

तर अभिनय करू इच्छिणाऱ्यांसाठी कांतारा टीमचा भाग होण्याची ही एक चांगली संधी आहे. मराठी लोकही Kantara Chapter 1 या चित्रपटाच्या Auditions मध्ये सहभागी होऊ शकतात. तर जर तुम्हालाही अभिनय करण्याची इच्छा असेल तर तर वर दिलेल्या वेबसाईटवर जाऊन अप्लाय करा.

Share this Post:

संतोष चकोर हे एक लेखक आहेत. 2015 पासून ते डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब आणि ब्लॉगिंग या क्षेत्रातही काम करत आहेत. विशेषतः ते तंत्रज्ञान, आरोग्य आणि इतर क्षेत्रातील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. सध्या ते मराठीजन या आमच्या वेबसाइटवर संपादक आणि लेखक म्हणून काम करत आहेत आणि दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील अपडेट्स लिहितात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त