अभिनेत्री प्रार्थना बेहरे वर शिवप्रेमी संतापले – प्रार्थनाचे पोस्टर फाडले | Prarthana Behre

Prarthana Behre: अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही काल लातूर मध्ये एका मॉलच्या उद्घाटनाला गेली होती. तिथे सर्वांसमोर बोलतांना प्रार्थना बेहरेने अशी चूक केली की ज्यामुळे तिला आता सर्व शिभक्तांची माफी मागावी लागली. (Actress Prarthana Behre about Chhatrapati Shivaji Maharaj)

काल 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण राज्यभरात खूप उत्साहात साजरी करण्यात आली. काल लातूरच्या उदगीर परिसरात एका नवीन किसान मॉल उद्घाटन करण्यात आले. या मॉलच्या उद्घाटनासाठी खास अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिला बोलावण्यात आले होते. उद्घाटनानंतर अभिनेत्री प्रार्थनाने तेथे उपस्थित असणाऱ्यांना संबोधित करताना कालच्या दिवसाचे महत्व सांगितले. पण भाषणात तिने अशी चूक केली की ज्यामुळे शिवभक्त तिच्यावर प्रचंड संतापले.

तेथे भाषण करतांना अभिनेत्री प्रार्थना बेहरे म्हणाली की “आज तुम्हा सर्वांना शिवाजी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा . यानिमित्ताने उदगीरचं दर्शन झालं, आज शिवाजी जयंतीच्या दिवशी मी उदगीरमध्ये एन्ट्री केली तेव्हा खऱ्या अर्थाने शिवाजी जयंती तुम्ही कशी साजरी करतात हे कळले. सगळीकडे भगवा झेंडा फडकत होता तेव्हा इतकं बरं वाटलं हे सगळं बघून…” असं म्हणत अभिनेत्री प्रार्थनाने वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला.

अभिनेत्री प्रार्थना बेहरेच्या या भाषणामुळे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यामुळे शिवभक्त तिच्यावर खूप नाराज झाले. प्रार्थना बेहरे ज्या मॉलच्या उद्घाटनाला आली होती त्याचे बॅनर फाडत शिवप्रेमींनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवलेला.तसेच प्रार्थनाने जाहीर माफी मागावी अशीही मागणी सर्वजन करू लागले. प्रचंड विरोध झाल्यानंतर सुद्धा अभिनेत्री प्रार्थनाने अगोदर यावर कुठली प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते.

पण आता तिच्या वक्तव्यानंतर तिला सोशल मिडियावर सुद्धा खूप ट्रोल केले जाऊ लागले. त्यामुळे आता नुकतेच प्रार्थनाने सर्वांच्या भावना दुखवल्याने जाहीर माफी मागितली आहे. यात ती म्हणाली की “आज मी उदगीर येथे किसान मॉल च्या उद्घाटनाला आले होते. तिथे आल्यावर माझ्याकडून चुकून काही बोलण्यात आले असेल तर त्या बद्दल मी तुम्हा सर्वांची माफी मागू इच्छिते. कृपा करून मला माफ करा, माझा त्या बोलण्याचा उद्देश चुकीचा नव्हता. मी परत म्हणते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज की जय.” असं म्हणत अभिनेत्री प्रार्थना बेहरेने तिच्या त्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे.

Share this Post:

सुजाता कराड या ब्लॉगर आणि कंटेंट रायटर आहेत. त्यांना मनोरंजन क्षेत्रात जास्त रस आहे. त्यामुळे या क्षेत्रातील चित्रपट, मालिका, कलाकार आणि इतर अपडेट्सची माहिती न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सध्या ती मराठीजन या आमच्या वेबसाइटवर लेखिका म्हणून काम करत आहे आणि येथे मनोरंजनाच्या बातम्या आणि अपडेट्स लिहिते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त