Ravindra Mahajani: काही महिन्यांपूर्वी जेष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे परिवारापासून एकटेच एका गावात भाड्याच्या रूम मध्ये राहत असतांना अत्यंत दु:खद निधन झाले. त्यांच्या अशा प्रकारे आकस्मिक मृत्यूने सगळ्यांनाच धक्का बसला होता. परिवार त्यांच्या सोबत राहत नसल्याने त्यांची पत्नी माधवी आणि मुलगा अभिनेता गश्मीर याच्यावर खूप टीकाही झाली. पण आता रवींद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी यांनी ‘चौथा अंक’ हे पुस्तक लिहून अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहे. याविषयी आपण अनेक आर्टिकल द्वारे माहिती बघितली आहे. (Actor Ravindra Mahajani wife revealed about his anger and daughter)
अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी यांनी ‘चौथा अंक’ या त्यांच्या आत्मचरित्र पुस्तकात रवींद्र महाजनी यांच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. या पुस्तकात रवींद्र यांनी रागाच्या भरात त्यांची मुलगी रश्मीचं डोकं भितीवर जोरात आपटल्याचा प्रसंग माधवी यांनी सांगितला आहे. तसेच रवींद्र महाजनी यांच्या या रागट स्वभावामुळे मुलगी रश्मीच्या मनात त्यांच्याविषयी धाक कायम तसाच राहिल्याचे माधवी यांनी या पुस्तकात लिहिले आहे.
रवींद्र महाजनी यांना निष्ठुरपणे मारहाण करण्याची सवय
माधवी यांनी हा प्रसंग सांगत असे म्हटले आहे की “रवीला राग आला की तो उग्र रूप धारण करीत असे. प्रेमात आला की तो लाडही खूप करीत असे. एकदा तो रश्मीवर कशावरून तरी इतका चिडला की, त्याने रश्मीचं डोकं भितीवर जोरात आपटलं. तेव्हा तिला कशीतरी त्याच्या तडाख्यातून सोडवले. पण एकूण रवीच्या निष्ठुरपणे मारहाण करण्याच्या सवयीमुळे रश्मीच्या मनात त्याची भीती बसलेली होती.” असा खुलासा माधवी यांनी या पुस्तकात केला आहे.
तसेच मुलीबद्दलचा अजून एक प्रसंग सांगत त्यांनी म्हटलंय की “एकदा आम्ही सर्वजण गप्पा मारत बसलो होतो. रश्मी आतून पाण्याचा ग्लास घेऊन येत होती. अचानक तिच्या हातातून ग्लास निसटून खाली पडला. त्यामुळे तो ग्लास फुटला आणि त्याच्या काचा सर्वत्र विखुरल्या. ग्लास पडल्यामुळे बाबा रागावला तर या भीतीने ती धावत माझ्याकडे आली. पण वाटेत फुटलेल्या काचा होत्या, त्याचे तिला भान राहिले नाही. त्या काचा तिच्या पायात खोलपर्यंत घुसल्या. ताबडतोब तिला आम्ही डॉक्टरांकडे नेले. पाय हळूहळू बरा झाला. पण तिच्या मनातला धाक तसाच राहिला.” असं म्हणत माधवी यांनी रवींद्र महाजनी याच्या रागटपणामुळे त्यांची मुलगी रश्मी ही किती धाकात होती याबद्दल खुलासा केला आहे.
रवींद्र महाजनी यांचे कौतुक
पण याच पुस्तकात पुढे माधवी यांनी रवींद्र महाजनी यांचे कौतुक सुद्धा केले आहे. यात माधवी यांनी म्हटलंय की “मूड असला की रवी आमचे लाडही करायचा. रश्मीला पाच वर्षे पूर्ण झाली तेव्हा त्याने तिला जरीचं परकर पोलकं, डोक्यावर मुकूट, कंबरपट्टा व फुलांचे दागिने असा सगळा थाट केला होता. रश्मी तेरा वर्षांची होईपर्यंत तिचा वाढदिवस तो लग्नासारखा साजरा करीत असे. मुलांना, नातेवाईकांना बोलवायचे, ह्या सर्वांवर पैसे खर्च करायचे. महागड्या हॉटेलमधे न्यायचा, भरपूर कपडे, खाण्यापिण्याची चंगळ अशी सगळी त्याची मनमानी चालत असे.” असं माधवी यांनी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या विषयी सांगितलं आहे.
Image | Product | Features | Price |
Our Pick1 | ‘चौथा अंक’ | माधवी रवींद्र महाजनी यांचे आत्मचरित्र |