Bigg Boss Marathi 5 : वर्षा उसगांवकर अन् निक्कीमध्ये जोरदार भांडण! चूक कोणाची? Varsha Usgaonkar and Nikki

Bigg Boss Marathi Season 5 Updates : बिग बॉस मराठीचा 5 सीजन नुकताच सुरु झाला आहे. परंतु, ‘बिग बॉस’ने पहिल्याच दिवशी संपूर्ण घरातील पाणी बंद केल्यामुळे स्पर्धकांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली आहे. अर्थात बिग बॉसलाही तेच हवं असतं, कारण वाद झाले तरच शो ची चर्चा होते ना.. उदाहरणच बघायचं झालं तर याच सीजन मध्ये नुकतंच झालेलं वर्षा उसगावकर आणि निक्की तांबोळी याचे भांडण.. त्याची सध्या सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरु आहे.. आणि याचा शोला सुद्धा फायदा होतोय.

मग अभिनेत्री वर्षा आणि निक्की यांचे भांडण नेमके झाले तरी कशामुळे? तर यंदा बीबी करन्सीवर घरातल्या सगळ्या सुख-सुविधांचं गणित ठरणार आहे. घरातल्या ‘डिसिजन मेकर’ या पहिल्याच टास्कमध्ये इरिना, धनंजय आणि सुरजने बेड खरेदी न केल्याने सर्व सदस्यांना स्लिपिंग बॅग घेऊन खाली जमिनीवर झोपावं लागलं असं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागामध्ये पाहायला मिळालं.

‘बिग बॉस’च्या घरात केवळ जान्हवी ( पॉवर कार्ड असल्याने ) एकटीच बेडवर झोपली होती. इतर सगळ्या सदस्यांना ‘बिग बॉस’ने शिक्षा म्हणून जमिनीवर झोपण्यास सांगितलं होतं. तसेच बेडचा अजिबात वापर करू नये असे सक्त आदेश देखील दिले होते. परंतु, घरातील काही सदस्यांकडून या नियमाचं उल्लंघन होतं. त्यामुळे ‘बिग बॉस’ घोषणा करत सांगतात, “मी बेड वापरण्याची परवानगी देणार होतो…पण, घरातील काही सदस्यांनी नियमभंग केल्यामुळे आता इथून पुढे आठवडाभर तुम्हाला सर्वांना जमिनीवर झोपावं लागेल” याशिवाय स्पर्धकांची बीबी करन्सी देखील जप्त करण्यात आली आहे.” आता बिग बॉस ची ही घोषणा म्हणजे एक प्रकारे भांडण करण्याचा दिलेला संकेतच आहे.. हे बिग बॉसच्या घरामध्ये अगोदरच राहून आलेल्या अनुभवी स्पर्धक निक्की तांबोळीला लगेचच समजले आणि तिने वर्षा उसगावकर यांच्या सोबत भांडणास सुरुवात केली.

Bigg Boss Marathi 5 मध्ये वर्षा आणि निक्कीचे भांडण

‘बिग बॉस’चा निर्णय ऐकल्यावर निक्की प्रचंड संतापते कारण, वर्षा उसगांवकरांना बेडवर झोपून नियमांचा भंग करताना तिने पाहिलेलं असतं. तुमच्यामुळे आम्हाला ही शिक्षा मिळाली असं बोलत ती पार त्यांची अक्कल काढते. यावरून दोघींमध्ये जोरदार भांडण होतं. दोघीही एकमेकींशी प्रचंड भांडतात… शेवटी धनंजय म्हणतो, “अभिजीत दादा अन् वर्षा ताई बेडवर बसल्या होत्या” यावर वर्षा म्हणतात, “हो तेच… मी एकटीने नियम मोडलेला नाही” यानंतर पुन्हा निक्की – वर्षामध्ये भांडण सुरू होतं. घरातले मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतात मात्र, निक्की “तुम्ही सगळे काहीतरी बोला…मी एकटीच का स्टॅण्ड घेऊ?” असा उलट प्रश्न त्यांना करते. पण बाकीचे बिग बॉस या शो मध्ये नवीनच असल्याने येथे काही मुद्द्यांवर स्वतःच स्टॅण्ड घ्यायचा असतो हे अजून माहित नाही. पण निक्कीला मात्र हे सर्व माहिती आहे. त्यामुळे सध्या तरी बिग बॉस मराठी सीजन 5 च्या रेस मध्ये ती इतर स्पर्धकांपेक्षा पुढे आहे.

सर्वांसमोर वर्षा यांच्याशी वाद झाल्यावर निक्की बेडरुममध्ये निघून जाते. याठिकाणी छोटा पुढारी या स्पर्धकासमोर ती आपल्या भावना व्यक्त करत भावुक होते. तिला अश्रू अनावर होतात. तर इतक्यात अंकिता तिला “तू वर्षा मॅमला अरे तुरे बोलायला नको होतं” असं सांगते. यावर निक्की वर्षा यांना उद्देशून म्हणते, “मॅम तुम्हाला मी अरे तुरे बोलले तर त्याच्यासाठी मी माफी मागते. अरे तुरे बोलून मला तुमचा अनादर करायचा नव्हता. इतर कोणत्याही गोष्टीसाठी मी सॉरी म्हणणार नाही.” असंही नक्की म्हणते.

घरात झालेल्या या वादानंतर वर्षा उसगांवकर एकट्या सोफ्यावर बसून भावुक झाल्याचं आजच्या भागात पाहायला मिळालं. पण सध्या सोशल मिडियावर वर्षा आणि निक्कीमध्ये झालेल्या या वादाची चर्चा रंगली आहे. याचा बिग बॉस शोलाही फायदा होतोय. म्हणूनच घरातील सदस्यांमध्ये भांडणं लावण्याचा बिग बॉसचा पहिलाच डाव चांगला आणि यशस्वी ठरलाय. तर आता या सीजन मध्ये तुम्ही कोणत्या स्पर्धकाला सपोर्ट करताय ते येथे कमेंट करून नक्की सांगा.

bigg boss marathi 5, varsha usgaonkar, nikki tamboli, bigg boss marathi, riteish deshmukh, bbm5, bigg boss, paddy kamble, aarya jadhao, dhananjay powar, ankita prabhu walavalkar, jahnavi killekar, yogita Chavan, guligat suraj chavan, ghanshyam darode, chota pudhari,

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top