Priya Bapat: अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत यांच्या लग्नाला 13 वर्षे होऊनही बाळ नाही – “ज्यांना मुलं नकोयत…”

Priya Bapat: मराठी अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत यांचं 13 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. सध्या मराठी चित्रपट क्षेत्रातील ही एक प्रसिद्ध जोडी आहे. पण लग्नाला 13 वर्षे होऊनही त्यांना अद्याप बाळ झालं नाही यावरून अभिनेत्री प्रिया बापट हिला नेहमीच प्रश्न विचारले जातात. याबद्दलचा खुलासा प्रियाने नुकतंच ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. (Actress Priya Bapat about not having baby after 13 years of marriage with Umesh Kamat)

या मुलाखतीत अभिनेत्री प्रिया बापट म्हणाली की “तुमचं लग्न झालं असेल व तुम्हाला बाळ असेल तरंच तुमचं आयुष्य पूर्ण होतं, असं लोकांना का वाटतं? काही महिला आहेत, ज्यांना मुलं नकोयत आणि त्या आनंदी आहेत, तरी त्यांना त्यांचं आयुष्य पूर्ण आहे, असं वाटतं. माझ्या आणि उमेशच्या कपल फोटोवर तुम्हाला बाळाबद्दल विचारणाऱ्या कमेंट्स आढळतील. उमेशच्या फोटोवर या कमेंट्स नसतात, अर्थात मी महिला असल्याने ही अपेक्षा माझ्याकडून आहे. पण मला जेव्हा वाटेल की बाळ हवंय, तेव्हा मी करेन, जर मला बाळ नको असेल तर मी नाही करणार.”

“मी आणि उमेश एकत्र एक नाटक करतोय. नाटकानंतर लोक भेटायला येतात, एकेदिवशी एक काकू आल्या आणि म्हणाल्या, ‘आता आम्हाला गुडन्यूज पाहिजे’. मी म्हणाले ‘आताच तर अवॉर्ड्स मिळाले. गुडन्यूज मिळाली ना’. पण त्या म्हणाल्या ‘तू बाळ कधी करणार’. मी उत्तर देईस्तोवर त्या तोच प्रश्न विचारत राहिल्या. मग मी त्यांना म्हणाले, काकू मला माझ्या आईनेही कधीच हा प्रश्न नाही विचारला, त्यामुळे प्लीज मला हा प्रश्न विचारू नका.” असं प्रिया या मुलाखतीत म्हणाली आहे.

Share this Post:

सुजाता कराड या ब्लॉगर आणि कंटेंट रायटर आहेत. त्यांना मनोरंजन क्षेत्रात जास्त रस आहे. त्यामुळे या क्षेत्रातील चित्रपट, मालिका, कलाकार आणि इतर अपडेट्सची माहिती न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सध्या ती मराठीजन या आमच्या वेबसाइटवर लेखिका म्हणून काम करत आहे आणि येथे मनोरंजनाच्या बातम्या आणि अपडेट्स लिहिते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Priya Bapat: अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत यांच्या लग्नाला 13 वर्षे होऊनही बाळ नाही – “ज्यांना मुलं नकोयत…””

  1. Its like you read my mind You appear to know so much about this like you wrote the book in it or something I think that you can do with a few pics to drive the message home a little bit but instead of that this is excellent blog A fantastic read Ill certainly be back.

    Reply

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त