Gautami and Swanandi wedding

Gautami and Swanandi Marriage: अभिनेत्री गौतमी आणि अभिनेत्री स्वानंदी यांचे लग्न

Gautami and Swanandi Marriage: सध्या अनेक मराठी कलाकार लग्न बंधनात अडकत आहे. त्यात आता अजून दोन मराठी अभिनेत्रींच्या लग्नाची बातमी मिळाली आहे. त्या अभिनेत्री म्हणजे मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) आणि अभिनेत्री स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) या दोघींचेही लग्न होत आहे.

अभिनेत्री गौतमीचे लग्न

झी मराठी वरील ‘माझा होशील ना’ या मालिकेत झळकलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने नुकतंच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का दिलाय. हा धक्का म्हणजे अभिनेत्री गौतमी देशपांडेचे खऱ्या आयुष्यात लग्न जमले आहे. नुकतंच तिने सोशल मिडीयावर तिच्या खऱ्या आयुष्यातील प्रेमाबद्दल कबुली दिली आहे.

अभिनेत्री गौतमी देशपांडे ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) हिची छोटी बहिण आहे. काही दिवसांपूर्वीच मृण्मयीने तिच्या लाडक्या बहिणीबरोबरचे काही फोटो शेअर करत गौतमीच्या लग्नाबद्दलची हिंट दिली होती. पण आता स्वतः गौतमीनेच तिच्या होणाऱ्या पती सोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांना धक्का दिला आहे. पण यातही महत्वाची गोष्ट म्हणजे गौतमीचे लग्न होत आहे. तिने नुकतंच तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर केले आहे.

अभिनेत्री गौतमी देशपांडे हिचे अभिनेता आणि इन्फ्लुएन्सर स्वानंद तेंडुलकर (Swanand Tendulkar) याच्या सोबत लग्न होत आहे. गौतमी आणि स्वानंद या दोघांनीही इन्स्टाग्रामवर काही रोमँटिक फोटो शेअर करत त्यांच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. नुकतंच त्यांचा मेहंदी सोहळा पार पडलाय. आता लवकरच हे दोघेही लग्न बंधनात अडकणार आहेत.

Actress Gautami Deshpande and Swanand Tendulkar will married soon
Actress Gautami Deshpande and Swanand Tendulkar will married soon

अभिनेत्री स्वानंदीचे लग्न

यानंतर प्रसिद्ध मराठी अभिनेते उदय टिकेकर (Uday Tikekar) आणि शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर यांची मुलगी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हिचेही लग्न होत आहे. अभिनेत्री स्वानंदीचाही मेहंदी सोहळ्याचा कार्यक्रम पार पडलाय. अभिनेत्री स्वानंदी टिकेकरचे गायक आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni) सोबत लग्न होत आहे. जुलै महिन्यात यांचा साखरपुडा पार पडला होता. त्याचे फोटोही आपण बघितले होते.

अभिनेत्री स्वानंदी टिकेकर ही एक अभिनेत्री असण्यासोबत एक छान गायक सुद्धा आहे. आणि कदाचित यामुळेच गायक आशिष कुलकर्णी सोबत तिचे मन आणि विचार जुळले असावे.

Actress Swanandi Tikekar and Ashish Kulkarni will married soon
Actress Swanandi Tikekar and Ashish Kulkarni will married soon

तर अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर तसेच अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांचे लग्न होत असल्याबद्दल अभिनंदन आणि या दोन्हीही जोड्यांना खूप साऱ्या सुभेच्छा.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top