Ravindra Mahajani: अभिनेते रविंद्र महाजनी यांना व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार – अभिनेता गष्मीरने स्विकारला वडिलांचा पुरस्कार

Ravindra Mahajani: दिवंगत जेष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांना 2020 या वर्षासाठीचा मरणोत्तर व्ही.शांताराम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनेता गष्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) याने यावेळी वडिल रविंद्र महाजनी यांचा हा पुरस्कार स्विकारला.

गुरुवारी सायंकाळी पार पडलेल्या 57 व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात 2020 या वर्षासाठी अभिनेते रविंद्र महाजनी, 2021 साठी ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण आणि वर्ष 2022 साठी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांचा व्ही. शांताराण पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. तर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 2023 साठीचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोबतच 2022 या वर्षासाठी व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार हा प्रसिद्ध चित्रपट अभिनेते-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात आला.

अभिनेते रवींद्र महाजनी यांनी मराठी, हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. 1975 मध्ये व्ही. शांताराम दिग्दर्शित झुंज या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यांनी मुख्य भूमिका साकारलेले लक्ष्मी (1978), दुनिया करी सलाम (1979), गोंधळात गोंधळ (1981), मुंबईचा फौजदार (1985) हे काही चित्रपट त्यावेळी खूप गाजले होते. पुढे रविंद्र महाजनी यांनी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही काम केलं. त्यांनी 1997 साली प्रदर्शित झालेल्या ‘सत्तेसाठी काहीही’ या चित्रपटासाठी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून काम केलं होतं. पण हा चित्रपट फारसा चालला नाही.

काही काळापासून रविंद्र महाजनी हे त्यांच्या परिवारापासून दूर एकटेच एका खेडेगावात भाड्याच्या घरात राहत होते. यथेच त्यांचे निधन झाले. त्यांचा मृत्यू होऊन दोन दिवस होऊन गेले तरी कोणालाही याबद्दल माहिती नव्हती. शेजारी राहणाऱ्यांनी पोलिसांना कळवले आणि यानंतर सर्वांना त्यांच्या निधनाची बातमी मिळाली. एके काळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या जेष्ठ अभिनेत्याचे असे दुखद निधन होणे हे त्यांच्या असंख्य चाहत्यांना मान्य होत नव्हते. म्हणून त्यांनी रवींद्र महाजनी यांची पत्नी माधवी आणि मुलगा अभिनेता गश्मीर महाजनी यांच्यावर खूप टीकाही केली.

पण आता रवींद्र महाजनी यांच्या निधनाला 6 महिने झाल्यानंतर त्यांच्या पत्नी माधवी यांचे आत्मचरित्र ‘चौथा अंक’ हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. यात त्यांनी रवींद्र महाजनी यांच्या बद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. यात माधवी यांनी सांगितल्या प्रमाणे रवींद्र महाजनी हे व्यसनी होते, जुगार खेळायचे, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करायचे, परिवारासोबत न राहता मनमानी करत घरातून निघून जायचे, बांधकाम व्यवसायात त्यांची झालेली फसवणूक अशा अनेक गोष्टींचा खुलासा माधवी यांनी त्यांच्या ‘चौथा अंक’ या पुस्तकात केला आहे. हे खुलासे ऐकून रवींद्र महाजनी यांच्या असंख्य चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.

chautha anka book
1Our Pick
‘चौथा अंक’

माधवी रवींद्र महाजनी यांचे आत्मचरित्र

Share this Post:

सुजाता कराड या ब्लॉगर आणि कंटेंट रायटर आहेत. त्यांना मनोरंजन क्षेत्रात जास्त रस आहे. त्यामुळे या क्षेत्रातील चित्रपट, मालिका, कलाकार आणि इतर अपडेट्सची माहिती न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सध्या ती मराठीजन या आमच्या वेबसाइटवर लेखिका म्हणून काम करत आहे आणि येथे मनोरंजनाच्या बातम्या आणि अपडेट्स लिहिते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Ravindra Mahajani: अभिनेते रविंद्र महाजनी यांना व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार – अभिनेता गष्मीरने स्विकारला वडिलांचा पुरस्कार”

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त