गायक पंकज उधास यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात पसरली शोककळा | Singer Pankaj Udhas

Singer Pankaj Udhas: भारतातील प्रसिद्ध गायक पंकज उधास यांचे काल निधन झालं आहे. गायक पंकज उधास हे 72 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. मागच्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण अखेर त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली आणि मुंबईतल्या ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गायक पंकज उधास यांच्या कन्या नायाब उधास यांनी वडिलांच्या मृत्यूची बातमी पोस्ट केली आहे. मंगळवारी पंकज उधास यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आपल्या जादुई आवाजाने रसिकांच्या मनावर मोहिनी घालणारे गझल गायक पंकज उधास यांच्या जाण्याने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटीजनही सोशल मिडियावर दुःख व्यक्त केलं आहे.

पंकज उधास यांचा जन्म 17 मे 1951 या दिवशी गुजरातमध्ये झाला होता. पंकज उधास यांनी त्यांच्या संगीत क्षेत्रातील करिअरची सुरुवात वयाच्या सहाव्या वर्षापासून केली होती. त्यांच्या घरातच त्यांना गाण्याचे संस्कार लाभले होते. पुढे 1980 ते 1990 च्या कॅसेटच्या काळात तर ते एक सुपरहिट गझल गायक बनले होते. त्या काळातील ‘ना कजरे की धार’, ‘आज फिर तुमपे प्यार आया है..’, ‘जिये तो जिये कैसे’, ‘और आहिस्ता’, ‘चिठ्ठी आयी है..’, ‘चांदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल..’ ही त्यांची गाणी अजरामर झाली आहे.

गायक पंकज उधास यांनी त्यांच्या मृदू आणि सुरेल आवाजाने भारतीयांचे मन जिंकले होते. भारतातच नाही तर परदेशात देखील त्यांचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे.

Share this Post:

सुजाता कराड या ब्लॉगर आणि कंटेंट रायटर आहेत. त्यांना मनोरंजन क्षेत्रात जास्त रस आहे. त्यामुळे या क्षेत्रातील चित्रपट, मालिका, कलाकार आणि इतर अपडेट्सची माहिती न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सध्या ती मराठीजन या आमच्या वेबसाइटवर लेखिका म्हणून काम करत आहे आणि येथे मनोरंजनाच्या बातम्या आणि अपडेट्स लिहिते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त