Ravindra Mahajani: अभिनेते रवींद्र महाजनी व्यसनाधीन आणि जुगारी झाले होते – पत्नी माधवीचा खुलासा

Ravindra Mahajani: ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे काही दिवसांपूर्वीच अत्यंत दुखद निधन झाले होते. त्याच्या परिवारात सर्वकाही ठीक नव्हते. त्यामुळेच गेल्या अनेक अनेक महिन्यांपासून रवींद्र महाजनी हे त्यांच्या परिवारापासून दूर पुण्यातील तळेगावात एका भाड्याच्या खोलीत एकटेच राहत होते. त्यांचा मृत्यू होऊन 2-3 दिवस झाले तरी कोणालाही समजले नाही. एका दिग्गज मराठी अभिनेत्याचे असे दुर्दैवी निधन व्हावे हे असंख्य मराठी प्रेक्षकांना मान्य होत नव्हते. यामुळे त्यांची पत्नी माधवी आणि मुलगा गश्मीर महाजनी यांच्यावर खूप टीकाही झाली. (marathi actor ravindra mahajani wife madhavi mahajani in her book)

पण आता रवींद्र महाजनी यांच्या निधनाच्या काही महिन्यानंतर त्यांच्या पत्नी माधवी यांचे आत्मचरित्र ‘चौथा अंक’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. यात माधवी यांनी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्याबद्दल अनेक खुलासे केले आहे. या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे माधवी ह्या शाळेत असतानाच रवींद्र महाजनी यांच्या प्रेमात पडल्या होत्या. पण रविंद्र महाजनी यांना लग्नागोदरच जुगार खेळण्याचा, व्यसनाचा नाद लागला होता. त्याचे कारणही तेवढेच मोठे होते.

रवींद्र महाजनींचा प्रेमभंग

माधवी महाजनी यांच्या प्रेमात पडण्यागोदर रवींद्र महाजनी हे एका मुलीच्या प्रेमात होते. रविंद्र महाजनी यांच्या आई-वडील हे दोघेही स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते. वेळप्रसंगी या दोघांनीही काही काळ तुरुंगवास भोगला होता. त्या दोघांचाही प्रेम विवाह होता. अशा कर्तृत्ववान आईवडिलांचा रविंद्र महाजनी यांच्यावर प्रभाव पडलेला होता. त्यामुळे आपणही शिकून डॉक्टर व्हायचं असा त्यांचा निश्चय होता. अभ्यासातही ते खूप हुशार होते. पण त्यावेळी रवींद्र महाजनी एका मुलीच्या प्रेमात होते.

रवींद्र महाजनी काहीच काम करत नसल्याने त्या मुलीच्या वडिलांनी तिचे लग्न दुसरीकडे लावून दिले होते. प्रेमभंग झाल्यामुळे रविंद्र महाजनी निराशेत वावरत होते. अशातच गालगुंड झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. बरेच दिवस उपचार चालू असल्याने मेडिकलला जायचे त्यांचे स्वप्न अर्धवट राहिले. अशातच अभ्यासातही त्यांचे मन रमेनासे झाले.

रवींद्र महाजनी व्यसनाधीन आणि जुगारी झाले

डिप्रेशनमध्ये गेलेला माणूस लवकरच वाईट मार्गाला स्वीकारतो अशीच अवस्था रविंद्र महाजनी यांची झालेली होती. कुठल्याच गोष्टीवर लक्ष लागेना त्यामुळे ते लवकरच व्यसनाधीन झाले. पण हे व्यसन करायचं म्हटलं तर पैसे लागतात. म्हणून मग ते जुगाराकडे वळले. जुगारात ते कायम हरतच असत. त्यामुळे ते आणखीनच खचून जात.

याचवेळी रवींद्र महाजानींची माधवी सोबत ओळख झाली. मी दारु पितो, व्यसन करतो, जुगार खेळतो असं अगोदरच रविंद्र महाजनी यांनी मधवीला सांगून टाकले होते. पण या कशाचाच माधवीवर परिणाम झाला नाही, उलट रविंद्र महाजनी यांच्यावर त्या अधिकच प्रेम करू लागल्या होत्या. फक्त परिस्थिती सुधारेल या आशेवर त्या शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहिल्या.

घरच्यांचा विरोध असूनही माधवीने लग्न केले

रविंद्र महाजनी काहीच काम करत नाही. जुगार आणि व्यसन करतो या गोष्टींमुळे त्यांच्या लग्नाला माधवीच्या घरातून विरोध होता. तर सासूबाईंनी सुद्धा माधवीची भेट घेऊन त्यांना लग्न करू नका असा सल्ला दिला होता. एका चांगल्या मुलासोबत तुझे लग्न लावून देतो पण व्यसनाच्या आहारी गेलेल्या रविंद्र सोबत तू लग्न करू नको असे त्यांनी समजावून सांगितले होते. माधवीच्या मैत्रिणींनी देखील या लग्नाला विरोध केला होता. पण या सगळ्याला न जुमानता माधवी यांनी दसऱ्याच्या दिवशी 10 ऑक्टोबर 1970 रोजी रविंद्र महाजनी यांच्यासोबत प्रेमविवाह केला.

या सोबत ‘चौथा अंक’ या पुस्तकात माधवी आणि गश्मीर यांनी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्याबद्दल अनेक खुलासे केले आहे.

ImageProductFeaturesPrice
Our Pick1
chautha anka book
‘चौथा अंक’

माधवी रवींद्र महाजनी यांचे आत्मचरित्र

Share this Post:

सुजाता कराड या ब्लॉगर आणि कंटेंट रायटर आहेत. त्यांना मनोरंजन क्षेत्रात जास्त रस आहे. त्यामुळे या क्षेत्रातील चित्रपट, मालिका, कलाकार आणि इतर अपडेट्सची माहिती न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सध्या ती मराठीजन या आमच्या वेबसाइटवर लेखिका म्हणून काम करत आहे आणि येथे मनोरंजनाच्या बातम्या आणि अपडेट्स लिहिते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त