Hardeek Joshi: अभिनेता हार्दिक जोशीवर कोसळला दु:खाचा डोंगर – या लाडक्या व्यक्तीचे निधन

Hardeek Joshi: प्रसिद्ध मराठी अभिनेता हार्दिक जोशी याचा जाऊ बाई गावात हा बिग बॉस सारखाच असलेला नवीन रिअॅलिटी शो झी मराठीवर 4 डिसेंबर पासून सुरु होतोय. पण त्या अगोदरच एक दुखद बातमी मिळालीय. ती म्हणजे अभिनेता हार्दिक जोशीच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळलाय.

हार्दिक जोशीच्या वहिनी ज्योती यांचं निधन झालंय. त्यामुळे हार्दिक खूप भावूक झाल्याचा दिसतोय. जाऊ बाई गावात हा शो हार्दिकनेच करावा असं हात हातात घेऊन ज्योती वहिनेने हार्दिक कडून प्रॉमिस घेतलं होतं. आणि आता 4 डिसेंबरला हा शो सुरु होतोय पण हार्दिकच्या वहिनी या जगात नाही. त्यात योगायोग असा की 4 डिसेंबरलाच ज्योती वहिनींचा वाढदिवस सुद्धा आहे. यामुळेच हार्दिक ने हा संपूर्ण शो त्याच्या वहिनींना डेडिकेट केलाय.

सोशल मिडियावर ज्योती वहिनीसाठी भावूक पोस्ट करत अभिनेता हार्दिकने त्याच्या भावना व्यक्त केल्याय. यात त्याने म्हटलंय की “ज्योती वहिनी तू आज आमच्यात नाहीयेस पण तूझ अस्तित्व आमच्यात कायम राहील..जाऊ बाई गावात हा जो नवीन शो मी करत आहे झी मराठीवर तो फक्त तुझ्यामुळे, तो पुर्ण शो मी फक्त तुलाच डेडिकेट करतोय, कारण तू माझा हात हातात घेऊन प्रॉमिस घेतलं होतस की हार्दिक काही झालं तरी हा शो तू करणारच आहेस, आणि योगायोग असा आहे की 4 डिसेंम्बर च्या दिवशी हा शो टीव्हीवर दिसायला सुरुवात होणार आहे आणि त्याच दिवशी तुझा वाढदिवस आहे. मि नेहमी कामाला जाताना तुला नमस्कार करायचो, तेव्हा कायम डोक्यावर हात फिरऊन तू मला आशीर्वाद द्यायची.
तुझा आशीर्वाद असाच कायम माझ्या पाठीशी असुदे.
आज मि जे काही आहे त्यात तुझा खुप मोठा वाटा आहे.
तु सदैव आई, बहिण, मैत्रीण म्हणुन माझ्या सोबत पाठीशी होतीस तशीच कायम रहा ही विनंती करतो. तुझी उणीव कायम भासत राहिल.
Miss you माझी लाडकी वहिनी मला कधी विसरु नको.
Always love you always khup khup miss you.”

असं अभिनेता हार्दिक जोशीने त्याच्या लाडक्या ज्योती वहिनीसाठी भावूक पोस्ट करत म्हटलंय. हार्दिकच्या वहिनी ज्योती यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Share this Post:

सुजाता कराड या ब्लॉगर आणि कंटेंट रायटर आहेत. त्यांना मनोरंजन क्षेत्रात जास्त रस आहे. त्यामुळे या क्षेत्रातील चित्रपट, मालिका, कलाकार आणि इतर अपडेट्सची माहिती न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सध्या ती मराठीजन या आमच्या वेबसाइटवर लेखिका म्हणून काम करत आहे आणि येथे मनोरंजनाच्या बातम्या आणि अपडेट्स लिहिते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त