Jui Gadkari: अभिनेत्री जुई गडकरीचा गणितात 103 पैकी फक्त 3 गुण ते विद्यापीठातून थेट पहिली येण्यापर्यंतचा प्रवास

Jui Gadkari: ‘ठरलं तर मग’ या महाराष्ट्रातील लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री जुई गडकरी ही सध्या अनेक मराठी प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री आहे. अभिनेत्री जुई गडकरीने नुकतंच तिच्या शाळेतील आठवणींबद्दल अनेक खुलासे केले आहे. ते ऐकून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. (Actress Jui Gadkari about her school life – Fail in Math and topper in last year)

दहावीत सुद्धा फक्त 58.80 टक्के

अभिनेत्री जुई गडकरीने नुकतंच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिच्या शाळेतील आठवणींबद्दल सांगितले आहे की ” माझे शाळेचे दिवस फार वाईट होते, कारण मला अभ्यास करायला कधीच आवडायचं नाही. मला दहावीत सुद्धा फक्त 58.80 टक्के गुण मिळाले होते. तेव्हा मला सायन्स क्षेत्रात प्रवेश घेण्याची खूप इच्छा होती. कारण मला व्हेटर्नरी सर्जन व्हायचं होतं. माझं प्राणीप्रेम सर्वांनाच माहिती आहे. पण 58 टक्क्याला सायन्ससाठी मला कोणत्याच कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नव्हता. शेवटी माझ्या आईने कॉमर्स केलेलं म्हणून तिने मलाही कॉमर्सला प्रवेश घे असं सांगितलं. माझ्याकडे गाण्याच्या विविध स्पर्धांची प्रमाणपत्र असल्याने मला सीएचएम कॉलेजमध्ये सांस्कृतिक कोट्यामधून प्रवेश मिळाला.”

गणितात 103 पैकी फक्त 3 गुण

अभिनेत्री जुई ही अभिनयात अव्वल आहे, पण गणितात मात्र ती ढ आहे. याबद्दल ती म्हणाली आहे की “कॉलेजमध्ये मी सांस्कृतिक विभागात सहभाग घेतला होता. कॉलेज सुरू झाल्यावर पुढे वर्षभर माझे गाण्यांचे कार्यक्रम सुरू होते. मी वर्गात लेक्चरला अजिबात बसायचे नाही. अकरावीत असताना मला 67 टक्के मिळाले पण, गणित विषयात मी नापास झाले होते. गणितात 103 पैकी मला फक्त 3 गुण मिळाले होते. तेव्हा माझ्या एका सरांनी आई-बाबांची समजूत काढली. त्यांनी जुई बाहेरून बारावी पूर्ण करेल असं आश्वासन माझ्या घरच्यांना दिलं.”

आवडीच्या गोष्टी मिळाल्यावर सगळं छान करू शकते

अभ्यासात एकदम साधारण असूनही जुई पदवीच्या शेवटच्या वर्षात विद्यापीठातून पहिली आली होती. या विषयी तिने सांगितलंय की “माझ्या सरांच्या सांगण्यानुसार मी बारावी बाहेरून दिली… अभ्यास करून अगदी छान पास झाले. बारावीचा निकाल लागल्यावर मी माझ्या आवडीच्या क्षेत्रात प्रवेश घेतला ते म्हणजे BMM. सगळं आवडीनुसार केल्यामुळे पुढे, पदवीच्या शेवटच्या वर्षात मी विद्यापीठातून पहिली आले होते. आयुष्यात आवडीच्या गोष्टी मिळाल्यावर मी सगळं छान करू शकते. अन्यथा मी खूप हट्टी मुलगी आहे. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मी पदव्युत्तर पदवी परीक्षा पास केली, MBA केलं पुढे सगळं छान झालं.” असं अभिनेत्री जुई गडकरीने सांगितलं आहे.

यात अभिनेत्री जुई गडकरी हिने अकरावीत गणितात 103 पैकी फक्त 3 गुण ते पदवीच्या शेवटच्या वर्षात विद्यापीठातून थेट पहिली येण्यापर्यंतचा तिचा प्रवास सांगितला आहे.

Share this Post:

सुजाता कराड या ब्लॉगर आणि कंटेंट रायटर आहेत. त्यांना मनोरंजन क्षेत्रात जास्त रस आहे. त्यामुळे या क्षेत्रातील चित्रपट, मालिका, कलाकार आणि इतर अपडेट्सची माहिती न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सध्या ती मराठीजन या आमच्या वेबसाइटवर लेखिका म्हणून काम करत आहे आणि येथे मनोरंजनाच्या बातम्या आणि अपडेट्स लिहिते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त