Naal 2: नालायक पिक्चर बघतोच आपण.. – नाळ 2 चित्रपटाबद्दल महेश मांजरेकरांना वाटतंय वाईट

Naal 2: प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘नाळ 2’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला खूप चांगले रिव्यू मिळत आहे. ज्यांनी ज्यांनी हा चित्रपट बघितलाय त्यांनी या चित्रपटाचे खूप कौतुक केलंय. नाळ 2 हा चित्रपट ‘नाळ’ या गाजलेल्या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. ‘नाळ 2’ या चित्रपटात तीनही लहान मुलांच्या अप्रतिम अभिनयाने सर्वांचे मने जिंकली आहे. चित्रपट खूप छान असला तरी प्रेक्षकांचा मात्र या चित्रपटाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाहीये. याबद्दल नाराज होत दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी “नालायक पिक्चर्स बघतोच आपण त्याबरोबर नाळ 2 पण बघुयात ना! अप्रतिम आहे!” असं म्हणत एक व्हिडिओ शेअर केला आहे. (Director Mahesh Manjrekar about Naal 2 movie)

मांजरेकरांना नाळ 2 बद्दल काय म्हणाले?

या व्हिडिओ मध्ये महेश मांजरेकर यांनी म्हटलंय की “काल मी नाळ 2 हा सिनेमा पाहिला आणि मला अभिमान वाटला की मराठीत असा सिनेमा तयार होतोय. वाईट एकाच गोष्टीचं वाटलं की फार लोकं नाहीयेत सिनेमाला. का? ते मला कळलं नाही. कारण तुम्हाला चांगला सिनेमा बघायचाय तर भाषा महत्वाची नसते. महाराष्ट्रात इतके अप्रतिम सिनेमे बनतायेत पण कोणी प्रेक्षकच बघायला येत नाहीत. माझं म्हणणं एवढंच आहे की ज्याचं नशीब वाईट असेल त्याच्या नशिबात हा सिनेमा नाहीये, इतका सुंदर हा सिनेमा आहे. इराणचा माजिद माजिद हा उत्कृष्ट निर्माता आहे त्याने जरी हा चित्रपट पाहिला तरी तो या चित्रपटाला उत्तम म्हणेल. काही कन्नड चित्रपट आपण हिंदीत डब करतो आणि ते इथे बघतो. RRR, पुष्पा हे चित्रपट इथं पाहिले गेले . माझं मराठी निर्मात्यांना एवढंच म्हणणं आहे की त्यांनी पण आपले सिनेमे डब करावेत. मला वाटतं नाळ 2 हा सिनेमा देशातल्या सगळ्या लोकांनी बघायला पाहिजे. त्यात तीन मुलांनी सुंदर कामं केली आहेत.” असं दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी म्हटलंय.

मांजरेकरांनी केली हि विनंती

तसेच पुढे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मराठी चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या निर्मात्यांना विनंती करत म्हटलंय की “जर उद्या कधी या चित्रपटाला नॉमिनेशन मिळालं ना तर कृपा करून त्या छोट्या मुलीला बेस्ट चाईल्ड आर्टिस्ट म्हणून अवॉर्ड देऊ नका तर तिला एक बेस्ट ऍक्टरेस म्हणून अवॉर्ड द्या इतकं तिने सुंदर काम केलेलं आहे. ‘श्यामची आई’ हाही एका वेगळ्या धाटणीचा सिनेमा मी पाहिला. मराठी सिनेमे काहितरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही सरसकट सगळे मराठी चित्रपट पाहायला जा असं माझं मुळीच म्हणणं नाही पण ज्यावेळी एखादा चांगला सिनेमा येतो तेव्हा तुम्ही प्लिज त्याला सपोर्ट करा. माझी निर्मात्यांनाही विनंती आहे की तुम्ही तुमचे चित्रपट चांगले असतील तर ते हिंदीत डब करा जेणेकरून मराठी चित्रपट कंटेंट वाईज किती उत्कृष्ट असतात ते दाखवून द्या.” असं म्हणत महेश मांजरेकर यांनी निर्मात्यांनी मराठी चित्रपट इतर भाषेत डब करावे अशी विनंती केली आहे.

तर ‘नाळ 2’ हा चित्रपट जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. हा खूप छान चित्रपट आहे, तुम्हाला नक्की आवडेल.

Share this Post:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त