HPV Vaccine: अभिनेत्री अक्षया देवधरने सर्व मुलींना ही लस घेण्याची केली विनंती – काय आहे Cervical Cancer?

Cervical Cancer HPV Vaccine: अभिनेत्री अक्षया देवधर हिने नुकतंच महिलांसाठी कर्करोगाबाबत जनजागृती करणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने लसीकरणाबाबत माहिती देत सर्वच मुलींनी आणि महिलांनी याचे डोस घेण्याची विनंती केली आहे. (Actress Akshaya Deodhar talk on Awareness about Cervical Cancer HPV Vaccine for Girls)

महिलांमध्ये सर्व्हायकल कॅन्सर चिंतेचा विषय

अभिनेत्री अक्षया देवधर ही तिच्या या व्हिडीओ मध्ये महिलांसाठी कर्करोगाबाबत जनजागृती करत ज्या लसीकरणाची माहिती देते ती म्हणजे एचपीवी वॅक्सीन (HPV vaccine – Human Papilloma Virus vaccines). जगभरातील सर्वच महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर (Cervical cancer) हा खूप चिंतेचा विषय बनलाय. या कॅन्सरमुळे आतापर्यंत लाखो महिलांचा मृत्यू झालाय. त्यामुळेच संपूर्ण जगात जानेवारी महिना सर्व्हायकल कॅन्सर बाबत जागरूतीचा महिना म्हणून पाळला जातो.

HPV व्हायरस लैंगिक संबंधातून

साधारण हा कर्करोग ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (Human Papilloma Virus) मुळे होतो. या व्हायरसचे पुरुषांमधेही संक्रमण होऊ शकते. HPV हा व्हायरस सामान्यपणे लैंगिक संबंधातून संक्रमित होतो. लैंगिक संभोगादरम्यान आणि ओरल सेक्सच्या मार्फत एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये हा व्हायरस पसरतो. HPV हा अतिशय धोकादायक व्हायरस आहे. हा व्हायरस शरीरात खूप लवकर पोहोचतो, पण त्यानंतर शरीरात याची विशेष लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे या व्हायरसचा संसर्ग ओळखणे फार कठीण आहे. 80% लोकांना आयुष्यात एकदातरी या विषाणूची बाधा होत असल्याचे म्हटले जाते. या व्हायरसमुळेच महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर होतो.

महिलांसाठी HPV vaccine चे डोस

सर्व्हायकल कॅन्सरवर आता भारताने स्वतःची HPV vaccine ही लस विकसित केली आहे. महिलांना सध्या या लसीचे तीन डोस देण्यात येताय. सर्व मुली वयाच्या 9 व्या वर्षापासून ही लस घेऊ शकतात. मात्र या लसीबद्दल अजूनही हवी तशी जनजागृती झाली नाहीये. त्यामुळेच अभिनेत्री अक्षया देवधरने याबद्दल एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. आणि स्वतः अक्षया देवधरने सुद्धा या लसीचे 2 डोस घेतले आहे. या व्हिडीओ मध्ये तिने लसीकरणाबाबत माहिती देत सर्वच मुलींनी आणि महिलांनी याचे डोस घेण्याची विनंती केली आहे.

अभिनेत्री अक्षया देवधरने दिली माहिती

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अक्षया देवधरचा पती अभिनेता हार्दिक जोशी च्या घरी एक दु:खद घटना घडली होती. अभिनेता हार्दिक जोशी याचा झी मराठीवरील ‘जाऊ बाई गावात’ हा कार्यक्रम सुरु होण्याअगोदरच त्याची वाहिनी ज्योती हिचे कर्करोगामुळे हे निधन झाले होते. यामुळे अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे दोघेही खूप दु:खात होते. कदाचित या दु:खद घटने नंतरच आता अभिनेत्री अक्षयाने महिलांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृती करण्याचे ठरवले असावे. आणि यातूनच तिने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

अभिनेत्री अक्षया देवधरने instagram वर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये तिने म्हटलंय की “सध्या सर्वत्र कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलं आहे. महिलांमध्ये सर्व्हायकल कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरचा त्रास होतो. यावर नेमका उपाय काय? असा प्रश्न आपल्याला कायम पडतो. सर्व्हायकल कॅन्सरवर एक वॅक्सीन आली आहे. भारताने स्वतःची लस विकसित केलीय. या लसीचं नाव HPV vaccine असं आहे. याचे सध्या तीन डोस उपलब्ध आहेत आणि हे संपूर्ण डोस महिलांना पूर्ण करावे लागतात. मला हे सांगायला खेद वाटतो की, मलाही ही गोष्ट माहित नव्हती. ही vaccine येऊन आता बराच काळ झाला आहे. तरीसुद्धा महिलांमध्ये अजूनही याबाबत जागृती निर्माण झालेली नाही. मलाही याबाबत माहिती नव्हतं. पण आता मला हे कळलं तेव्हा मी सर्वप्रथम हे डोस पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. नुकताच मी याचा दुसरा डोस घेतलाय. आणि तिसऱ्या डोस साठी मला अजून 2 महिने थांबायचंय.

तर मला असं वाटतंय की जास्तीत जास्त महिलांपर्यंत याची माहिती पोहोचणं गरजेचं आहे. माझा व्हिडीओ जर कोणी पुरुष पाहत असतील तर तुमच्या आजूबाजूच्या महिला, मुलींपर्यंत ही माहिती पोहोचवा. ही लस कुठे मिळते किंवा या लसीकरणाबाबत इतर कोणतीही शंका किंवा माहिती हवी असल्यास तुम्ही तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञांशी संपर्क साधा. त्यामुळे कृपया करून ही माहिती आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आपण करूया. वयाच्या 9 व्या वर्षापासून ही लस मुली घेऊ शकतात. जितके लवकर ही लस घेतली जाईल तितका मुलींना जास्त फायदा होईल. त्यामुळे कृपया याकडे गांभीर्याने पाहा आणि जास्तीत जास्त मुलींना याची माहिती द्या. आणि ही लस घेण्यासाठी वयोगट आहे 9 ते 45 वर्ष. पण जितक्या लवकर घेतली जाईल तितका जास्त फायदा आहे. तुमचा वेळ दिल्याबद्दल मी खूप आभारी आहे”. असं म्हणत अभिनेत्री अक्षया देवधरने सर्व महिला आणि मुलींना ही HPV लस घेण्याची विनंती केली आहे.

तर सर्वच 9 ते 45 वयोगटातील महिला आणि मुलींनी HPV या लसीचे डोस नक्की घ्यावे. जेणेकरून भविष्यात होणाऱ्या सर्व्हायकल कॅन्सर पासून आपल्याला सुरक्षित राहता येईल.

Share this Post:

सुजाता कराड या ब्लॉगर आणि कंटेंट रायटर आहेत. त्यांना मनोरंजन क्षेत्रात जास्त रस आहे. त्यामुळे या क्षेत्रातील चित्रपट, मालिका, कलाकार आणि इतर अपडेट्सची माहिती न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सध्या ती मराठीजन या आमच्या वेबसाइटवर लेखिका म्हणून काम करत आहे आणि येथे मनोरंजनाच्या बातम्या आणि अपडेट्स लिहिते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त