Kangana Ranaut: महिला कॉन्स्टेबलने अभिनेत्री कंगना राणावत च्या थोबाडीत मारण्यामागे हे आहे कारण

Kangana Ranaut: सतत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत येणारी बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काल चंदीगड विमानतळावर CISF च्या महिला कॉन्स्टेबलने कंगना राणावतच्या थोबाडीत मारल्याची घटना घडली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. (CISF official angry on Kangana Ranaut at Chandigarh airport. Constable Kulwinder Kaur objected to Kangana’s remarks on Farmers)

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हीने नुकतंच हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक जिंकली आहे. ती आता खासदार झाली आहे.पण लोकसभेत पाऊल ठेवण्यापूर्वीच म्हणजेच चंदीगड विमानतळावरून ती दिल्लीला जात असताना कंगनाच्या बाबतीत हा थप्पड कांड घडला आहे. कंगना राणावत ही दिल्लीला एनडीएच्या बैठकीला हजर राहण्यासाठी येत होती. काल संसदेच्या केंद्रीय सभागृहात ही बैठक घेण्यात आली होती. पण त्या अगोदरच चंदीगड विमानतळावर CISF ची महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौर हिने कंगनाच्या थोबाडीत मारली.

याबद्दल कंगनाने एक व्हिडीओ जारी करत म्हटलंय की “मला प्रसारमाध्यमांमधून आणि हितचिंतकांकडून फोन येत आहेत. मला सांगायचं आहे की मी पूर्णपणे सुरक्षित आहे. मी सुरक्षा तपासणी झाल्यानंतर दुसऱ्या केबिनमधून जात होते, त्यावेळेस सीआयएसएफच्या एका महिला कॉन्स्टेबलनं मला थप्पड लगावली. त्या कॉन्स्टेबलनं असं का केलं असं विचारल्यावर त्या महिला कॉन्स्टेबलचं उत्तर होतं की तिचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे. मी सुरक्षित आहेत मात्र मला चिंता वाटते की आपण पंजाबात वाढत असणाऱ्या दहशतवादाला कसं हाताळणार आहोत.” असं कंगनाने म्हटले आहे.

पण या प्रकरणा बद्दल कंगनाला थप्पड मारणाऱ्या CISF ची महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौर हिने ही तिची प्रतिक्रिया दिली आहे, यात ती म्हणाली की “जेव्हा कंगनानं शेतकरी आंदोलन करणाऱ्यांवर टीका केली होती आणि त्यांना म्हटलं होतं की, 100 रुपये घेऊन या शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. तेव्हा माझी आई त्या आंदोलनात होती. माझ्या आईला 100-100 रुपये घेऊन धरणा आंदोलनाला केलं असल्याचं तिने म्हटलं होतं.” असं कॉन्स्टेबल कुलविंदर कौर हिने म्हटले आहे.

पण कंगनाच्या थोबाडीत मारल्याने आता पीटीआय या वृत्तसंस्थेनं अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं दिलेल्या बातमीनुसार कुलविंदर कौरला निलंबित करण्यात आलं आहे आणि तीच्याविरोधात गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती दिली आहे. तसेच तिची चौकशी करण्यात येणार असल्याचेही म्हटले जात आहे.

Share this Post:

संतोष चकोर हे एक लेखक आहेत. 2015 पासून ते डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब आणि ब्लॉगिंग या क्षेत्रातही काम करत आहेत. विशेषतः ते तंत्रज्ञान, आरोग्य आणि इतर क्षेत्रातील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. सध्या ते मराठीजन या आमच्या वेबसाइटवर संपादक आणि लेखक म्हणून काम करत आहेत आणि दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील अपडेट्स लिहितात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त