बिग बॉस स्टार शिव ठाकरे आणि अब्दु रोजिक यांना ‘ईडी’चे समन्स – ड्रग्स माफिया व मनी लॉन्ड्रिंग प्रकरण

Shiv Thakare And Abdu Rozik: बिग बॉस मराठीचा विजेता आणि बिग बॉस 16 या शो मध्ये झळकलेला शिव ठाकरे हा सध्या अडचणीत सापडल्याचे दिसतोय. याचे कारण म्हणजे त्याला ‘ईडी’ कडून समन्स आल्याची माहिती मिळतेय. यात शिव ठाकरे सोबतच बिग बॉस 16 मधेच झळकलेला अब्दू रोजिक यालाही ‘ईडी’ कडून समन्स आला आहे.

मीडिया रीपोर्टनुसार एका हाय प्रोफाइल मनी लॉन्ड्रिंग केससाठी शिव ठाकरे आणि अब्दू रोजिक या दोघांना साक्ष देण्यासाठी ‘ईडी’कडून समन्स पाठवून बोलावणं धाडण्यात आलं आहे. हे प्रकरण कुख्यात ड्रग माफिया अली असगर शिराजी याच्याशी संबंधित असल्याचंही म्हटलं जातंय.

अली असगर शिराजी हा ‘Hustlers’ Hospitality Pvt Ltd’ नावाची कंपनी चालवत होता आणि या कंपनीतून वेगवेगळ्या स्टार्ट-अप्सना आर्थिक सहाय्य पुरवलं जात होतं. ड्रग्सच्या व्यवसायातून आलेला पैसा शिराजीने या अशा अनेक उद्योगांमध्ये गुंतवला होता.

काही दिवसांपूर्वीच शिव ठाकरेने ‘ठाकरे चाय अँड स्नॅक्स’ हे आऊटलेट आणि अब्दु रोजिकने ‘बुर्गीर’ हा बर्गर ब्रॅंड असलेले हॉटेल अली असगर शिराजी याच्या ‘Hustlers’ Hospitality Pvt Ltd’ या कंपनीशी भागीदारी करत सुरु केला. त्यावेळी अनेक कलाकारही या हॉटेल्सच्या उद्घाटनाला हजर होते.

पण ड्रग्सच्या व्यवसायातून शिराजीने या उद्योगांमध्ये पैसे गुंतवल्याची माहिती जेव्हा शिव ठाकरे आणि अब्दु रोजिक यांना मिळाली तेव्हा त्यांनी तातडीने त्यांचे शिराजी व त्याच्या कंपनीबरोबर असलेले करार रद्द केले. आता सध्या ड्रग माफिया अली असगर शिराजी याची ही एक हाय प्रोफाइल मनी लॉन्ड्रिंग केस बनली आहे. त्यामुळेच काही काळ त्याच्या कंपनीत भागीदारी असल्यानेच शिव ठाकरे आणि अब्दू रोजिक या दोघांना साक्ष देण्यासाठी ‘ईडी’कडून समन्स पाठवण्यात आले आहे.

Share this Post:

संतोष चकोर हे एक लेखक आहेत. 2015 पासून ते डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब आणि ब्लॉगिंग या क्षेत्रातही काम करत आहेत. विशेषतः ते तंत्रज्ञान, आरोग्य आणि इतर क्षेत्रातील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. सध्या ते मराठीजन या आमच्या वेबसाइटवर संपादक आणि लेखक म्हणून काम करत आहेत आणि दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील अपडेट्स लिहितात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त